Beauty Contest: विश्वसुंदरीच्या आयोजनामागे दडलंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 01:21 PM2023-06-25T13:21:12+5:302023-06-25T13:21:38+5:30
Beauty Contest: तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत.
- डॉ. सुरेश सरवडेकर
(माजी सहायक संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग)
तब्बल २७ वर्षांनी भारतात विश्वसुंदरी स्पर्धेचे त आयोजन केले जात आहे. यात भारतातर्फे कर्नाटक येथील सिनी शेट्टी प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत 'फैशन वर्ल्ड'मध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे अनेक फॅशन डिझायनर यांच्यासोबतच सौंदर्यप्रसाधने बनविण्याऱ्या कंपन्या या स्पर्धेच्या अनुषंगाने बाजारात काय नवीन देता येईल, याबाबत प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेकांना विश्वसुंदरी स्पर्धा भारतात होत असल्याचा अभिमान वाटत आहे. मात्र, महाकाय लोकसंख्या असलेल्या या भारतात स्पर्धा भरविण्यामागे मोठे अर्थकारण असून, सौंदर्यप्रसाधन उत्पादकांना येथील बाजारपेठ काबीज करावीशी वाटली तर त्यात काही नवल नाही.
आपल्या देशात काळा गोरा भेद आजही मानसिकतेत ठासून भरला आहे. नेमकी हीच मानसिकता हेरून सौंदर्यप्रसाधने कंपन्या त्यादृष्टीने उत्पादने बाजारात आणतात. त्याला आपसूकच येथील ग्राहक भुलतो.. बाजारपेठेच्या सिद्धांतानुसार 'सतत विक्री वाढविण्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला' शक्ती देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्राहकांना अधिकाधिक ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यासाठी विविध माध्यमांतून त्यांना सतत जाहिराती, उपदेश तसेच उपयुक्त माहिती देण्याच्या नावाखाली पण, केवळ खरेदीच्या उद्देशाने त्यांची मानसिकता तयार केली जाते. हा सिद्धांत विशेषतः स्त्रियांना लागू आहे, असे म्हटले जाते. कारण त्या या बाजार व्यवस्थेचा एक भाग आहेत.
सौंदर्य प्रसाधनांचा दर्जा काय?
१ प्रत्येक कॉस्मेटिक उत्पादनामध्ये विविध प्रकारची रसायने असतात आणि म्हणूनच प्रत्येक देशाच्या सरकारने ग्राहकांच्या हिताची काळजी घेणे आणि उत्पादने वापरण्यास सुरक्षित असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. पण, जगभरात तसे होताना कुठेच दिसत नाही.
सौंदर्य प्रसाधनांच्या दर्जाबद्दल नाही. विकसित देशांमध्ये तक्रार प्राप्त होताच त्याप्रमाणे मानकांमध्ये तत्काळ सुधारणा केली जाते. पण विकसनशील व अविकसित देशामध्ये अपुरे मनुष्यबळ व दर्जा तपासण्यासाठी आवश्यक अद्ययावत यंत्र सामुग्रीच्या अभावामुळे ते होत नाही.
३ | आजकाल जे जे नैसर्गिक ते उत्तम या समजुतीच्या नावाखाली वनस्पतीजन्य सौंदर्य प्रसाधनांचा वापर वाढला आहे. पण, त्यासाठी दर्जा तपासण्याची आवश्यक तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नाही. या निष्काळजीपणामुळे कॉस्मेटिकचा नियमित वापर करणाऱ्यांना अगदी अॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत आजारांचा सामना करावा लागत आहे..
साडेसहा अब्ज डॉलरची बाजारपेठ
भारतात विश्वसुंदरीची स्पर्धा आयोजित करून बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठी बाजारपेठ काबीज करायची आहे. भारतातील सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ ६.६७ अब्ज डॉलर आहे आणि २.७ टक्क्यांनी वाढत आहे. विश्वसुंदरी स्पर्धेच्या निमित्ताने त्याचा वेग वाढविण्याचा व्यापायांचा विचार आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या नवनवीन कॉस्मेटिक उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होत आहे.
महिला केवळ ग्राहक
- समाज महिलांना ग्राहक म्हणून परिभाषित करतो आणि व्यापारी मीडियाच्या मदतीने महिलांना निष्क्रिय लैंगिक वस्तू म्हणून समोर ठेवून उत्पादनांची विक्री करतो, महिलांच्या या वैचारिक घसरणीचे लाभार्थी पुरुष नसून कॉर्पोरेट शक्ती संरचना आहेत.
-सौंदर्य स्पर्धा ही एक सुशिक्षित गोया मध्यमवर्गीय पुरुषांनी त्यांच्या मनोरंजनासाठी व बाजारासाठी तयार केलेली बकवास विचारसरणी आहे. सुमार दर्जाची सौंदर्य प्रसाधने विकणे आणि कोट्यवधी रुपयांचा फायदा खिशात घालणे, असे शुद्ध व्यापारी गणित आहे.