शांतीचे दूत जेव्हा युद्धातले ‘हेर’ बनतात..
By admin | Published: June 13, 2015 02:21 PM2015-06-13T14:21:28+5:302015-06-13T14:21:28+5:30
परस्परांबद्दल सततच्या संशयाने पछाडलेल्या दोन देशांच्या सीमेवर अचानक एके दिवशी एक उडता पाहुणा उतरतो : कबुतर! त्याच्या पायात असते मायक्रोचीप आणि पंखांवर काही संदेश! - मग पुढे काय होतं? भारत आणि पाकिस्तानच्या भांडणात नवी ‘जेम्स बॉण्ड’ डिप्लोमसी आणणारी ही कबुतरं आणि त्यांची अजब दुनिया..
Next
>हेरगिरी करणा:या ‘जेम्स बॉण्ड’ कबुतरानं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात
वादळ उठवलं हे खरं! - पण या जेम्स बॉण्डचे पूर्वजही काही कमी नव्हते! या रंजक ‘कबुतरपुराणाचा’
थेट इसवीसनपूर्व काळापासूनचा मागोवा उडत्या रहस्याच्या दुनियेत
गुटुर्गुss गुटुर्गुss. करत डोक्यावर कबुतर घिरटय़ा घालतंय.
घिरटय़ा घालणारं हे कबुतर पाहिल्याबरोबर सगळे घाबरेघुबरे होतात. आता हे कबुतर नेमकं करणार काय? आपली बित्तंबातमी काढणार, आपली खबर दुस:यार्पयत पोहोचवणार की आपल्या अंगावर एखादा ‘लेटर बॉम्ब’ टाकणार?.
बाप रे!
आता या कबुतराचं करावं तरी काय?
झटपट सारी सज्जता होते.
कधी हातात रॉकेट लॉँचर, तर कधी मशीनगन. त्या कबुतरावर अंदाधुंद, बेछुट गोळीबार होतो.
गोळी त्या कबुतराच्या वर्मी बसली आणि ते धराशायी झालं, तर आनंदोत्सव आणि मारणा:यावर बक्षिसांची लयलूट, त्याला बढती, प्रमोशन. खांद्यावर स्टार!
आणि एवढय़ा गोळीबारातूनही ते कबुतर चकवा देऊन निसटलंच, तर मग आहेच तुमच्या मानेवर टांगती तलवार.
.खरं तर हा आहे मोबाइलवरचा एक गेम.
मोबाइल अॅपसाठी खास डेव्हलप केलेला. नुकताच
बाजारात आलेला आणि
प्रचंड लोकप्रिय झालेला.
कुठे?
-पाकिस्तानात!
पाकिस्तानी मीडिया, पाकिस्तानी सोशल मीडियात सध्या जोरदार ‘कबुतरं’ उडवली जाताहेत. तिथल्या अगदी चित्रतल्या कबुतरांनाही जॅकेट घालून, कंबरेला पिस्तूल खोचून हेराच्या भूमिकेत दाखवलं जातंय. त्यावर खाली तळटीप असते. ‘हा खास आमचा (पाकिस्तानचा) गुप्तहेर जेम्स बॉण्ड!’
पाकिस्तानात कबुतर एवढं ‘पॉप्युलर’ होण्याचं आणि त्याला पार आधुनिक ‘जेम्स बॉण्ड’ बनवण्याचं कारण काय?
त्याचं कारण आहे भारत!
गेल्या काही महिन्यांपूर्वी गुजरातेत एक कबुतर आपण पकडलं होतं. ‘आपण’ म्हणजे, तटरक्षक दल, वनविभाग आणि पोलिसांनी मिळून! त्याला ‘अटक’ करण्यात आली होती, त्याच्यावर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला होता आणि दहशतवादविरोधी पथकाकडून त्याची म्हणजे त्या कबुतराची चौकशीही करण्यात आली होती! त्यासंदर्भाच्या बातम्या सगळीकडे प्रसारितही झाल्या होत्या.
बातमी गंमतीची वाटत असली तरी ती तशी दुर्लक्ष करून हसण्यावारी नेण्यासारखीही नव्हती. कारण एकतर ते कबुतर आलं होतं पाकिस्तानातून. सापडलं होतं भारतीय हद्दीत इंडो-पाक सागरी क्षेत्रत. त्याच्या एका पायात होती मायक्रोचीप, तर दुस:या पायात काही फोन क्रमांक. त्यावर उर्दू भाषेत काही सांकेतिक मजकूरही होता.
शंका येण्याला जागा होती आणि अलीकडच्या घटना, विशेषत: 26/11सारखा प्रसंग पाहता ‘गंमत’ म्हणून या प्रसंगाकडे पाहणंही शक्य नव्हतं.
ही घटना साधारण मार्च 2क्15 मधली. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी पुन्हा दुसरी घटना घडली.
यावेळीही परत कबुतर!
ठिकाण पंजाबच्या पठाणकोट भागातील मनवाल गाव. हे गावही भारत-पाक सीमेवरचं. पाकिस्तानातूनच आलेलं एक पांढ:या रंगाचं कबुतर. ‘पाकिस्तानातूनच’ आलेलं याचं कारण याही कबुतराच्या पायावर उर्दूत लिहिलेला काही संदेश आणि फोन नंबर्स.
त्या भागात राहणा:या एका चौदा वर्षाच्या मुलानं या कबुतराला पाहिलं आणि त्यानं पोलिसांना खबर दिली. लगोलग त्या कबुतराला पकडण्यात आलं, त्याचा एक्सरे काढण्यात आला आणि पुढील चौकशीला सुरुवात झाली!.
पठाणकोट भागात इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याच्या गुप्तचर विभागाच्या इशा:यानंतर अवघ्या दोन दिवसांनी या कबुतराला पकडण्यात आलं. जम्मू -काश्मीरचा संवेदनशील भागही या क्षेत्रपासून जवळ आहे.
‘गुप्त संदेश’ घेऊन वारंवार भारतात येणा:या या कबुतरांकडे भारतीयांनी गंभीरपणो पाहिलं तर पाकिस्ताननं त्याची खिल्ली उडवली. अर्थात सोशल मीडियावरून! भारत आणि पाकिस्तानात अजूनही या घटनेवरून कबुतरं उडवली जाताहेत.
ताज्या बातमीनुसार पाकिस्तानच्या या हेर मादी कबुतराला आता रमणजीतसिंह या पक्षीप्रेमी इसमाकडे सोपवण्यात आलंय. त्यानं या मादीला सोबत म्हणून आता एक भारतीय नर शोधलाय.
भारत-पाकिस्तानातलं ‘शत्रुत्व’, दहशतवादी हल्ले. याच्याशी त्यांना काहीएक देणंघेणं नाही. त्यांनी सुखानं आपला संसार थाटलाय.