पक्षी माहेरी येतात, तेव्हा..

By admin | Published: January 2, 2016 01:44 PM2016-01-02T13:44:00+5:302016-01-02T13:44:00+5:30

पुण्यातल्या पक्षी अभ्यासकांनी दोन वर्षापूर्वी टॅगिंग केलेले खुणोचे पक्षी भादलवाडीच्या तलावात नुकतेच आपल्या पिलांसह उतरले आहेत. ही घटना इतकी महत्त्वाची का आहे?

When the birds come from Maheri .. | पक्षी माहेरी येतात, तेव्हा..

पक्षी माहेरी येतात, तेव्हा..

Next
>- डॉ. सतीश पांडे
 
1. विंग टॅग लावलेले आयबिस व पेंटेंड स्टॉर्क हे ‘रेड डाटा बुक’ या धोकाग्रस्त पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट आहेत, म्हणूनच ते पुन्हा दिसले हे महत्त्वाचे! 
2. टॅग केल्यानंतर निदान दोन वर्षे हे पक्षी जिवंत होते हे खात्रीपूर्वक सांगता येते. टॅग केलेल्या जागेपासून काही कि.मी. अंतरावर सापडल्याने त्यांचा वावर किती अंतरार्पयत होतो हे कळते. 
3. पालकांसोबत पिले दोन वर्षानी त्याच जागेवर आल्याने भादलवाडीचे त्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित होते. 
4. टॅग लावल्यानंतर दोन वर्षे हे पक्षी कोठे गेले होते हे अज्ञात आहे. त्यासाठी पक्ष्यांवर आधुनिक व अत्यल्प वजनाची टेली मीटर लावली तर ही माहिती कळू शकेल.
 
पक्षी वेगाने उडतात व पटकन दिसेनासे होतात. 
आपल्या डोळ्यांना एका प्रजातीचे सगळे पक्षी सारखेच दिसतात. समोरच्या थव्यातील कबुतरे वेगवेगळी ओळखायची तर त्यांच्या पंखांवर, मानेवर किंवा पायांवर एखादी खुणोची पट्टी, रिंग, टॅग लावणो गरजेचे असते. पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ याच पद्धतीने अभ्यास करतात.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. टॅगिंग करण्यासाठी प्रशिक्षण घेणो आवश्यक आहे व ते जिकिरीचे आणि कौशल्याचे काम असते. पुण्यातील इला फाऊंडेशन व वन विभागातर्फे असा अभ्यास गेल्या बारा वर्षापासून सुरू असून, त्यातून विलक्षण माहिती उपलब्ध होत आहे.
सन 2क्क्3 च्या सुमारास भारतात प्रथम बर्डफ्लू हा आजार नवापूरच्या कुक्कुटपालन व्यवसायाला हादरवून गेला होता. 
भारत सरकारने बर्डफ्लूची दखल गंभीरपणो घेतली व हा आजार संसर्गजन्य असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योजना आखली. 
कोंबडय़ांच्या देशांतर्गत वाहतुकीदरम्यान त्यांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता व आद्र्रता निर्माण होत असल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव सहज होतो. त्यामुळे बर्ड फ्लूसारख्या आजाराची लागण सहजपणो व वेगाने इतरांना होते. असे पोषक वातावरण पश्चिम बंगाल, ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे.
बर्ड फ्लूचा प्रसार वन्य व स्थलांतर करणा:या पक्ष्यांच्या माध्यमातून होतो का व असेल तर किती प्रमाणात होतो हे बघण्यासाठी सरकारी पातळीवर वन्यपक्ष्यांचे सव्रेक्षण सुरू झाले. गेली दहा वर्षे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणो व इला फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, अंदमान व निकोबार बेटे अशा ठिकाणी हे सव्रेक्षण केले जात आहे. 
या अभ्यासात वन्यपक्ष्यांची विष्ठा गोळा करून तिचा तपास करण्यात येतो. त्याचप्रमाणो वन्यपक्ष्यांना पकडून त्यांच्या श्वासनलिकेतील व गुदद्वारातील स्त्रव त्याचप्रमाणो रक्ताची तपासणी करण्यात येते. हे काम अत्यंत अवघड आहे. 
अशा बर्ड फ्लू सव्रेक्षण अभ्यासादरम्यान दोन वर्षापूर्वी भादलवाडी या भिगवणनजीक असलेल्या पाटबंधारे खात्याच्या तलावात असणा:या मोठय़ा सारंगागाराकडे आम्ही गेलो होतो. तेथे मोठय़ा प्रमाणात चित्रबलाक, राखी बगळे, शराटी, वंचक, पाणकावळे, जांभळे करकोचे, मुग्धबलाक इत्यादि पक्षी घरटी करतात. त्यावर्षी सुमारे ऐंशी पक्ष्यांची तपासणी करण्यात आली. एच5एन1 विषाणूंचा आढळ नव्हता हे पुढल्या अभ्यासातून खात्रीपूर्वक कळले. या सारंगारावर विशिष्ट कालावधीतच पक्षी येतात आणि वीण पूर्ण झाली की सगळी मंडळी गायब होतात. म्हणजेच हे स्थलांतर करणारे पक्षी आहेत. त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायांना रिंग आणि पंखांना टॅग बसवले होते.
पंखांना टॅग लावून आम्ही दोन वर्षापूर्वी सोडलेले पक्षी गेल्याच आठवडय़ात काही चाणाक्ष पक्षी निरीक्षकांना पुन्हा दिसले. हे दोन पक्षी होते चित्रबलाक (पेंटेड स्टॉक) व ब्लॅक आयबिस. अभ्यासासाठी आम्ही लावलेले विंग टॅग आणि त्यावरील नंबर त्यांच्या पंखांवर अजून आहे, हे पाहून आम्ही हरखून गेलो. 
ही घटना दुर्मीळ मानली जाते. म्हणूनच भारतीय पक्षी अभ्यासात हे महत्त्वपूर्ण आहे.
 आपल्या अभ्यासातल्या भागीदार पक्ष्यांचे पुनश्च दर्शन होणो म्हणजे देव भेटण्याइतके अवघड! त्यासाठी गळ्यात दुर्बीण लावून अखंड भटकणारे व फोटो घेणारे उत्साही, सतर्क पक्षी निरीक्षक हवेत. 
सुचेता डांगे, दत्ता नगरे, नितीन आणि राहुल डोळे यांनी या पाहुण्या पक्ष्यांची खबर शोधली आणि फोटोंसह आमच्यार्पयत सत्वर पोचवली. भादलवाडीची स्पंदन संस्था, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे डॉ. शैलेश पवार, वन विभागाचे राजेंद्र कदम, नितीन काकोडकर, जीतसिंग आदि वरिष्ठ अधिकारी, इला फाउंडेशनचे शास्त्रज्ञ, विद्यार्थी या सर्वाचेच हे श्रेय आहे.
विंग टॅगिंगच्या या अभ्यासाला शासकीय स्तरावरील प्रयत्नांसह व्यापक जनसहभागाचाही मोठा आधार आहे. 
सगळे मिळून एकत्र आले तरच पक्ष्यांचे अधिवास वाचतील आणि सुरक्षित वीण होऊन स्थलांतरीत पक्ष्यांबरोबर त्यांची पिलेही ङोप घेतील.
 
‘रिंगिंग’, ‘फ्लॅगिंग’ आणि ‘नेक कॉलर’
 उंच पक्ष्यांच्या पायांना रंगीत कडे बसविण्याच्या अभ्यासपद्धतीला ‘रिंगिंग’ म्हणतात. रिंगला छोटासा ङोंडा असेल तर त्याला ‘फ्लॅगिंग’ म्हटले जाते. बदकांसारख्या काही तृणपक्षी प्रजातींच्या मानेभोवती एक कडे लावतात त्याला ‘नेक कॉलर’ म्हणतात. गेली काही वर्षे नेक कॉलर केलेले बार हेडेड गूज-पट्टकदंब पक्षी मंगोलियातून येतात हे कळले आहे. कारण असे पक्षी महाराष्ट्रात आढळले आहेत.
 
(ज्येष्ठ पक्षी अभ्यासक असलेले लेखक  
‘इला फाउंडेशन’ या संस्थेचे संचालक आहेत.)
pande.satish@gmail.com

Web Title: When the birds come from Maheri ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.