खजिन्याची विहीर
By admin | Published: January 23, 2016 02:43 PM2016-01-23T14:43:35+5:302016-01-23T14:43:35+5:30
लहानपणी गोष्टींच्या पुस्तकात खजिन्याच्या विहिरी सापडायच्या. गुप्त ‘खजिन्याच्या’ अशा विहिरी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानात पाहायला मिळतात. चांद बावडीची विहीर तर अगदी ऐतिहासिक. साता:याजवळच्या लिंब गावातली बारा मोटांची विहीरही तशीच. या विहिरी प्राचीन कलावैभवाच्याही साक्षीदार आहेत.
Next
>- मकरंद जोशी
लहानपणी गोष्टीच्या पुस्तकांमध्ये खजिन्याच्या विहिरीची रंजक गोष्ट वाचली होती. त्या गोष्टीतल्या विहिरीचे वर्णन वाचल्यावर, अशा भल्यामोठय़ा, नक्षीकामाने आणि शोभिवंत शिल्पांनी सजवलेल्या विहिरी फक्त गोष्टीतच असतात असा समज झाला होता. पुढे भटकंतीचं वेड लागल्यावर राजस्थानातील जयपूरजवळच्या आबानेरी येथील चांद बावडी बघायचा योग आला. लहानपणीच्या गोष्टीतली विहीर प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद झाला. आबानेरी हे लहानसे गाव जयपूर-आग्रा रस्त्यावर जयपूरपासून 9क् कि.मी. अंतरावर आहे. या गावाचे मूळचे नाव होते ‘आभा नगरी’ अर्थात ‘प्रकाश नगरी’. पुढे त्याचाच अपभ्रंश झाला आबानेरी.
ऐतिहासिक संदर्भांनुसार हे गाव राजस्थानवर राज्य करणा:या गुर्जर प्रतिहारी राजवटीत वसवण्यात आले. नंतर सन 8क्क् ते 9क्क् च्या दरम्यान राज्य करणा:या निकुम्भ राजवटीतील राजा चंद याने येथे भलीमोठी पाय:यांची विहीर बनवली, म्हणून ही विहीर ‘चांद बावडी’ नावाने ओळखली जाते. चांद बावडीसारख्या ‘स्टेप वेल्स’ आपल्याला राजस्थान आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या कमी पावसाच्या प्रदेशात आकाशातून पडणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी पाचव्या, सहाव्या शतकात अशा प्रकारच्या पाय:यांच्या विहिरी बांधायचे तंत्र शोधण्यात आले. पुढे मध्ययुगात हे तंत्र चांगल्या प्रकारे विकसित झाले आणि आज भारताच्या सांस्कृतिक व कलात्मक इतिहासाचा ठेवा बनलेल्या पाय:यांच्या विहिरी निर्माण झाल्या.
चांद बावडीचे वैशिष्टय़ म्हणजे या विहिरीच्या काठावर श्री हर्षदामाता मंदिर आहे. पूर्वीच्या काळात हे मंदिर आणि विहीर गावातल्या सार्वजनिक समारंभांचे ठिकाण असावे. लोकांना बसण्यासाठी इथे सज्जे केलेले आहेत. आज ही जागा थोडी दुर्लक्षित आहे. वाट वाकडी करून आवर्जून येणा:या पर्यटकांशिवाय इतर कोणी इथे फिरकत नाही. पण इथे असलेल्या कोरीव मूर्ती आणि नक्षीकामाचे नमुने प्राचीन कलावैभवाचा खजिना आहेत हे नक्की.
‘स्टेप वेल’ अर्थात पाय:यांची विहीर हा प्रकार राजस्थान आणि गुजरातप्रमाणोच महाराष्ट्र आणि कर्नाटकातही पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील अशा विहिरीचं देखणं उदाहरण म्हणजे साता:याजवळच्या लिंब गावातली बारा मोटांची विहीर. नावाप्रमाणोच या भल्यामोठय़ा विहिरीच्या पाण्यावर इतिहासकाळात बारा मोटा चालत असतील याची खात्री ही विहीर पाहिल्यावर होते. ही अष्टकोनी आकाराची विहीर सौ. वीरु बाईसाहेब भोसले यांनी 17 व्या शतकात बांधली असल्याची माहिती तेथे लावलेल्या फलकावरून मिळते. शिवलिंगाच्या आकारात बनवलेल्या या विहिरीचा व्यास 5क् फूट आहे, तर खोली 11क् फूट आहे. या विहिरीचे वैशिष्टय़ म्हणजे या विहिरीच्या अंतरंगात दालने आणि सज्जे आहेत. मध्यभागी पाण्याचे कुंड आणि भोवती खोदलेली दालने अशी रचना आहे. या दालनांमधील कलाकुसर आणि शिल्लक रंग त्यांच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. साता:याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हे या विहिरीतील दालनांचा उपयोग खलबतखाना म्हणून करीत असेही सांगितले जाते. अशा प्रकारे कोरीव कामाने नटलेली आणि भक्कम दगडी बांधणीची, आतमध्ये दालने, सज्जे असलेली महाराष्ट्रातली ही बहुधा एकमेव विहीर असावी. मात्र आजही सातारामार्गे महाबळेश्वरकडे जाणा:या पर्यटकांना ती फारशी माहीत नाही.
पाहायलाच हवी अशी विहीर म्हणजे अहमदाबादजवळची अडालज बाव. पाच मजले खोल असलेल्या या विहिरीतील कोरीव काम थक्क करणारे आहे. ऐतिहासिक कथेनुसार या प्रदेशावर 15व्या शतकात राणा वीरसिंह याचे राज्य होते. त्याच्यावर मेहमूद बेगडा या सुलतानाने आक्र मण केले, त्यात राणा वीरसिंह धारातिर्थी पडला. राणाची पत्नी राणी रूपबा लावण्यवती होती. मेहमूद बेगडाने तिच्याशी लग्नाची इच्छा प्रकट केली, तेव्हा राणी रूपबाने अट घातली की जर त्याने अर्धवट असलेली बाव पूर्ण केली तरच ती त्याच्याशी लग्न करेल. सुलतानाने तिला प्रभावित करण्यासाठी नाजूक कलाकुसर, कोरीव कामासह विहीर पूर्ण केली. पतीचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून राणी रूपबानं त्याच विहिरीत आत्मार्पण केलं. सोळंकी वास्तुशैलीचा नमुना असलेल्या या विहिरीचे वैशिष्टय़ म्हणजे इथले महिरपीदार स्तंभ. या विहिरीतील नक्षीकामात इस्लामी आणि हिंदू संस्कृतीच्या प्रतीकांची सरमिसळ दिसते. कोरीव कामातून राणी रूपबाच्या कथेप्रमाणोच जनसामान्यांच्या जीवनाचं दर्शनही घडवलेलं आहे. अशा खजिन्याच्या विहिरी आवर्जून पाहायला हव्यात. आपल्या नेहमीच्या पर्यटनात अशा थोडय़ा कमी माहितीच्या ठिकाणांचा समावेश केल्यामुळे पर्यटनाची रंगत अधिकच वाढते.
चांद बावडी
चांद बावडीमध्ये उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीचा संगम पाहायला मिळतो. अशा प्रकारच्या इतर विहिरींप्रमाणो या औरस चौरस विहिरीचा मुख्य उद्देश जलसंधारण हाच आहे. मात्र त्यासाठी निर्माण केलेली विहीर ही भारतीय वास्तुकलेचा अनोखा नमुना ठरली आहे. या चौकोनी आकाराच्या विहिरीची रचना मोठय़ा पेटीत लहान पेटी असावी (बॉक्स इनसाइड बॉक्स) अशी आहे. सुमारे तेरा मजले खोल असलेल्या या विहिरीच्या रचनेत पाय:यांच्या चौकटींचा पट रचलेला आहे. त्यामुळे वरून पाहताना आपण एक भौमितिक रचना पाहतोय अशी जाणीव सतत होत राहते. एकूण 35क्क् अरुंद पाय:यांची केलेली रचना एखाद्या दृष्टिभ्रमाच्या चित्रसारखी वाटते. सुमारे शंभर फूट खोल असलेल्या चांद बावडीच्या सगळ्या पाय:या उतरून आपण जेव्हा विहिरीच्या तळाशी पोहोचतो, तेव्हा काठावरचे तपमान आणि आतले तपमान यातला पाच- सहा अंशाचा फरक लगेच जाणवतो.
makarandvj@gmail.com