वरवंटा

By admin | Published: January 16, 2016 01:23 PM2016-01-16T13:23:44+5:302016-01-16T13:23:44+5:30

मला बरे वाटावे, माझ्या बालपणीच्या आठवणी जश्याच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माझ्या छोटय़ा जुन्या जगातील सारी माणसे, पुस्तक विक्रे ते, जुनी हॉटेले चालवणारे मालक, जुने शेंगदाणो विक्रेते, जुनी भाजीवाली बाई, जुन्या इमारतींच्या पेठांमधील वाडय़ांचे मालक रोज संध्याकाळी रंगसफेदी करून, दिवाबत्ती करून, साजशृंगार करून माझी वाट पाहत बसणार आहेत की काय? की कधीतरी हा बाजीराव उगवेल तेव्हा त्याला सगळे जसेच्या तसे सगळे मिळावे?

Vivanta | वरवंटा

वरवंटा

Next
>- सचिन कुंडलकर
 
गेल्या आठवडय़ात मुंबईतील सुप्रसिद्ध रिदम हाउस हे जुने आणि महत्त्वाचे संगीताचे केंद्र बंद होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून प्रत्येक संगीतप्रेमी माणूस हळहळत आहे. प्रत्येकाला वाटते आहे की इतके जुने आणि चांगले दुकान बंद व्हायला नको. रिदम हाउस हे नुसते कॅसेट्स आणि सीडीज विकत घेण्याचे दुकान नव्हते, तर त्या दुकानामुळे तीन-चार पिढय़ांना जगभरातले उत्तम संगीत ऐकण्याची आणि संगीताचा संग्रह करण्याची सवय लागली. माङया अनेक मोलाच्या आठवणी काळाघोडा भागातील या दुकानाशी जोडल्या गेल्या आहेत. मी एकदा शेवटची भेट म्हणून तिथे पुढील आठवडय़ात जायचे ठरवले आहे. एका पत्रकाराने एवढे मोठे आणि महत्त्वाचे दुकान बंद करण्यामागचे कारण मालकांना विचारले असता, मालक त्याला व्यवहारी मनाने म्हणाले की, तुम्हाला वाईट वाटणो हे साहजिक आहे. पण वाईट वाटण्याने हे दुकान चालणार नाही. लोक आता पूर्वीसारखे इथे येत नाहीत. संगीत विकत घेत नाहीत. ते इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करतात. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तग धरायचा प्रयत्न गेली चार वर्षे करत आलो. पण आम्हाला या नव्या काळात टिकून राहणो आता शक्य नाही. 
गेल्या काही वर्षातला आपल्या देशातला हा एक ठळक अनुभव. चांगली पुस्तकांची दुकाने आणि चांगली म्युङिाक स्टोअर्स बंद होणो. आपण लहानपणी जिथून पुस्तके, संगीत, कॉमिक्स, आपल्या पहिल्या रंगपेटय़ा घेतल्या त्या सर्व जागा एकामागून एक नाहीशा होत जाणो. प्रत्येक वेळी एक पुस्तकाचे ओळखीचे दुकान बंद झाले, एक म्युङिाक स्टोअर नाहीसे झाले की मला खूप वाईट वाटत राही. मी त्याच्या आठवणी काढत राही. फेसबुकवर त्याचे जुने फोटो टाकत बसे. आपले आवडते जुने इराणी रेस्टॉरण्ट गेल्या वेळी होते, आज अचानक पाहतो तर नाही, तिथे काहीतरी वेगळेच उभे राहिलेय. ते चिनी आजी- आजोबा प्रेमाने चिनी जेवणाचे हॉटेल चालवत होते, ते सगळे आवरून कुठे गेले? मी लहानपणी असंख्य कॉमिक्स आणि चांदोबाचे अंक ज्यांच्याकडून घ्यायचो ते दातेकाकांचे अलका टॉकिजसमोरचे दुकान आता उदास होऊन बंदच का असते? आपल्याला ताजे पाव आणि नानकटाई बनवून देणारी ती जुनी बेकरी बंद झालेली आपल्याला कळलेच नाही. घराजवळची पिठाची गिरणी जाऊन तिथे हे काय आले आहे?  
हळूहळू मला सवय लागली. आपल्या मनातले आणि आपल्या आठवणीतले शहर नष्ट होत जाण्याकडे बघायची सवय. 
मी पुस्तकांबाबत फार हळवा आहे. त्यामुळे पुस्तकांची दुकाने गेल्याचे आणि तिथे मोबाइलची दुकाने आल्याचे काळे डाग माङयावर खूप वेळ राहत. नंतर काही चांगले पाहिले, कुणी काही चांगली जागा नव्याने तयार केली की असे वाटे की हे सगळे टिकून राहो. कारण सध्या सगळे फार वेगाने वितळून जाते. पण काळ ही गोष्ट आतल्या गाठीची आणि काळाची पावले ओळखण्याची कला आपल्या रोमॅण्टिक मराठी मनाला अजिबातच नाही. 
मला अनेक वेळा काही कळेनासे होई. हे सगळे होते आहे त्यासाठी माणूस म्हणून मी काय केले पाहिजे? या चांगल्या जागा, उत्तम जुनी दुकाने, महत्त्वाच्या संस्था बंद पडू नयेत, विकल्या जाऊ नयेत म्हणून मी काय करावे? रिदम हाउसच्या मालकाची मुलाखत वाचली आणि मला शांत साक्षात्कार झाला. आपण ज्या जागा बंद पडल्या त्या जागा पाहायला, तिथून पुस्तके आणायला, त्या लोकांना भेटायला गेल्या काही वर्षात किती वेळा गेलो? - खूपच कमी. बंद पडल्याची बातमी आली नसती तर अजून वर्षभर तरी मी तिथे पाऊल टाकले नसते. 
मी पण सध्या बिनधास्त इंटरनेटवरून पुस्तके ऑर्डर करतो, संगीत डाउनलोड करतो. एका जागी मिळते म्हणून सुपर मार्केटमधून सामान आणतो. मग मला बरे वाटावे आणि माङया बालपणीच्या आठवणी जश्याच्या तश्या टिकून राहाव्यात म्हणून भुकेकंगाल राहून माङया छोटय़ा जुन्या जगातील सारी माणसे, पुस्तक विक्र ेते, जुनी हॉटेले चालवणारे मालक, जुने शेंगदाणो विक्रेते, जुनी भाजीवाली बाई, जुन्या इमारतींच्या पेठांमधील वाडय़ांचे मालक रोज संध्याकाळी रंगसफेदी करून, दिवाबत्ती करून, साजशृंगार करून माझी वाट पाहत बसणार आहेत की काय? की कधीतरी हा बाजीराव उगवेल तेव्हा त्याला सगळे जसेच्या तसे सगळे मिळावे. कारण मी इतका हळवा मराठी जीव. मला जरा काही बदललेले चालत नाही. या सगळ्यात माझी साधी जबाबदारी ही होती की मी नेहमी जाऊन त्या दुकानांमधून पुस्तके, संगीत, चित्रे विकत घ्यायला हवी होती. मी माङया शाळेतल्या शिक्षकांना अधेमधे जाऊन भेटायला हवे होते. मी आणि माङया कुटुंबाने जुन्या चांगल्या ठिकाणांचा, वस्तूंचा वापर करणो, त्यांचा आस्वाद घेणो थांबवायला नको होते. मी माझा भूतकाळ नीट जपून ठेवायला हवा होता. जुन्या इमारतींच्या रूपात, जुन्या संगीताच्या, चांगल्या साहित्याच्या, जुन्या कलाकृतीच्या रूपात. 
सणवार आणि गणोशोत्सवाचा गोंगाट हे सोडून मराठी माणूस काहीही जतन करू शकलेला नाही. चांगले काही जपून पुढच्या पिढय़ांना दाखवण्यासाठी जिवंत ठेवावे ही गरजच मला कधी वाटली नाही. मग मला वाटणारी हळहळ किती फालतू आणि बिनकामाची आहे! माङयासारख्या माणसाला त्याची मातृभाषा कमी बोलली जाते म्हणूनही वाईट वाटण्याचा अजिबात हक्क नाही. कारण मी त्या भाषेसाठी काही केलेले नाही. मी माङया भाषेत लिहित नाही, माझी मुले त्या भाषेत शिकत नाहीत. मग उगाच फेसबुकवर चकाटय़ा पिटायला वेळ आहे म्हणून भाषेचा अभिमान बाळगला तर याने भाषा टिकणार नाही. आपण यापुढे ज्या पद्धतीने पैसे खर्च करू, त्या पद्धतीने आपली शहरे आकार घेत राहणार. पैशापलीकडच्या गोष्टी स्पर्शाने आणि काळजीने जतन होत राहणार. बाकी सगळे निघून जाणार. मग काय टिकवायचे आणि काय जाऊ द्यायचे ही माझी जबाबदारी आहे. 
ङोपेनासे झाले की माणसे गाशा गुंडाळतात. ज्या वेगाने लोकसंख्या वाढली, शहरे वाढली, माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या, जगण्याचा वेग वाढला, इंटरनेट आले त्या वेगाने जुने सारे काही नष्ट होण्याचा वेग वाढणो हे अपरिहार्य होते. कारण आपण काळापुढे मान तुकवलेले जीव आहोत. आपले चांगले झाले तर देवाने केलेले असते आणि वाईट घडले की आपले सरकार जबाबदार असते या ब्रिटिशकालीन गुलामी भावनेचे आपण भारतीय लोक. आपण एक व्यक्ती आणि नागरिक म्हणून अतिशय घाबरट आणि पुचाट असतो. साहित्य संमेलने, मोर्चे, मिरवणुका, लग्न, सणवार असल्या झुंडीच्या ठिकाणी फक्त आपण चेकाळतो. आपल्याला आपल्या जगण्याची वैयक्तिक जबाबदारी नसते आणि कुणी दिली तरी ती घ्यायची नसते. त्यामुळे काळाचा वरवंटा फिरून आपले जुने जग नष्ट होणो हीच आपली बहुतांशी वेळा लायकी असते. आणि तसेच आपल्या देशात गेल्या वीस-पंचवीस वर्षात वेगाने घडले आणि आपण आपली जुनी शहरे कणाकणाने नष्ट होताना पाहत आलो. 
याच सगळ्याची दुसरी बाजू हीसुद्धा. अगदी ताजी. संजय दत्त आणि सलमान खानला रोज सकाळी पेपर वाचून शिव्या देताना आपण हे विसरलो आहोत की त्या नटांना आपणच गरजेपेक्षा जास्त मोठे करून ठेवले आहे. आपण त्यांच्यावर पैसे उधळले आहेत. आपण जबाबदार आहोत, जे चालू आहे त्या सगळ्याला. सरकार नाही आणि नशीब तर त्याहून नाही. आपण जबाबदार आहोत. आपले निर्णय, आपले पैसे खर्च करण्याचे मार्ग आणि आपल्या कृतींनी काळ आकार घेत राहतो आहे.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com

Web Title: Vivanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.