नदी मरते, तेव्हा..
By Admin | Published: March 19, 2016 03:07 PM2016-03-19T15:07:56+5:302016-03-19T15:07:56+5:30
आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या निमित्ताने नदीच्या जैव-व्यवस्थेशी माणसाने मांडलेल्या खेळाचा लेखाजोखा!
>
अभिजित घोरपडे
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या महोत्सवाने यमुनेच्या पुराच्या मैदानाला नख लावले.
त्यानिमित्ताने नद्यांच्या गळ्याभोवती आवळत चाललेल्या फासाची चर्चा तरी निदान सुरू झाली. नदीकाठच्या एरवी मोकळ्याच दिसणा:या मैदानात ठोकले तंबू आणि घातले भराव तर असे काय बिघडते? का बिघडते?
- आपल्याला हे साधे प्रश्नही हल्ली पडेनासे झाले आहेत, कारण आटलेल्या नद्यांशी असलेला जिवाभावाचा धागाच तुटून गेला आहे. येत्या दोन दिवसात 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जलदिन साजरा होईल.
यावर्षीच्या जलदिनाचे घोषवाक्य आहे- ‘बेटर वॉटर, बेटर जॉब्ज’!
पाण्याची उपलब्धता आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणा:या रोजगार संधी यांच्यातल्या परस्परसंबंधाची नाळ दुष्काळात होरपळणा:या महाराष्ट्राखेरीज कुणाला इतक्या कळकळीने कळणार?