शाळेतली मुले जेव्हा मनातले लिहितात..

By admin | Published: February 27, 2016 03:08 PM2016-02-27T15:08:18+5:302016-02-27T15:08:18+5:30

मुले कविता करतात, गोष्टी लिहितात, साहित्य संमेलने भरवतात आणि संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवतात. आणि तेही मुंबै-पुण्यापासून दूरच्या गावखेडय़ात! - जिल्हा परिषदांच्या शाळांमधले एक शुभवर्तमान

When children in school write their minds. | शाळेतली मुले जेव्हा मनातले लिहितात..

शाळेतली मुले जेव्हा मनातले लिहितात..

Next
>- हेरंब कुलकर्णी
 
 
समजा, चौथी-पाचवीतल्या एखाद्या मुला-मुलीला म्हटले, तुला स्वप्नात काय दिसते? तुङया मनात काय चालू असते? तुला कशाचा राग येतो? काय बदलावेसे/नकोसे वाटते?.. त्या सगळ्याबद्दल लिही. तर?
- मोठय़ा माणसांना थक्क करील अशी अभिव्यक्ती पुढे येते. एरवी सरकारी शाळेतल्या शिक्षणाच्या दर्जाच्या नावाने कायम चिंतित असणा:या महाराष्ट्रात लहानग्यांच्या अभिव्यक्तीला काळजीने शिंपण करत कथा-कवितांचे मळे फुलवण्याचे काम काही शिक्षक व्रत घेतल्यासारखे करीत आहेत. काल मराठी दिन साजरा झाला. मराठीच्या भवितव्याविषयी सालाबादप्रमाणो सर्वत्र चिंता व्यक्त झाली. पण ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या मुलांची अभिव्यक्ती उंचावणारे सध्या सुरू असलेले प्रयोग बघितले की थक्क व्हायला होते. मुलांची अभिव्यक्ती फुलविणो हा ज्ञानरचनावादाचा गाभा आहे. यानुसार ग्रामीण  मुले कथा-कविता लिहू लागली आहेत. अनेक शाळा हस्तलिखिते काढतात, तर काहींनी चक्क मोठय़ा कवींसारखे कवितासंग्रह काढलेत. मुलांची साहित्यसंमेलनेही होऊ लागली आहेत.
कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने पुढाकार घेऊन मुलांच्या साहित्य संमेलनाची परंपरा सुरू केली आहे. साहित्यिक असलेले गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षापासून साहित्य संमेलने होत आहेत. अध्यक्ष हा लेखक विद्यार्थीच असतो. ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविसंमेलन, कथाकथन असे सारे होते. यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड यांची मुलाखत लहान मुलांनी घेतली. तालुक्यातील शिक्षक संघटनेने या सर्व साहित्य संमेलनाचे नियोजन केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात लेखक आपल्या भेटीला हा उपक्र म साहित्य सभा अनेक वर्षे घेत. त्यातून मग मुलांना लिहिते करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार नामदेव माळी व दयासागर बन्ने यांनी लिहिणा:या मुलांची कार्यशाळा घेतली. अनुभवाचे आशयात रूपांतर करणो, योग्य शब्दाची निवड करणो, अनावश्यक भाग वगळणो असे मुले शिकली. त्यातून ‘शाळकरी मुलांच्या कविता’ हा संग्रह झाला. 
किलबिल गोष्टी हा नामदेव माळींनी संपादित केलेला मुलांच्या कथांचा संग्रह महत्त्वपूर्ण आहे. मुलांच्याच कल्पना पुढे येऊ दिल्या. या गोष्टींच्या बोधकथा किंवा पारंपरिक गोष्टी होऊ दिल्या नाहीत. 
 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात मुलांच्या बोलीभाषांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान देण्याची मांडणी करण्यात आली होती. या शिक्षकांनी मुलांकडून बोलीभाषेत लेखन करून घेतले आहे. बालसाहित्याचे प्रभावी भाषांतरकार पृथ्वीराज तौर यांनी पाठय़पुस्तकातील कवितांचा मुलांकडून त्यांच्या बोलीभाषेत अनुवाद करून घेण्याचा प्रकल्पच उभा केला आहे. मुले अनुवाद करू शकतात हे खरेही वाटणार नाही पण 23 जिल्ह्यांतील 8क् पेक्षा जास्त शाळांतील 338 विद्याथ्र्यानी गोंडी, अहिराणी, गोरमाटी अशा 26  बोलीभाषेत अनुवाद केले आहेत. विशेष म्हणजे, हे अनुवाद ओबडधोबड नाहीत, तर मुलांनी मूळ कवितेचा अर्थ, लय, ताल पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकच उदाहरण : नारायण सुर्वेंच्या ‘डोंगरी शेत माझं गं’ या कवितेचा गोरमाटी भाषेत अनुवाद करताना हृषिकेश चव्हाण हा मुलगा लिहितो.
‘डुंगरेर खेत मार यं मं काम करूं 
आवगो बरस काम कारण मं मरू कतरा 
..शाळेतली मुले नुसती कविता लिहित नाहीत तर कवितांची भाषांतरेही करू शकतात, ही काहीशी अशक्य वाटणारी गोष्ट आज घडते आहे. आणि ती मुंबै-पुण्यापासून दूरच्या गावखेडय़ात घडते आहे. या रचनावादी शिक्षण पद्धतीत मुलांच्या अभिव्यक्तीवर विशेष भर आहे. मुलांना विचार करायला लावणो, बोलते करणो आणि त्यांच्या अनुभवांना व्यक्त व्हायला मदत करणो हा ज्ञानरचनावादाचा महत्त्वाचा पैलू शिक्षकांनी अचूक पकडून मुलांच्या सशक्त अभिव्यक्तीला व्यक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत.
तेव्हा मराठी जगेल का याची चिंता करू नका. उगवत्या पिढीच्या सृजन पंखाच्या उबेत ती सुरक्षित आहे.. 
 
 
मुलांच्या मनात उतरताना..
 
बालसाहित्याचे प्रभावी भाषांतरकार पृथ्वीराज तौर व प्रा. स्वाती काटे यांनी  महाराष्ट्राच्या विविध भागातून  इंटरनॅशनल स्कूल ते आश्रमशाळा अशा व्यापक परिघात मुलांच्या कविता संकलित केल्या. 3क्क् कवितांबरोबर त्यांच्याकडे 45क् चित्रेही जमली. त्यातून ‘सृजनपंख’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. कल्पकता आणि स्वयंप्रेरणा या दोन निकषांवर कवितांची निवड करण्यात आली. पवनचक्कीपासून चिमण्यांर्पयत कितीतरी विषयांच्या वाटेने मुलांच्या मनात डोकावणारे हे पुस्तक मोठे लोभस झाले आहे.
 
‘छोटय़ांचे 
मोठय़ांविषयीचे विचार’
 
पुणो जिल्ह्यातील हवेली तालुक्यात शिक्षणा फाउंडेशनच्या मदतीने सोरतापवाडी येथे मुलांचे साहित्य संमेलन घेण्यात आले. अध्यक्ष होते 
फ. मुं. शिंदे. ‘छोटय़ांचे मोठय़ांविषयीचे विचार’ असा एक धाडसी परिसंवाद या संमेलनात होता. मुलांचे कविसंमेलन, लेखकाची मुलाखतही घेण्यात आली. या तालुक्यातील वढू खुर्द येथील सचिन बेंडभर या साहित्यिक शिक्षकाने ‘मनातल्या कविता’ हा शाळेतल्या मुलांच्या 
75 कवितांचा संग्रह प्रसिद्ध केला आहे. एकाच शाळेतील लिहिलेल्या 75 कविता संकलित करण्यासाठी धडपडलेल्या या शिक्षकाचे किती कौतुक करावे!
 
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रयोगशील शिक्षक आहेत.)
herambkulkarni@gmail.com
 

Web Title: When children in school write their minds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.