सच्च्या प्रेमाची अधुरी कहाणी.
By admin | Published: February 13, 2016 05:36 PM2016-02-13T17:36:07+5:302016-02-13T17:36:07+5:30
आपल्या रुबाबदार आणि आकर्षक रूपानं दर्शकांना घायाळ करणारा सारस पक्षी अनोख्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हे कधीकाळी सारसांचं माहेरघर होतं. पण आता तिथेही त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही नाही.याच सारसांना त्यांचं हक्काचं घर पुन्हा मिळवून देण्यासाठी गोंदियावासी सज्ज झाले आहेत.प्रेमदिवस म्हणून मानल्या जाणा:या आजच्या व्हॅलेण्टाइन्स डेला त्यांच्यावरील प्रेमाचा स्वीकार करून ‘सारस संमेलनाचा’ समारोप होईल.
Next
>आपल्या रुबाबदार आणि आकर्षक रूपानं दर्शकांना घायाळ करणारा सारस पक्षी अनोख्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हे कधीकाळी सारसांचं माहेरघर होतं. पण आता तिथेही त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही नाही.याच सारसांना त्यांचं हक्काचं घर
पुन्हा मिळवून देण्यासाठी गोंदियावासी सज्ज झाले आहेत.प्रेमदिवस म्हणून मानल्या जाणा:या
आजच्या व्हॅलेण्टाइन्स डेला त्यांच्यावरील प्रेमाचा स्वीकार करून ‘सारस संमेलनाचा’ समारोप होईल.
- मनोज ताजने
पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर आणि रुबाबदार पक्षी कोणता?
अनेक नावं आपल्यासमोर येतील, पण त्यात एक नाव नक्कीच असेल, ते म्हणजे सारस पक्ष्याचं.
‘उडणारा सर्वात मोठा पक्षी’ म्हणूनही सारसाची विशेष नोंद आहेच.
चालताना आणि उडतानाचीही त्यांची ऐट केवळ पाहण्यासारखी. पाहताक्षणीच नजर खिळून राहावी असं या पक्ष्याचं राजबिंडं रूप! 5 ते 6 फूट उंची, राखाडी पांढरा रंग, डोक्यापासून गळ्यार्पयत गर्द लाल रंग, लांबलचक मान आणि पाय, टणक चोच. सारस पक्ष्याला मुक्तपणो विहार करताना न्याहाळणं म्हणजे एक पर्वणीच. अनेक पौराणिक ग्रंथांमध्येही सारसाचा उल्लेख आढळतो.
याच सारस पक्ष्यांना भारतीय संस्कृतीत प्रेमाचं प्रतीकही मानलं जातं, याचं कारण आपल्या जोडीदारावर असलेलं त्यांचं नितांत आणि निरपेक्ष प्रेम. एकदा आपला जोडीदार निवडला की बहुतांश वेळा आयुष्यभर ते एकमेकांना साथ देतात, एकमेकांशी एकनिष्ठही राहतात.
आपला जोडीदार जर दगावलाच तर त्याच्या विरहानं विलाप करणारा सारसही अनेकांनी पाहिला असेल. अनेकदा तर जोडीदाराच्या विरहानं ते स्वत:चा प्राणही त्यागतात, असंही म्हटलं जातं.
कदाचित त्यामुळेच असेल, राजस्थान-गुजरातमधील काही जमातीत लगA झालेल्या नवीन जोडप्यांना सारस पक्ष्यांच्या दर्शनासाठी पाठवलं जातं. जोडीदारासोबत कसं राहायचं, एकमेकांसाठी जगत असताना दुस:याच्या हिताचा कायमच कसा विचार करायचा आणि सहवासातून आपलं प्रेम वृद्धिंगत कसं करायचं, याची जाणीव नवपरिणित जोडप्यांना व्हावी हाच त्यामागचा उद्देश.
प्रेमाचं प्रतीक असलेला हा सारस पक्षी मात्र आज अख्ख्या जगातूनच हद्दपार होत चालला आहे. संपूर्ण जगभरात त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरली आहे.
जगात सारस पक्षी भारत, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियात मुख्यत्वे आढळतात. भारतात उत्तर प्रदेशात सर्वाधिक, त्याखालोखाल राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात सारसांचं अस्तित्व आहे. महाराष्ट्रात मात्र केवळ गोंदिया जिल्ह्यातच सारस दिसतात. त्यांचं तिथलं अस्तित्वही आता हळूहळू नामशेष होऊ लागलं आहे. आधीच त्यांचं प्रजननाचं प्रमाण कमी, त्यात मोठय़ा प्रमाणात त्यांची शिकार होत असल्यानं अतिदुर्मीळ पक्ष्यांत त्यांची गणना होते.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानालगतच्या विस्तीर्ण जलाशयासह जिल्ह्याच्या इतरही अनेक भागात सारसांचं फार पूर्वीपासून अस्तित्व होतं. मात्र शिका:यांची वक्रदृष्टी आणि शेतात पिकांसाठी रासायनिक खतं, कीटकनाशकांचा वापर त्यांच्या जिवावर उठला.
आता केवळ गोंदिया जिल्हा आणि तिरोडा तालुक्यातील काही ठिकाणांवर, वैनगंगा नदीच्या काठावरील शेतांत सारसांचा तुरळक अधिवास दिसून येतो.
या पक्ष्याला वाचवण्याचा, त्यांची संख्या वाढवण्याचा आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या या पक्ष्यांप्रती जनसामान्यांत प्रेम जागविण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनानंही चंग बांधला आहे. अर्थातच त्यांच्या जोडीला सामाजिक संस्था, शेतक:यांचाही पुढाकार आहेच. त्यासाठी जिल्हा प्रशासनानं 15 डिसेंबरपासून सारस महोत्सवाचं आयोजन केलं आहे. प्रेमिकांचं प्रतीक असणा:या व्हॅलेण्टाइन्स डे’च्या दिवशी 14 फेब्रुवारीला या महोत्सवाचा समारोप होईल.
25-3क् वर्षापूर्वी पूर्व विदर्भात सारसांची संख्या अक्षरश: हजारोंच्या संख्येत होती. पण हळूहळू या परिसरातून ते नामशेष होत गेले. त्यामुळेच सारसांचं माहेरघर असणारा हा परिसर सारसांच्या अस्तित्वानं पुन्हा सचेतन व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सारसांची शिकार होऊ नये यासाठी जनजागृती होते आहे. सारसांच्या पोटात शेतातील विषारी घटक जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात ब:याच प्रमाणात यशही येत आहे.
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील शेवटचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्याला निसर्गाची मोठी देण आहे. गावागावांत असलेल्या छोटय़ा तलावांसह विपुल वनसंपदेने नटलेल्या या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागङिारा अभयारण्य आणि आता व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटकांचा ओढा नेहमीच या जिल्ह्यात असतो. वन्यजिवांच्या अधिवासासोबत दरवर्षी हिवाळ्यात येथे दाखल होणारे विदेशी पक्षी तर पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच. पण या जिल्ह्यात आता सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र झाले आहेत ते सारस. अस्सल प्रेमाची सच्ची अनुभूती देणा:या या सारस पक्ष्यांनाही अपेक्षा आहे ती आपल्यावरील प्रेमाची. आज व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशी त्याचाच सार्वत्रिक स्वीकार होतोय ही आशादायक गोष्ट आहे.
संमेलनातून जोडीदाराची निवड
वयात आलेल्या युवक-युवतींना जसे भावी जोडीदाराचे वेध लागतात तसेच वेध सारसांनाही लागतात. त्यातूनच एखाद्या शांत अशा निसर्गरम्य व सुरक्षित ठिकाणी सारस एकत्र येतात. जणू काही ते त्यांचे ‘परिचय संमेलन’च असते. उपवर-वधूंनी एखाद्या संमेलनात आपला परिचय द्यावा आणि त्यातून आपल्याला साजेसा आयुष्याचा जोडीदार निवडावा, अगदी तशीच निवड हे सारस पक्षी करतात. ‘बॅचलर’ सारस (नर व मादी) एखाद्या शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी एकत्र येतात. तिथे विशिष्ट आवाज करीत ते एकमेकांना साद घालतात. पंख हलवून विशिष्ट प्रकारचे नृत्य करून जोडीदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यातूनच नर आणि मादी सारसांचे सूर जुळतात. ज्यांनी एकमेकांना पसंत केले ते जोडीनिशी त्या संमेलनातून निघून जातात.
सारसांचे हे संमेलन वारंवार भरत नाही. दोन वर्षापूर्वी मार्च महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील मध्य प्रदेश सीमेकडील वाघ नदीलगतच्या एका शेतात सारसांचे संमेलन पाहायला मिळाले. त्यात एकावेळी 24 सारस आपल्या जोडीदाराची निवड करण्यासाठी सहभागी झाले होते. सारसांचे असे संमेलन पाहायला मिळणो हा एक दुर्मीळ योग असल्याचे पक्षीतज्ज्ञ सांगतात.
कुटुंबवत्सल सारस
सारस आकाराने मोठे असल्यामुळे ते झाडावर बसू शकत नाहीत. त्यांचे घरटेही जमिनीवरच शेतात असते. वर्षातून एकदा जुलै ते ऑगस्टदरम्यान सारस अंडी घालतात. पण सुरक्षित जागा मिळाल्याशिवाय ते घरटे बनवत नाहीत. विशिष्ट गवताचा जमिनीवर (शेतात) ढिगारा बनवून त्यावर ते अंडी घालतात. एकावेळी एक किंवा दोन अंडी देतात. 3क् ते 32 दिवस ती अंडी उबवितात. यादरम्यान नर किंवा मादा कोणीतरी एकजण सतत त्या अंडय़ाचे रक्षण करीत असतात. विशेष म्हणजे पिलू मोठे होईर्पयतही ते त्याला सोबत ठेवून त्याच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळतात. दोन वर्षानंतर पिलाची परिपूर्ण वाढ होऊन ते जोडीदाराचा शोध घेतात.
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत
उपसंपादक आहेत.)
manoj.tajne@lokmat.com