न घडलेले फोटोसेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:04 AM2019-06-16T06:04:00+5:302019-06-16T06:05:09+5:30
माझ्या प्रकाशचित्नांच्या मैफलीत उस्ताद सज्जाद हुसैन यांचा फोटो हवाच याची आस मला लागली होती. त्यांना भेटायला तर मी त्यांच्या घरी गेलो; पण त्यांचा फोटो काढता आला नाही. आता तर तेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे माझ्या कल्पनेतून त्यांचं चित्न मी काढलंय. जमेल तसं.
- सतीश पाकणीकर
पुण्याच्या रेणुका स्वरूप शाळेचे पटांगण हे पूर्वी संगीताच्या वेगवेगळ्या कार्यक्र मांसाठी फारच प्रसिद्ध होते. सवाई गंधर्व महोत्सवाचे ठिकाणही तेव्हा तेच होते. संध्याकाळपासून उतरणारी गुलाबी थंडी अंगांगावर लपेटून घेत स्वरांचा आस्वाद घेताना पूर्वेकडून सूर्याची कोवळी किरणे कधी ऊब निर्माण करीत हे रसिकांना कळतही नसे. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या अशा अनेक मैफलींच्या आठवणी, त्यांचे किस्से आजही रसिक काल घडल्याप्रमाणे जेव्हा सांगतात त्यावेळी ते प्रत्यक्ष ती मैफल जगत असतात यात शंकाच नाही.
अशीच एक मैफल. पांढर्या रंगाचा बुश शर्ट व पॅन्ट परिधान केलेला एक उस्ताद स्वरमंचावरून त्याच्या हातातल्या वीतभर वाद्यावर अशी काही नजाकतीने बोटे फिरवत होता की त्याने निर्माण केलेल्या स्वर-स्वप्नात तेथील सर्वच र्शोते हरवून गेले होते. ही आठवण आहे साधारण 1980 सालच्या आसपासची. त्यावेळी क्लोज सर्किट टीव्ही वगैरे सोयी नसल्याने पाठीमागील रसिकांना त्यांच्या जागेवरून केवळ ठिपक्याएवढा दिसणारा हा कलाकार जो स्वर्ग उभा करतोय त्याच्या र्शवणानंदातच धन्यता मानवी लागे. पण आपल्या कानावर जे संगीत पडतंय ते स्वर्गीय आहे याची मात्न प्रत्येकालाच अनुभूती येत होती. त्या उस्तादाचं नाव होतं ‘सज्जाद हुसैन’ आणि त्याचं वाद्य होतं मेंडोलीन. हो ! तेच ते, प्रतिभावंत सिनेसंगीतकार सज्जाद हुसैन ! त्यातून निवेदकाने कार्यक्र माच्या आधीच सांगितले होते की - ‘‘आज सकाळपासूनच सज्जाद साहेबांना अंगात ताप आहे. तरीही आपल्या र्शोत्यांची निराशा होऊ नये यासाठी ते अंगात ताप असतानाही वादन करणार आहेत. वेगवेगळी एकोणीस वाद्ये त्यांना वश आहेत. पण आज ते आपल्यासाठी मेंडोलीनवर रागदारी सादर करणार आहेत.’’
- मेंडोलीन या छोट्याशा वाद्याला असलेल्या र्मयादा सज्जाद हुसैन नावाच्या जादूगाराच्या हातात कापुराप्रमाणे उडून जातात याचा साक्षात्कार होण्याची रात्न होती ती. त्या मैफलीत सज्जाद साहेबांनी असे काही स्वरलोट निर्माण केले की, त्यांनी शेवटची एक ‘गत’ सादर केल्यावर टाळ्या वाजवण्याचे साधे भानही रसिकांना राहिले नाही. एक मिनिटाची नि:शब्द शांतता आणि मग मात्न ‘स्टँडिंग ओव्हेशन’! त्या गर्दीतून कशीबशी वाट काढत मी पुढे घुसलो. शालेय जीवनात ऐकलेल्या ‘बदनाम महोब्बत कौन करे’, ‘दिलमें समा गये सजन’, ‘धरती से दूर गोरे बादलोंके पार’, ‘ये हवा ये रात ये चांदनी’, ‘वो तो चले गये ऐ दिल’, ‘हम न भूलेंगे तुम्हे अल्ला कसम’, ‘ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है’ अशा एकापेक्षा एक मधाळ गाण्यांच्या निर्मात्याला जवळून पाहता यावे यासाठी. ते स्टेजवरून उतरत असतानाच मी पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा तो मऊसुत हात हातातही घेतला. निवेदकाने सांगितलेले शब्दश: खरे होते. सज्जाद हुसैन तापाने फणफणलेले होते.
पुढे 1983 साली माझी कॅमेर्याशी मैत्नी झाली. मी शास्रीय संगीताच्या प्रत्येक मैफलीत कॅमेरा घेऊनच हजेरी लावू लागलो. माझ्या संग्रहात अनेक कलाकारांच्या भावमुद्रा जमू लागल्या. त्या भावमुद्रांचे एक प्रदर्शन करण्याचा विचार डोक्यात घट्ट होऊ लागला. त्या निमित्ताने माझ्या आठवणींच्या डोहातून उसळी मारून एक नाव वर आले. ‘उस्ताद सज्जाद हुसैन’. त्यांचा फोटो हवाच या प्रकाशचित्नांच्या मैफलीत.
त्यांना भेटायचं ठरलं. मी कॅमेरा बॅग लटकावून निघालो मुंबईला. त्यांचा पत्ता अंदाजाने समजला होता. तो म्हणजे - माहीम कॉजवेच्या जवळ एक दर्गा आहे त्याच्या आसपास राहतात ते. दादर स्टेशनवर उतरून मी चालतच सीतलादेवी मंदिराकडून माहीम कॉजवेकडे जाणार्या गजबजलेल्या रस्त्यावर पोहोचलो. दर्गा सापडला. त्याच्या शेजारीच असलेल्या एका अतिशय जुन्या अशा चाळवजा इमारतीत मी विचारणा केली. तिथल्या एका इसमाने बोटानेच एक घर दाखवले. पत्ता सापडला. 11 वाजत आले होते. लाकडी जिन्याने वर गेलो. एका बाल्कनीत पोहोचलो. उजव्या बाजूस दोन फळ्यांचे एक दार होते. सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा एक मानाचा शिलेदार इथे राहत असावा असे भासवणारी एक अंधुकशीही खूण तेथे नव्हती.
धडधडत्या हृदयाने दारावरची बेल वाजवली. दोन मिनिटांच्या शांततेनंतर दरवाजा उघडला गेला. समोर बाहीचा बनियन, पांढरी हाफ पँट, डाव्या हातात एक कागद, उजव्या हातात नुकताच डोळ्यांवरून काढलेला चष्मा आणि चेहर्यावर उदंड असे ‘प्रश्नचिन्ह’ घेऊन एक व्यक्ती उभी होती. साक्षात संगीतकार सज्जाद हुसैन. ते स्वत:च दरवाजा उघडतील अशी मी स्वप्नातही अपेक्षा न केल्याने थोडा गोंधळून गेलो. पण मग सावरून मी माझी ओळख त्यांना करून दिली. माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यात पाच-सात मिनिटे गेली असतील. ‘प्रश्नचिन्हा’ची तीव्रता जराही कमी झाली नव्हती. ते दरवाज्याच्या आत आणि मी दरवाज्याच्या बाहेर. माझे निवेदन त्यांनी शांतपणे ऐकून घेतले व नंतर ते हातातील कागद दाखवत मला म्हणाले - ‘‘देखो बेटा, मैं अभी एक काम में बिझी हूं. दोपहर तक यह काम चलेगा. ऐसा करो .. तुम ठीक 3 बजे आ जाओ. फिर देखेंगे.’’ मी मान हलवली. त्यांच्या स्वभावाबद्दल बरेच ऐकले होते. त्यांनी नकार तर नाही ना दिला, या विचाराने तेथून निघालो.
साधारण चार तास माझ्या हातात होते. परत दादरला येऊन भरपूर टाइमपास केला. पावणेतीनला परत त्या दग्र्यापाशी पोहोचलो. त्या इमारतीच्या बाहेरच थांबलो. आपल्याकडून उशीर व्हायला नको म्हणून. बरोबर 3 वाजता पुन्हा एकदा दारावरची बेल वाजवली. आता एका दुसर्याच व्यक्तीने दरवाजा उघडला. मी परत एकदा सगळे निवेदन केले व उस्तादजींनी मला 3 वाजता बोलावले आहे असे सांगितले. त्या व्यक्तीनेही माझे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व नंतर ते मला म्हणाले- ‘‘अच्छा आपही सुबह आये थे? मैं उनका बेटा हूं. अब्बाजीने आपके लिये मेरे पास मेसेज दिया है की, अगर आपको उनकी तस्वीरे उतारनी हो तो महेफिल का माहौल बनानेके लिये अगली बार आते वक्त कॅमेरेके साथ एक तानपुरा और एक मायक्र ोफोन भी लाना.’’
- पुढच्याच क्षणी मी तो जिना उतरू लागलो होतो. माझं एक मन खूपच निराश झालं होतं, तर दुसरं मन म्हणत होतं की त्यांची प्रत्यक्ष भेट झाली हे काही कमी आहे का? करू प्रयत्न परत एकदा.
माझं पहिलं-वहिलं प्रकाशचित्न प्रदर्शन 1986 सालच्या जून महिन्यात सज्जाद हुसैन यांच्या फोटोशिवायच पार पडलं. नंतर मी औद्योगिक प्रकाशचित्नण करण्यात गुरफटत गेलो. पुन्हा कधी त्यांची शास्रीय संगीताची मैफल ऐकण्याचा योगही आला नाही. तसेच तानपुरा आणि मायक्रोफोन घेऊन जाण्याचाही योग आला नाही. 21 जुलै 1995 रोजी सज्जाद हुसैन नावाचा हा अवलिया संगीतकार पैगंबरवासी झाला. माझ्या मनातील त्यांचा फोटोसेशन तसाच राहून गेला.
‘मान रे’ नावाच्या एका अमेरिकन फोटोग्राफरने असं म्हणून ठेवलं आहे की ह्लक स्रं्रल्ल3 6ँं3 ूंल्लल्ल3 ुी स्रँ3ॅ1ंस्रँी,ि 2ेी3ँ्रल्लॅ ा1े 3ँी ्रेंॅ्रल्लं3्रल्ल ङ्घ क स्रँ3ॅ1ंस्रँ 3ँी 3ँ्रल्लॅ2 क ल्लि3 6ंल्ल3 3 स्रं्रल्ल3, 3ँ्रल्लॅ2 3ँं3 ं1ी ं’1ीं8ि ्रल्ल ी7्र23ील्लूी.ह्व
‘‘सज्जादसाहेब, मला तुमची प्रकाशचित्ने तर टिपता आली नाहीत. आता तर तुम्ही अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे ‘मान रे’च्या म्हणण्याप्रमाणे माझ्या कल्पनेतून माझ्या कलेद्वारे मी तुमचे चित्न तर काढू शकतो ! ते चित्न मी काढलंय. मला जसं जमेल तसं. गोड मानून घ्या.’’
‘‘सज्जादसाहेब, दुसरं असं की माझ्या आधीच्या पिढीने तुमच्या संगीतावर प्रेम केलं. माझ्या पिढीतीलही बर्याच जणांना तुमचे नाव माहीत होते. पण आजकालच्या गाण्यात संगीताचा अभाव असलेल्या अशा काळात एक आशेचा किरण मी पाहिला आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या गाडीतील डेकवर प्रवासात आम्ही गाणी ऐकत होतो. तुमचं ‘रु स्तुम सोहराब’मधील गाणं लागलं. माझ्या आठ वर्षाच्या मुलानं ते गाणं परत परत ऐकायचा हट्ट केला. गाणं होतं ‘‘ऐ दिलरुबा नजरे मिला. कुछ तो मिले गम का सिला..’’
‘‘सज्जादसाहेब, येणारा सांगीतिक काळ कसाही असला तरी तुम्ही निर्माण केलेल्या कालातीत अशा संगीत रचनांचा आम्हाला मिळणारा आनंद तुमच्या स्वभावाच्या ऐकलेल्या, घडलेल्या अथवा न घडलेल्या अशा अनेक किश्श्यांच्या पार्श्वभूमीवर कायमच दशांगुळे वर राहील.’’
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)