वाट बघतोय रिक्षावाला..
By Admin | Published: March 19, 2016 02:49 PM2016-03-19T14:49:16+5:302016-03-19T14:49:16+5:30
रिक्षा परवान्यांवरून सध्या आपापल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा उद्योग सुरू आहे. पण नेमकं वास्तव काय आहे? खरंच मराठी तरुण रिक्षा चालवायला उत्सुक आहे? की ‘हलकी’ कामं त्याला नकोच आहेत? - मुंबईतला उत्तर भारतीय सकाळी मासे विकतो, दुपारी भेळपुरी विकतो आणि रात्री टॅक्सीही चालवतो. मराठी तरुणांना नेमकं काय हवंय? त्यांच्याशी बोलून, मुंबईतल्या गल्लीबोळांत फिरून घेतलेला कानोसा.
>
रिक्षा परवान्यांवरून सध्या आपापल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा उद्योग सुरू आहे.
पण नेमकं वास्तव काय आहे? खरंच मराठी तरुण रिक्षा चालवायला उत्सुक आहे? की ‘हलकी’ कामं त्याला नकोच आहेत? - मुंबईत मराठी माणसांनी वडापावचे स्टॉल्स शेट्टींना चालवायला दिले आहेत.
अनेक मराठी तरुणांच्या परवान्यांवर अमराठी माणसं रिक्षा चालवतात.मराठी पेपरवाले, भाजीवाले,
मासे विक्रेते दिसेनासे झाले आहेत. भूमिपुत्रंचा स्वाभिमान तर आडवा येत नाहीये? - मग त्यांना मारून मुटकून रिक्षा चालवण्याची सक्ती कशासाठी?
संदीप प्रधान
अत्यंत शुभ्र कपडे परिधान केलेली एक मुलगी रिक्षातून उतरते. तिचा ऑफिसचा पहिला दिवस असतो.. मॅनेजर तिचे शुभ्र कपडे बघून तिला तू खरीखुरी बँकर शोभतेस, असं प्रशस्तीपत्र देतात.. मग त्या मॅनेजरचं लक्ष ती उतरलेल्या रिक्षाकडं जातं.. इतक्या शुभ्र वेशात रिक्षातून कशी काय बुवा आली, असा काहीसा तुच्छतादर्शक सवाल ते त्या मुलीला करतात.. त्यावर हे रिक्षा चालवणारे माझे बाबा असल्याचा खुलासा ती करते आणि मग मॅनेजर त्यांच्याशी हस्तांदोलन करतात.. अशी एका डिटजर्टची जाहिरात सध्या वाहिन्यांवर झळकते आहे.
गेले काही दिवस मराठी भाषिकांना रिक्षाचे नवे परवाने दिले गेले नाहीत, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचा धांडोळा घेताना रिक्षा चालवणो, मासे विकणो, पेपरची लाइन टाकणो अशी काही कामे दोन पिढय़ांमधील शिक्षणाचा प्रसार, आर्थिक पाठबळ यामुळे स्थानिक मराठी मुलांना कमीपणाची वाटू लागली आहेत. डिटजर्टच्या त्या जाहिरातीमधील रिक्षातून प्रवास करण्यातील तुच्छतावाद हा त्याच मानसिकतेचा भाग आहे.
पुढील वर्षीच्या प्रारंभी मुंबई, ठाणो व अन्य काही प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत प्रमुख लढत ही शिवसेना विरुद्ध भाजपा हीच आहे. त्यामुळे यापूर्वी रद्द झालेल्या एक लाख 4क् हजार रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण व नवीन लाखभर परवाने देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. हे परवाने मराठी बोलता येणा:यांनाच दिले जातील, असेही जाहीर केले होते. त्यावरून होणारा वाद हाही मराठी मते शिवसेनेच्या बाजूने खेचण्याकरिता निर्माण केला गेला. रिक्षा परवाना मिळणारा मराठी असो वा अमराठी, एक परवाना मिळणो याचा अर्थ त्या घरातील किमान दोन ते पाच मतांची बेगमी करणो हाच आहे. शिवसेनेच्या या हेतूला सुरुंग लावण्याकरिता मनसेने या वादात उडी घेतली. बहुतांश परवाने अमराठी लोकांना दिल्याचा दावा त्यांनी केला.
ठाणो येथील आरटीओ कार्यालयात नव्या रिक्षा परवान्याकरिता मुलाखती झाल्या. या मुलाखतींना हजर राहिलेल्यांत अमराठी उमेदवारांचा भरणा अधिक होता हे वास्तव आहे. बहुतांश तरुण हे एजंटच्या माध्यमातून परीक्षेला आले होते. त्यांनी सोबत सर्व कागदपत्रे जमा केलेली फाईल आणली होती. परवाने मिळवून देणारे बहुतांश एजंट हेही अमराठी आहेत. परवाना मिळवण्याकरिता आलेल्यांची रिक्षा खरेदी करण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे त्यांना त्याकरिता कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी एजंटांनी घेतली होती. त्याबदल्यात त्या तरुणांनी दररोज रिक्षा चालवून किमान 3क्क् रुपये किंवा महिन्याचे 15 हजार रुपये अथवा वर्षाचे दीड ते पावणोदोन लाख रुपये द्यायचे. एखाद्या एजंटने 1क् तरुणांना असे पोटाला लावले, तर तो आपला धंदा सुरू ठेवून दररोज किमान तीन हजार रुपयांची कमाई करणार, असे हे गणित आहे.
मुंबईत एकेकाळी अडीच लाख गिरणी कामगार होते. 8क् च्या दशकात गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर बहुतांश कामगारांनी गावी जाऊन शेती करणो किंवा भाजी विक्री करणो हा मार्ग पत्करला. मात्र आपण रिक्षा अथवा टॅक्सी चालवू हा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. याच सुमारास जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे ऑटोरिक्षा मेन्स युनियनची स्थापना झाली. त्यावेळी 6क् टक्के मराठी, तर 40 टक्के अमराठी रिक्षाचालक होते. त्यावेळी टॅक्सी चालवणा:यांत मुख्यत्वे शीख समाज आघाडीवर होता.
सत्तर किंवा ऐंशीच्या दशकात बहुतांश मराठी घरांत केवळ बैठकीच्या खोलीत एखादा टेबलफॅन असायचा. घराघरात फोन नव्हते. कपडे तो हाताने धूत असे. फियाट मोटार असणारा माणूस हा अत्यंत सधन समजला जायचा. वातानुकूलित यंत्रे ही केवळ विदेशी कंपन्यांच्या कार्यालयात असायची. त्यावेळी मराठी माणूस एसटी अथवा रेल्वेच्या तिस:या वर्गाच्या डब्यातून गावाला जायचा. आता मराठी माणसांच्या घरात टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, अॅपलचे मोबाइल, मोटारी सारे काही आहे. 18क् अंशाच्या कोनात त्याचे राहणीमान बदलले आहे.
मुंबईत 1979 पासून रिक्षा चालवलेल्या प्रमोद घोणो यांनी सांगितले की, मी केवळ इयत्ता चौथी शिकलो होतो. त्यामुळे माङयापुढे रिक्षा चालवण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. मात्र आता दहावी-बारावी होऊन एखादा छोटा डिप्लोमा केला तर 15 ते 2क् हजारांची नोकरी सहज मिळते. त्यामुळे अंगमेहनतीच्या कामाकडील मराठी माणसांचा कल कमी झाला आहे. माझी दोन्ही मुलं इंजिनिअर झाली. माङयाबरोबर रिक्षा चालवणा:या चांदेकर यांच्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्या आहेत. ज्या रिक्षावाल्याची मुलं शिकतात त्यांनी परत रिक्षाच्या धंद्यात येऊ नये, असं रिक्षावाल्यांनाच वाटतं.
मासे विक्रीचा व्यवसायही गेल्या दहा वर्षात मराठमोळ्या कोळणींकडून उत्तर भारतीयांच्या हातात गेला आहे. मोठे ट्रॉलर्स एकावेळी दहा टन मासे पकडू लागल्याने छोटा मच्छीमार मरू लागला आहे. त्याचा एकेकाळी बरकतीत असलेला व्यवसाय तोटय़ात जाऊ लागला आहे. मासे विक्री करणारी कोळीण केवळ तोच व्यवसाय करायची. तिची जागा घेतलेला उत्तर भारतीय सकाळी मासे विकतो, दुपारी भेळपुरी विकतो आणि रात्री टॅक्सीही चालवतो.
मच्छीमारांचे नेते दामोदर तांडेल म्हणाले की, बडय़ा कंपन्यांच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात आहे. वेळीच पावले उचलली नाही तर कोळी बांधव उद्ध्वस्त होतील. शिवसेनेने मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला, असा दावा त्या पक्षाचे नेते करतात. मात्र त्याच मराठी माणसाचा, भूमिपुत्रचा स्वाभिमान काही हलकी कामं करण्याकरिता आडवा येत असताना त्याला तीच 5क् वर्षापूर्वीची कामं करण्याची सक्ती शिवसेना आणि मनसे का करीत आहे? तो फक्त थिरकतोय, मानसी नाईकच्या ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला..’ या गीतावर..
शिपाईगिरी करीन, पण
रिक्षा चालवणार नाही!
1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्त्या झाली. त्यानंतर अल्पावधीत शीख टॅक्सीचालक गाशा गुंडाळून गेले. त्यांनी आपला मोर्चा गॅरेज, स्पेअर पार्ट या व्यवसायाकडे वळवला. त्यांचे टॅक्सी परवाने मराठी तरुणांनी मिळवले नाहीत तर अमराठींनी मिळवले. याचा अर्थ गिरणी संपाची आपत्ती असो की शिखांनी आपला व्यवसाय सोडल्याची इष्टापत्ती असो, रिक्षा-टॅक्सी चालवणो हे बेरोजगार मराठी तरुणांना नेहमीच हलक्या प्रतीचे काम वाटत राहिले. एखाद्या छोटय़ा-मोठय़ा कंपनीत शिपायाची नोकरी करीन, पण रिक्षा चालवणार नाही, अशी मराठी मानसिकता होती व आहे.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना या मराठी मानसिकतेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही केवळ मराठी मानसिकता नाही. हा ग्लोबल फिनॉमिना आहे. इंग्लंडमधील रंगकाम, सुतारकाम अशी छोटी कामे रुमानिया, युक्रेन, पोलंडमधील उपरे करतात. फ्रान्समधील विमानतळावर साफसफाईची कामे अरब मुस्लीम करतात. मराठी मुले अमेरिकेत शिकायला जातात तेव्हा फी परवडत नाही, त्यामुळे तेथील रेस्टॉरंटमध्ये काम करतो हे येथे आल्यावर अभिमानानं सांगतात. स्थानिकांना हलकीसलकी कामे करणो पसंत पडत नाही हेच त्यामागील वास्तव आहे.
रिक्षाचा परवाना हवाय?
1क् दिवसांत, 15क् रुपयांत मराठी शिका!
रिक्षा चालवण्याकरिता मराठी अनिवार्य केल्याने केवळ 1क् दिवसांत 15क् रुपयांत मराठी शिका, असे क्लास ठिकठिकाणी सुरू झाले होते. त्यामध्ये मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणा:या प्रश्नांची उत्तरे मराठीत कशी द्यायची, याची घोकंपट्टी करून घेतली होती. उपस्थित काही मराठी मुलांनी आम्हाला रिक्षा परवान्याच्या वितरणाची कल्पनाच नसल्याचे सांगितले. मात्र गेले काही महिने वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत असलेल्या या विषयाची मराठी मुलांनाच माहिती नाही हा युक्तिवाद न पटणारा आहे. कदाचित ज्या मार्गाला जायचे नाही त्या दिशेला जाणा:या रिक्षात बसायचेच कशाला ही भावना प्रबळ असेल.
एका खासगी वाहिनीचे पत्रकार प्रसाद काथे हे या मुलाखतींकरिता होते. त्यांनी 5क्क् जणांची मुलाखत घेतली होती. त्यांनी सांगितले की, आम्ही 65 आणि 62 रुपयांमधील फरक काय? गडकरी रंगायतनकडून रेल्वेस्थानक गाठण्याकरिता कसे जाल? असे सवाल केल्यावर ठरावीक प्रश्नांचा रट्टा मारून आलेली मुले गडबडली.
कुठे गेले मराठी भाजीवाले, पेपरवाले, वडापाववाले, रिक्षावाले?
रिक्षाच नव्हे तर एकेकाळी भाजीवाले, पेपरवाले, मासे विकणारे हे केवळ मराठी असायचे. आता मालाड व अन्य परिसरात एकेकाळी दिसणारे वसईचे भाजीवाले दिसत नाहीत. मासे विकणा:या कोळणी आता दारोदारी येत नाहीत. कारण अनेक टॉवरमध्ये मासे खाण्यावर र्निबध आहेत. कोकणात झाडावरून आंबे उतरवण्याचे काम बिहारी व नेपाळी करतात. एकेकाळी मुंबईत शहाळी विकणारा हा दाक्षिणात्य असायचा. आता या धंद्यावरही उत्तर भारतीयांचा प्रभाव आहे. दाक्षिणात्य माणसं कधीकाळी टॅक्सी चालवायचे यावरही कुणाचा विश्वास बसणार नाही. मराठी माणसांनी वडापावचे स्टॉल्स शेट्टींना चालवायला दिले आहेत. फर्नाडिस यांच्या युनियनमध्ये दीर्घकाळ काम केलेले कामगार नेते सुनील चिटणीस यांना वाटते की, मराठी माणसाने रिक्षा चालवण्याचा धंदा कधी फारसा मन लावून केला नाही. ब:याच जणांनी आपल्या परवान्यांवर अमराठी लोकांना रिक्षा चालवायला दिली. काही रिक्षा चालवणारी मुले कालांतराने गँगमध्ये गेली, भाई झाली. त्यांचे एन्काउंटर झाले.
नवीन परमिटधारक रिक्षाचालक काय म्हणतात?.घरकामाच्या पैशांत भागत नाही. नोकरीही मिळत नसल्याने महिलांसाठी रिक्षा चालवणो हा पर्याय निर्माण झाला आहे. त्याबाबतचा सरकारी निर्णयही योग्यच आहे. परमिट मिळाल्यावर परीक्षाही उत्तीर्ण झाल्याने आता मीही रिक्षा चालवणार आहे. माङया मुलींनाही मी रिक्षा चालवायला शिकवणार आहे.
- संगीता परदेशी
मराठी महिला रिक्षाचालक
रिक्षा परमिटसाठी वारंवार माहिती घेत होतो. तसेच त्याच्या अर्जापासून त्यासाठी लागणा:या एनओसीसाठी खूप धडपड केली. ऑनलाइन अर्ज केल्यावर लकी ड्रॉमध्ये नंबर लागला. आरटीओने घेतलेल्या परीक्षेत चौथीचे पुस्तक वाचायला दिले. ती परीक्षा पास झालो. आता स्वत:च्या मालकीची रिक्षा चालवणार आहे.
- मिलिंद सुतार
रिक्षा परमिटधारक
2क्14 मध्ये रिक्षा परमिटसाठी अर्ज करण्यात अयशस्वी ठरलो होतो. त्यातच 2क्15 मध्ये पुन्हा परमिटचे वाटप करण्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार अर्ज केला आणि यशस्वी ठरलो. मला मराठी व्यवस्थित बोलता येते. आरटीओच्या चाचणीत मी मराठी पुस्तक वाचले. त्याचा हिंदी अनुवाद केला. माङयासह वडिलांचे नाव, कुठे राहतो याचा तपशील विचारला. कोणाकडूनही विरोध होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय करताना भीती बाळगण्याचे कारणच नाही.
- सुमन मिश्र
रिक्षा परमिटधारक
(संकलन : पंकज रोडेकर)
(लेखक लोकमतच्या ठाणो आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत.)
sandeep.pradhan@lokmat.com