दृश्य वृत्ती, कला व डिझाइन
By Admin | Published: November 8, 2015 06:27 PM2015-11-08T18:27:18+5:302015-11-08T18:27:18+5:30
एवढय़ात असा प्रश्न पडला की, चित्रकलेच्या शिक्षणाने मला काय दिले? या प्रश्नाचे उत्तर ‘चित्र काढायचे कसब दिले’ इतके साधे होते.
- नितीन कुलकर्णी
एवढय़ात असा प्रश्न पडला की, चित्रकलेच्या शिक्षणाने मला काय दिले? या प्रश्नाचे उत्तर ‘चित्र काढायचे कसब दिले’ इतके साधे होते. म्हणजे चित्रंची वेगवेगळी तंत्रं अवगत करवली, इतिहासातल्या कलेचा अभ्यास करवला, त्यातूनच समकालीन कलेचे भान दिले, स्वत:च्या कलाजाणिवांची समज व कुवत दिली असे बरेच काही सांगता येईल. परंतु या सगळ्यातून आपण कलाकार म्हणून सिद्ध होऊन समाजासमोर उभे राहण्याची क्षमता हेतुपूर्वक दिली का? (या प्रश्नातला ‘हेतुपूर्वक’ हा शब्द महत्त्वाचा आहे.) याचे उत्तर नाही असेच मिळेल. आमच्या कलाशिक्षकांनी तर तेव्हाच जाहीर करून टाकले होते की ‘कला’ शिकवताच येत नाही, कलेचे तंत्र फक्त शिकवता येते !
इथे कला व कलेचे तंत्र हे वेगवेगळे भाग आहेत असे सिद्ध झाले. म्हणजे तसा आभास तरी तयार झाला. स्वत:चे ‘वेगळे’ असे दृश्य तयार करणो म्हणजे कला, असे समीकरण दृढ झाले. आणि वेगळेपणा आणण्यासाठी स्वत:चा शोध घ्यायचा हे तत्त्वज्ञान लागू झाले. कलेचे तंत्र शिकण्यापेक्षा हे काहीसे वेगळे होते. यात असे सांगण्याचा प्रयास होता की कलेच्या चयापचयामधून काही वेगळे निघायचे असेल तर कलेच्या गुणात्मकतेशी संलग्न राहिले पाहिजे, आणि हे करण्यासाठी ‘स्व’चा शोध घेतला पाहिजे. फक्त तंत्र शिकवणारा अभ्यासक्रम बदलून गुणात्मकतेशी सांगड घालणारे एक अध्यापक आमच्यावर कार्यरत होते ते म्हणजे प्रभाकर कोलते सर. अर्थात त्यांनी आमच्यासारख्या घोडय़ांना पाण्यापर्यंत आणून तर सोडले पण पाणी प्यायचे कसे यात बरेच चाचपडणो झाले. वर्षे गेली. आज जवळपास 25 वर्षांनंतर ‘कलाशिक्षणाने काय दिले?’ असा प्रश्न समोर आला, आणि काही वेगळे उत्तर मिळते आहे. अर्थात ‘डिझाइन’च्या शिक्षणक्षेत्रतील आत्तापर्यंतच्या अनुभवाचा हा परिणाम असावा. आता माङयातल्या घोडय़ाला पाण्यात तोंड घालता यायला लागले असे वाटते. ‘चित्रकला सर्वप्रथम ‘दृश्य’ असते’ हे वाक्य माङया आत घुमते. ‘दृश्य’ हे सामान्यपणो सर्वांच्याच बोधनाचा भाग असते, चित्रकार ते बोधन पुढे घेऊन जातो आणि त्याचे चित्रत रूपांतर करतो.
सामान्य लोक जे बोधन होऊनही दुर्लक्ष करतील तेच कदाचित तो पकडतो. ‘चित्र प्रत्यक्षाचे अनुकरण असते आणि हे प्रत्यक्ष सत्याचे रूप असते’. चित्रकार सुरुवातीला बघणारा असतो. टक लावून बघणो त्याला चांगले येते. म्हणजे बघू नये असे जे जे सांगितले जाते, ते ते चित्रकार बघत असतो. म्हणजे त्याला समाजाच्या दृष्टीने वाईट वळण लागलेले असते आणि तसे ते लागणो आवश्यक असते. बघता बघता तो प्रत्यक्षाचे अनुकरण करायला लागतो व त्याला त्यानेच तयार केलेल्या प्रत्यक्षाच्या रूपातून सत्याची जाणीव होते. नंतर नंतर असेही होते की, आधी जाणीव झाली आणि नंतर अनुकरण. या सगळ्या प्रक्रि येत त्याला एका गोष्टीची मात्र सुतराम कल्पना नसते की प्रत्यक्षाची जाणीव हेदेखील ‘रूप’च असते (रीप्रेङोंटेशन). उदाहरण द्यायचे तर ‘समजा तुमच्या नजरेसमोर एक वस्तू आली (सोबत दिलेले चित्र पाहा) तर क्षणार्धात तुम्हाला तिची ओळख पटेल. ‘मडके’ असा अस्फुटसा उद्गार आत तयार होईल. हे कशामुळे होते? आपला मेंदू त्याला मिळालेल्या दृश्य तरंगांचे स्मृतींच्या आधारे विश्लेषण करून आपल्याला माहिती देतो. ही माहिती ज्याला आपण ‘प्रत्यक्ष’ आणि नंतर वास्तव संबोधतो, हे एक प्रकारचे ‘वर्णन’च असते (1ीस्र1ी2ील्ल3ं3्रल्ल). अशा वर्णनाची आपल्याला सवय होते आणि आपण लगेच. ‘मडके’ असे म्हणतो, वस्तू ओळखतो, त्या ओळखीच्या अलीकडे अथवा पलीकडे जात नाही. ‘अलीकडे’ विज्ञान आणि मानसशास्त्र असते आणि ‘पलीकडे’ जाते कला.
पतंजली योगसूत्रवरचे स्वामी विवेकानंदांनी केलेले विवेचन वाचनात आले. यात दोन मानसिक प्रक्रिया सांगितल्या आहेत- ‘चित्त’ व ‘वृत्ती’. मला डोळा आहे, पण डोळा बघू शकत नाही, त्याला मेंदूची गरज लागते. समजा मेंदूमधले डोळ्याचे केंद्र काढून टाकले तर काय होईल? डोळा अस्तित्वात असेल, नेत्रपटलावर प्रतिमादेखील असेल आणि तरीही डोळा काहीही बघू शकणार नाही. म्हणजे डोळा हे द्वितीय श्रेणीचे इंद्रिय आहे. ते दृष्टीचे इंद्रिय नव्हे.
पतंजलीने वृत्ती विविध प्रकारच्या सांगितल्या आहेत ज्या पीडादायक वा सुखद असू शकतात, इथे हे विवेचन सयुक्तिक आहे म्हणून घेतो.
1) योग्य सूचन- बोधन, तर्कव पुरावा, यथाथ्यता. 2) गैरसमज- अयोग्य सूचन, जे आहे व जे दिसते त्यात तफावत जाणवते. 3) कल्पना- अशा प्रकारचे ज्ञान जे कल्पनेवर आधारित आहे, प्रत्यक्षाचा ज्याचा काही संबंध नाही. 4) निद्रा- नाही पणाच्या जाणिवेतून तयार होणारी स्वप्नावस्था. 5) स्मृती- आधी पाहिलेल्या प्रतिमांचे ज्ञान पुसले न जाणो व परत परत पुनरावृत्ती होणो. जर बारकाईने बघितले तर असे लक्षात येईल की वरील सांगितलेल्या सर्व वृत्ती चित्रकाराच्या प्रक्रियेचादेखील भाग असतात. परंतु या सर्व चित्रनिर्मितीशीच निगडित असतात. म्हणजे ‘चित्र कसे काढायचे’ याच्याशीच संबंध असतात. आपण आता या वृत्तींचा विचार पूर्व प्रक्रियेसंदर्भात करू म्हणजे केवळ दृश्य दिसणो या क्रियेसंदर्भात. यात चित्रकारांच्या बरोबरीने दर्शकाच्या क्रियेचादेखील अंतर्भाव होतो आणि एकंदर चित्रकला अथवा दृश्यकला ही या प्रक्रियांवर कशी आधारित असते याचे विश्लेषण करू. हे करत असताना आपल्याला कलाबाह्य उदाहरणांचादेखील अंतर्भाव करावा लागेल. ‘कला व्यवहार’ ही एक अवघड प्रक्रिया आहे कारण यात दोन चित्तवृत्तींचे साहचर्य व संघर्ष होत असतो. ‘अंतस्थ’ व ‘बाह्य’ या दोन्ही प्रक्रिया व प्रतिक्रिया दोघांच्या असतात- चित्रकाराच्या आणि दर्शकाच्या. चित्रकाराची ‘चित्त वृत्ती’ जेव्हा कार्यरत असते तेव्हा त्याला काही प्रतिमा आवडतात किंवा तो त्यांची निवड करतो, ज्या बाह्य जग व त्याच्या विचार तरंगांचा परिणाम असतात. चित्रत दाखवताना मात्र त्या दृश्याचे विविक्षित प्रतिमेमध्ये (238’ी) रूपांतर होते. चित्तवृत्तींच्या खुणा त्यात अंतर्भूत होतात पण लपल्या जातात, म्हणजे सहजपणो लक्षात येत नाहीत.
या उलट दर्शकाची प्रक्रि या पाहिली की असे लक्षात येईल की वृत्तींचा वापर इथे चित्रचा अर्थ लावण्यासाठी होतो. आणि या वृत्तींची निर्मिती एकंदर बाह्य जगाच्या प्रभावामुळे होते, आणि जगात जसे ओळखण्याला महत्त्व असते तसेच ते इथेही दिले जाते. सामान्य माणूस त्या खुणा बाह्य जगाच्या अनुभवांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, तर चित्रकलेचा जाणकार इतिहासातल्या चित्रप्रतिमांमध्ये (238’ी) शोधण्याचा प्रयत्न करतो. ओळख आपल्या सगळ्यांनाच महत्त्वाची असते. जी दृश्य वृत्तींशी निगडित आहे. दर्शक व चित्रकार दोघांच्याही प्रक्रियांमध्ये ‘दृश्य वृत्तींचा’ अंतर्भाव असतो. आणि चित्रकार हा आधी एक माणूस असतो व नंतर त्याच्यात चित्रवृत्तींचे (कला) जाणीवपूर्वक संगोपन होते. यापुढे आपण या सर्वगामी अशा दृश्य वृत्तींवर भर देऊ. आपल्या आयुष्यात दृश्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे ‘दृश्य’ असे म्हणताना आपण दिसणो आणि दाखवणो या दोन कृतींसंदर्भात बोलत आहोत. म्हणजे जे डोळ्यांना दिसते ते हा मूलभूत अर्थ यातच अंतर्भूत आहे. डोळ्यांना काय काय दिसते? असा प्रश्न विचारला तर ते स्पष्ट होईल. निसर्ग, वस्तू आणि माणसे यात असंस्कारित निसर्ग फक्त अपवाद, बाकी सर्व माणसाने बनवलेले असते. नीटनेटकेपणा, वेष-पेहराव, दागिने, फर्निचर, घरातल्या वस्तू, त्यांची रचना, सुशोभिकरण या सर्वांमध्ये दृश्याचा अंतर्भाव असतो. इथे दृश्याची व्याख्या करताना अगदी मूलभूत तत्त्वाचा विचार करावा लागेल. ‘एका प्रकारच्या दिसण्यासाठी हेतुपूर्वक केलेली पूर्वनियोजित रचना, मांडणी अथवा निवड’. रचना, मांडणी अथवा निवड असे म्हणावे लागते कारण जीवनाला आवश्यक प्रत्येक गोष्ट आपण स्वत: बनवत नसतो. रोज आपण काय बनवतो? ज्यात दिसणो व दाखवणो एक भाग असते? असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर खाण्याच्या वस्तू (स्वयंपाक) असे असेल. अर्थात इथे खाणो महत्त्वाचे असले तरी तो पदार्थ चांगला दिसावा लागतो, तसेच तो चांगला झाला की नाही हे चव, आवाज, वास याबरोबरच दिसणो यातूनदेखील समजत असते.
जीवनात इतर बहुसंख्य वस्तू आपण जाणीवपूर्वक निवडत असतो, तयार करत नसतो. या निवडीवरून आपली आवड, संस्कार व त्यातून आपल्या जीवनाबद्दलची दृष्टी प्रदर्शित होत असते. प्रत्येक माणूस आणि पर्यायाने समाज आपले दिसणो तयार करत असतो. हे दिसणो दाखवण्याच्या गरजेतून तयार होते. इथे तुम्ही म्हणाल की प्रत्येक गोष्ट आपण दुस:यांसाठीच करत नसतो, काही स्वत:साठीदेखील असतात. म्हणजे अमुक प्रकारे दिसणो हे स्वत:ला दाखवण्याच्या भावनेतून तयार होते. उदाहरणार्थ सकाळी आरशात बघून आपण आपला चेहरा, भांग पाडून दर्शनीय बनवतो. स्त्रिया यापुढे जाऊन मेक-अप करतात अथवा दागिने घालतात, ज्यात दाखवण्याचा भाग जास्त असतो. अर्थात याने त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो हे अमान्य करता येणार नाही, आणि यातदेखील स्वत:साठी दर्शनीय बनणो हेच अंतर्भूत असेल. दिसणो, दाखवणो आणि बघणो या तिन्हीही क्रियांसंदर्भातील आपली निवड अथवा विविक्षित ओळख याला आपण दृश्य वृत्ती म्हणतआहोत. ही वृत्ती कशावर अवलंबून असते? एकंदर आपले संस्कार, चालीरिती ज्या धर्माने घालून दिलेल्या असतात, तसेच आपल्या आर्थिक वर्गाचादेखील हा परिणाम असू शकतो. कलेच्या संदर्भात दृश्यवृत्ती या कलाकार, समीक्षक व दर्शक या तिघांमधे कार्यरत असतात; तर डिझाइनच्या संदर्भात डिझायनर, उत्पादक व उपयोगकर्ता या तिघांच्या संदर्भात कार्यरत असतात. फरक एवढाच असतो की, या प्रक्रियेचा जाणीवपूर्वक वापर दृश्यनिर्मितीत व्हावा असं दृश्यनिर्मात्याला अभावानेच वाटत असते. सर्जनाचे व्यवहार गृहितांमधून व काळाच्या आधारे चालू असतात. याउलट डिझाइनच्या संदर्भात या सर्व प्रक्रियेचा जाणीवपूर्वक अंतर्भाव व विचार केलेला असतो. बोधनाचा (उॅल्ल्र3्रल्ल) विविध पातळीवरचा अभ्यास व उपयोग डिझाइनरला करायचा असतो.
गेली 20 वर्षे डिझायनर्सच्या भावी पिढय़ा घडवताना कलाशिक्षक या नात्याने कलाप्रक्रि येत असलेली संदिग्धता डिझाइनच्या प्रक्रि येत आणू शकलो (ज्याची येथे गरज आहे) आणि डिझाइनमध्ये असलेली विश्लेषणात्मक स्पष्टता स्वत:मधे बाणवू शकलो.
हे होऊ शकले ते केवळ कलेतून डिझाइनकडे गेल्यामुळे.