दारूबंदी तीन प्रश्न, चार उपाय

By admin | Published: December 12, 2015 06:56 PM2015-12-12T18:56:41+5:302015-12-12T18:56:41+5:30

‘दारूबंदी हा माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे.’ ‘माझ्या आनंदावर घाला घालणारे तुम्ही कोण टिकोजीराव?’ ‘जगात असा एक तरी देश दाखवा, जिथे दारूबंदी यशस्वी झाली आहे?’ - दारूबंदी करावी की न करावी? त्यापासून मिळणा:या पैशावर सरकारनं पाणी सोडावं की न सोडावं? या सनातन विषयावर भारतात कायमच चक्रीवादळं होत असताना केरळ व बिहार सरकारने नुकताच दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.

Three questions for drinking, four measures | दारूबंदी तीन प्रश्न, चार उपाय

दारूबंदी तीन प्रश्न, चार उपाय

Next
>- डॉ. अभय बंग
 
आता तर केरळ व बिहारनेही दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमधे अगोदरच दारूबंदी आहे. दारूचा प्रचंड वाढलेला वापर व त्यामुळे होणारे राक्षसी दुष्परिणाम बघता ही मागणी अजून पसरेल हे नक्की. त्यापूर्वी तीन प्रश्नांचा विचार जरूर करायला हवा.
 1  मी कसे जगावे याबाबत प्रत्येक व्यक्तीला निवड करण्याचा अधिकार आहे. दारूबंदीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने येतात, हे योग्य आहे का? 
- आजच्या युगात हा इच्छा-स्वातंत्र्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा झाला आहे. स्वतंत्र निवड कोण करते? आपला मेंदू करतो. पण दारूमधील अल्कोहोल मेंदूचा ताबा घेते व मेंदूची स्वतंत्रपणो विवेकाने निर्णय घेण्याची क्षमता बधीर करते. पहिला पेला तोंडाला लावल्यावर (आणि व्यसनींच्या बाबतीत तर त्यापूर्वीच) दारू आपल्या मेंदूवर राज्य करते. पुढील निर्णय 
दारू घेते, व्यक्ती नाही. दारूच्या बाबतीत निवडीचे स्वातंत्र्य हा भ्रम आहे. उलट व्यक्तींचे निवड-स्वातंत्र्य दारू हिरावून 
घेते.
 2  पण अनेकांना यामुळे संध्याकाळी रिलॅक्सेशनचे, आनंदाचे क्षण मिळत असतील, तर थोडय़ाशा लोकांवरील दुष्परिणामांसाठी सर्वाचे सुख हिरावून घेणो अयोग्य नाही का?
- एक तर, हे ‘थोडे’ लोक तितके थोडे नाहीत. समाजातील दारू पिणा:या एकूण लोकांमध्ये साधारणत: पंधरा टक्के लोक - सातपैकी एक - हा दारूग्रस्त असतो. आणि लांब काळ लक्षात घेतला तर दारूचा पहिला घोट घेणा:यांपैकी जवळपास 25 टक्के, म्हणजे चारपैकी एक केव्हा ना केव्हा दारूग्रस्त होतो. आणि प्रत्येक दारूग्रस्तामागे कुटुंबातील चार लोक दुष्परिणाम भोगतात. आता हा आकडा ‘थोडा’ उरत नाही.
याशिवाय, दारू पिण्याच्या व्यक्तिगत निर्णयाचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. मला जर अफाट वेगाने ड्रायव्हिंग करायला आवडत असले तरी त्यामुळे अपघात होऊन इतरांना धोका संभवतो म्हणून समाजाला त्या इच्छा-स्वातंत्र्यावर नियंत्रण आणावे लागते. दारू पिऊन बेताल वर्तनामुळे बायको, मुले व आई-वडील, त्यासोबतच शेजारी, कामावरील सहकारी, इतकेच नव्हे तर काम देणारा (मालक) व सेवा घेणारे सर्वांचेच हित धोक्यात येते. दारूच्या नशेत ऑपरेशन करणारा डॉक्टर किंवा डय़ूटी करणारा पोलीस मोठे नुकसान करू शकतो. दारू पिऊन ड्रायव्हिंग केल्यामुळे रस्त्यावरचा प्रत्येक माणूस धोक्यात येतो. सलमान खानचे दारू पिण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे, की फुटपाथवरील लोकांचा जीव?
वर्तमानपत्रत येणा:या बहुतेक ‘निर्भया’कांड, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमधील पुरुष सहसा दारूच्या नशेत होते. पंजाबचे माजी पोलीसप्रमुख के. सी. एस. गिलसारख्या प्रसिद्ध व वरिष्ठ अधिका:याने दारूच्या प्रभावात श्रीमती रूपन देवल बजाज या वरिष्ठ आय.ए.एस. स्त्री अधिका:याचा विनयभंग केला. पुरु ष दारूच्या नशेत असल्यावर राज्यपालांच्या उपस्थितीतही रूपन देवल ही स्त्री सुरक्षित नव्हती. मग भारतातली कोणती स्त्री सुरक्षित राहू शकेल?
वस्तुत: हा प्रश्न काही लोकांचे दारू पिण्याचे स्वातंत्र्य विरुद्ध इतरांचे जिवंत राहण्याचे, सुरक्षिततेचे, सन्मानाचे, सेवा मिळण्याचे स्वातंत्र्य असा आहे. आणि या ‘इतर’मधे समाजातील प्रभावित होऊ शकणारे, म्हणजे जवळपास सर्व येत असल्याने ही निवड केवळ व्यक्तींच्या इच्छेवर, आवडीवर सोडता येत नाही. समाजाला व शासनाला त्यावर नियंत्रण टाकावे लागते. आणि भारतात तर राज्यघटनेनेच शासनावर दारू नियंत्रणाची जबाबदारी टाकलेली आहे. म्हणून दारूबाबत नियंत्रणाची सामाजिक नीती किंवा दारूबंदी ही न्यायोचित आहे. 
 3  .पण जगात कुठेतरी दारूबंदी यशस्वी झाली आहे का?   
- यशस्वी दारूबंदी म्हणजे काय? दारू शंभर टक्के कमी होणो म्हणजे यशस्वी झाली म्हणायचे? या नियमाने गरिबी नियंत्रण, साक्षरता प्रसार, बालमृत्यू नियंत्रण, कोणताच सामाजिक कार्यक्र म यशस्वी होणार नाही. रोग, खून, चोरी, अपघात कोणतेच शंभर टक्के कमी होत नाहीत म्हणून काय मोकाट सोडायचे? सर्वच सामाजिक वाईट गोष्टी हळूहळू, क्रमाक्र माने व टक्क्यांनी कमी होत जातात. दारूबंदीबाबत टीकाकार एकदम स्त्रीच्या चारित्र्यासारखा प्रश्न उपस्थित करतात. शुद्ध की अशुद्ध?  दारूबंदी हे काही चारित्र्यमापन नव्हे. दारूबंदीचे ध्येय आहे दारूचा वापर व दुष्परिणाम उत्तरोत्तर कमी करणो. ते किती प्रमाणात साध्य झाले आहे तेवढय़ा प्रमाणात ती यशस्वी. 
कोणत्याही देशातील दारूचे एकूण प्रमाण हे दारूची मुबलकता, दारूची किंमत व दारूविषयक संस्कृती या तीन बाबींवर अवलंबून असते. दारूबंदीमुळे यातील पहिल्या दोन बाबी काही प्रमाणात बदलतात व त्यामुळे दारूचे प्रमाण व परिणाम कमी व्हावे अशी अपेक्षा. 
त्या सोबतच समाजातील संस्कृतीदेखील दारूविरोधी असेल तर एकूण परिणाम अधिक संभवतो. असे एक उदाहरण आपण बघू.
मनमोहन देसाईंच्या फिल्ममधील जुळे भाऊ वेगळे होण्याच्या गोष्टीसारखे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे एकत्रित हिंदुस्तानमधून जन्माला आलेले तीन शेजारी देश. त्यांनी दारूबाबत वेगवेगळी भूमिका घेतली. भारतात बहुतेक राज्यांनी दारू मोकळी केली व वाइन फेस्टिव्हलना मोकाट सोडले. पाकिस्तान व बांगला देशमधे धर्मामुळे दारूविरोधी संस्कृतीसोबत शासकीय दारूबंदी आहे. परिणाम?
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2क्15 च्या अहवालानुसार भारतातील वयस्क वार्षिक सरासरी 4क्क्क् मिलि अब्सोल्यूट अल्कोहोल पितात (4क्क् ते 5क्क् पेग दारू). या तुलनेत पाकिस्तानमधे हे प्रमाण 1क्क् मिलि (1क् पेग) व बांगलादेशमधे 2क्क् मिलि (2क् पेग) आहे. जगातील एकूण 26 देशांमधे हे प्रमाण 1क्क्क् मिलिपेक्षा कमी आहे. या बहुतेक देशांमधे संस्कृती व सरकार दारूविरोधी आहेत. भारतामधील बहुतेक प्रमुख धर्म - हिंदू, मुस्लीम, शिख, बौद्ध व जैन - हे दारूविरोधी असल्याने आजही भारतातील बहुतांश स्त्नी-पुरु ष - जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 79 टक्के स्त्री-पुरु ष - दारू पीत नाहीत. (यात कायदेशीर व बेकायदेशीर दोन्ही दारू पिणो अंतर्भूत आहेत.) अशा देशात शासकीय नीती व अंमलबजावणीद्वारे दारू नियंत्रण नक्कीच शक्य आहे.
     मग त्यासाठी काय करायला हवे?
- दारूबंदी हे ध्येय नाही. ध्येय आहे दारूमुक्ती. त्यासाठी दारूबंदी हा केवळ चारपैकी एक उपाय झाला. बहुतेक सरकार केवळ दारूबंदी घोषित करून थांबतात. केवळ एका पायावर कोणती खुर्ची उभी राहू शकेल? ती हमखास पडेल. दारूबंदी यशस्वी होऊन दारू कमी होण्यासाठी किमान चार कलमी उपाय हवेत.
एक, दारूचे कायदेशीर नियंत्रण. यात पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा, अबकारी विभागपासून तर गावातील सरपंच, पोलीसपाटील या सर्वांवर जबाबदारी येते. वस्तुत: महाराष्ट्रात सर्वत्र मुंबई दारूबंदी कायदा लागू आहे. त्या अंतर्गत दारूचे नियमन करणो ही शासनाची जबाबदारीच आहे. दारूबंदी लागू केलेल्या जिल्ह्यात तर अधिकच मोठी आहे. ही जबाबदारी स्वच्छपणो पालन करता येण्यासाठी पोलीस विभागाला नव्या पद्धती शोधायची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात दारूबाबत एक हेल्पलाइन सुरू करायला हवी.
दोन, दारू नियंत्रणामधे स्थानिकांचा सहभाग समाजातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीवर चोवीस तास लक्ष कोणतीच पोलीस यंत्रणा ठेवू शकत नाही, ठेवू नये. ती जबाबदारी वॉर्ड, गाव, तालुका व जिल्हा पातळीवर दारूमुक्ती समित्या निर्माण करु न त्यांना द्यावी. त्यात प्रामुख्याने स्त्रिया असाव्यात. सोबतच ग्रामपंचायत, तंटा-मुक्ती समिती, शाळा, बचतगट, महिला मंडळे, युवकांच्या खेळ किंवा उत्सव संघटना, स्वयंसेवी संघटना अशा सर्वांची मदत घेणो आवश्यक आहे.
तीन, दारूबाबत व्यापक लोकशिक्षण व जनजागृती करणो. कशासाठी? तर दार पिणो घातक आहे हे समाजमनावर पक्के ठसण्यासाठी, तरु णांनी पहिला प्यालाच तोंडाला लावू नये यासाठी, महिलांनी, दारूचा विरोध करण्यासाठी. लोकशिक्षण व माध्यमांद्वारे असे वातावरण बनावे की दारूची समाजमान्यता व प्रतिष्ठा निघून जावी. वर्तमानपत्रे,  टी.व्ही. पासून  मोबाईल फोन, इंटरनेट, सिनेमे, शाळा, कॉलेजेस, धार्मिक संस्था - सर्वच यात महत्वाची भूमिका करू शकतात. दारूविरोधी संस्कृतीची निर्मिती यातून व्हावी. माणसांचे बहुतेक वागणो त्याची संस्कृती ठरविते.
चौथा उपाय आहे - व्यसनमुक्तीचा उपचार. समाजातील काही व्यक्ती व्यसनी होऊन दारु पुढे हतबल असतात. त्यांना केवळ कायदा किंवा उपदेश पुरेसा नाही. त्यांना दारूचे व्यसन नावाचा मेंदू-रोग झाला आहे हे स्वीकारून व्यसनमुक्तीचा उपचार द्यायला हवा. किमान प्रत्येक तालुक्यात एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायला हवे. 
वस्तुत: दारूमुक्तीचा असा व्यापक प्रयोग लवकरच महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने आम्ही गडचिरोली जिल्ह्यात सुरू करत आहोत. तसे झाले तर गडचिरोलीचीच नव्हे कुठलीही दारूबंदी अधिक प्रभावी करण्याची पध्दत विकसित होईल. ती वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, नगर, सातारा या दारूबंदी मागणा:या जिल्ह्यातच नव्हे तर केरळ व बिहारमधेही उपयोगी पडेल.
 
प्रत्येकाने आपल्या पातळीवर काय करावे?  
खालील संकल्प करावे, कृती करावी.
 
 मी कोणत्याही प्रकारची दारू पिणार नाही. (बियर, वाईन, ताडी हे दारूचेच प्रकार आहेत.) ग्रुपमधे किंवा पार्टीमधे किंवा डिनरच्या वेळीही नाही.
 मी माङया जवळच्या लोकांना - कुटुंबीय, मित्र, सहकारी यांना दारू पिण्यापासून शांतपणो परावृत्त करीन.
 मी दारूविषयी अधिक शास्त्रीय माहिती मिळवून समाजात त्याबाबत योग्य भूमिका घेईन व विचार मांडेन.
 माङया संस्थेत, वॉर्डमधे, गावात दारूमुक्ती संघटना बनवून दारू कमी करण्याचा प्रयत्न करीन.
 महाराष्ट्रात दारूबंदीसाठी आमदार, मंत्री व मुख्यमंत्री यांना वारंवार पत्र लिहून जनमत कळवीन.
 मी निवडणुकीत दारू पिऊन मतदान करणार नाही. 
 दारू  पिणा:या किंवा दारूचा व्यवसाय करणा:या उमेदवाराला मी मत देणार नाही.
 मी जीवनातील आनंदासाठी दारूचा आश्रय न घेता वाचन, संगीत, कला, छंद, खेळ, व्यायाम, मित्र, परिवार, नातेसंबंध सामाजिक उपक्र म, सेवा, अध्यात्म अशा विधायक उपायांचा आश्रय घेईन.
 दारूग्रस्त व्यक्ती व कुटुंबांना मी मदत करीन.
 वर्तमानपत्रत पत्र लिहून, सोशल मीडियाद्वारे व माङया वर्तनाद्वारे मी माङो हे विचार व संकल्प प्रकट करीन.
 
(लेखक ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आणि त्यावर कृतिशील उत्तर शोधणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, ‘सर्च’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)
search.gad@gmail.com

Web Title: Three questions for drinking, four measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.