जल हेच जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 07:18 PM2019-07-18T19:18:34+5:302019-07-18T19:21:26+5:30

जल संरक्षण अभियान : डॉ. दीपक पाटील यांनी केले मार्गदर्शन

Water is life | जल हेच जीवन

जल हेच जीवन

Next


जळगाव- जल हेच जीवन आहे, असे सांगून शरीरातील विविध कायार्साठी पाण्याची किती आवश्यकता असते, याबाबत डॉ़ दीपक पाटील यांनी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुरूवारी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये जैन इरिगेशन व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने जल सरंक्षण अभियानातंर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभियांनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच स्कूलमध्ये विविध प्रकारचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी आनंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश दीक्षित यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले.
पुरूषांच्या शरिराला पाण्याची आवश्यकता जास्त
मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधत पाण्याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी पाणी कमी पिण्यामुळे शरीराला होणाऱ्या विविध आजारांची माहितीही दिली़ यासोबतच पाण्यामध्ये राहणाºया सजीवांनाही पाण्यात आॅक्सिजनची आवश्यकता असते, पण तापमानात होणा-या वाढीमुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते व पाण्यातील सजीव मृत्युमुखी पडतात. तसेच स्त्रीच्या तुलनेत पुरुषांच्या शरीराला पाण्याची जास्त गरज भासते, असेही त्यांनी मार्गदर्शना करताना विद्यार्थ्यांना सांगितले.
५० चित्रफलकांचे भरले प्रदर्शन
पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण व घरगुती, शेती आणि औद्योगिक पाणी वापरण्याचे प्रमाण, पाण्याचा साठा, पाण्याविना आणीबाणी, शरीरातील पाणी काढून टाकल्यास, पावित्र्य पाण्याचे अशा अनेक विषयांवर माहिती देणारे एकुण ५० चित्रफलकांचे दोन दिवसीय प्रदर्शन शाळेत भरविण्यात आले आहे. तर कार्यक्रमात २० वर्षात पाणी संपल्यावर आपल्याला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे हे ही विद्यार्थ्यांना पटवून दिले व पाणी वापरण्याच्या चांगल्या सवयी अंगीकाराव्या, असा सल्ला डॉ़ दीपक पाटील यांनी दिला.

 

 

Web Title: Water is life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.