व्हिसाचा अर्ज

By admin | Published: August 26, 2016 04:49 PM2016-08-26T16:49:09+5:302016-08-26T17:28:04+5:30

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र

Visa application | व्हिसाचा अर्ज

व्हिसाचा अर्ज

Next

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!


अमेरिकेच्या व्हिसासाठी मी किती आधी अर्ज  करायला हवा?
- अमेरिकेच्या व्हिसासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा, हे उत्तम! तुमच्या अमेरिका प्रवासाचं नियोजन पक्कं होईपर्यंतही वाट पाहू नये. अमेरिकेत जायचं ठरल्यावर व्हिसाचा अर्ज सर्वात आधी करून ठेवावा. काही प्रकारचे व्हिसा अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जाऊ शकतो. किंवा अर्जदाराकडून त्यांनी सादर केलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती लागू शकते. त्यामुळे वेळेआधीच अर्ज करणं उत्तम! व्हिसा हातात पडल्यानंतरच विमानाची तिकिटं, अमेरिकेतल्या हॉटेलमधली आरक्षणं करावीत.

मला कौटुंबिक कारणासाठी तातडीनं अमेरिकेला जायचं आहे, पण व्हिसासाठीच्या मुलाखतीच्या तारखा पुढचे अनेक दिवस उपलब्ध नाहीत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीच्या व्हिसासाठी लवकरची अपॉइण्टमेंट मला मिळू शकते का? 
- हो, अशी व्यवस्था होऊ शकते. अनेकांना तातडीच्या कारणांमुळे प्रवास करावा लागतो. जिथे प्रवासाची व्यवस्था आधी करणं शक्य नसतं अशी काही कारणं / शक्यता व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्ससाठी ग्राह्य धरल्या जातात. तातडीची वैद्यकीय सेवा, अमेरिकेतल्या नातेवाईकाचं अगर अर्जदार ज्याच्या सेवेत आहे अशा व्यक्तीचं अचानक उद्भवलेलं आजारपण याबरोबरच नातेवाइकाचा मृत्यू, अंतिम विधी अशा कारणांसाठी व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्स मिळू शकतात. 

 http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर Apply for an expedited appointment' या शीर्षकाखाली या प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.
मात्र पूर्वनियोजित व्यावसायिक बैठका, परिषदा, पदवीदान सोहळे, लग्नसमारंभ आदि कारणांसाठी ही सुविधा मिळत नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे भारतातल्या अमेरिकन वकिलातींमध्ये असलेले अपुरे मनुष्यबळ. 
गेल्या पाच वर्षांत अमेरिकन व्हिसासाठीच्या अर्जात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात अमेरिकन वकिलातींनी भारतातील एक लाख व्हिसा अर्जांवर प्रकिया केली आहे. वाढीव मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी भारत सरकारशी नियमित संवाद सुरू आहे. मात्र, या ‘समर सिझन’मध्ये व्हिसा अपॉइण्टमेंटच्या प्रतीक्षा यादीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट :

 



व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :
 

Web Title: Visa application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.