तुमच्या मुला-माणसांना सांभाळण्याचे मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:04 AM2021-05-16T06:04:00+5:302021-05-16T06:05:14+5:30
कोविडच्या काळात आपल्या घरात, कुटुंबात सकारात्मक वातावरण राहावं यासाठी काय कराल?
- लोकमत न्यूज नेटवर्क
१. आजूबाजूच्या परिस्थितीचा ताण येणे स्वाभाविक आहे. त्याबाबत जोडीदाराशी, सहकारी-मित्रांशी, मुलांशीही जरूर बोला. घरात ताणतणावाची एकेकटी बेटं होत नाहीत ना, याची काळजी घ्या.
२. घराच्या आत कोंडलेला काळ एकेकट्याने काढू नका. प्रत्यक्ष भेटी शक्य नसल्या, तरी आप्त, जिवलगांच्या संपर्कात राहा.
३. साथीचे गांभीर्य बदलते तसे नियमही बदलतात. या बदलांचा ताण घेणे , फार दूरवरचा विचार करणे टाळा. येता आठवडा मला काय काय तयारी करावी लागेल एवढाच विचार करून पूर्वतयारीत राहा.
४. तुमच्या शरीरातले अनेक बारीकसारीक बदल तुम्हाला काही सांगता असतात . ते संकेत ओळखायला शिका. त्यासाठी स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे , त्याचे ऐकणे आवश्यक आहे.
५. अनावश्यक माहितीच्या भडिमारापासून दूरच राहा.
६. सारे स्वतःच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना जगभरात प्रत्येकाच्याच मनात आहे. त्या दडपणाने गळून जाऊ नका. स्थानिक परिस्थितीतल्या अनेक गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकता. त्यावर लक्ष केंद्रित करा.
७. मन रिझविण्यासाठी मदत करतील असे छंद या भयग्रस्त काळात दिलासा देतात. आपल्याच घरावरून मायेचा हात फिरवणं, ही मन शांत करणारी सोपी कृती आहे. करून पाहा !