देवीच्या भेटीला येणारी सूर्यकिरणे अडतात, तेव्हा..

By admin | Published: June 6, 2015 02:47 PM2015-06-06T14:47:50+5:302015-06-06T14:47:50+5:30

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव हा एक अनुपम अनुभव आहे. अलीकडे मात्र या किरणांच्या प्रवासातल्या अडथळ्यांमुळे या सुंदर अनुभवाला गालबोट लागते आहे. असे का होते? ते टाळता येईल का? - तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष खूप काही सांगतात; आपल्या प्राचीन वास्तुकलेबद्दल आणि आधुनिक अनास्थेबद्दलही! - त्याचा हा शोध!

When the sun rises in the meeting of the Goddess stops, then .. | देवीच्या भेटीला येणारी सूर्यकिरणे अडतात, तेव्हा..

देवीच्या भेटीला येणारी सूर्यकिरणे अडतात, तेव्हा..

Next
>मुलाखती, शब्दांकन 
इंदुमती गणोश
 
तांबूस रंगाची मावळतीची सूर्यकिरणो लांबचा पल्ला पार करीत थेट अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करतात.. महाद्वार ते गाभारा.. गाभारा ते उंबरठा.. असा प्रवास करीत अवघ्या सात मिनिटांत ती देवीच्या चरणांशी पोहोचतात. सूर्यदेव आपली सोनेरी किरणो अंबाबाईच्या मूर्तीवर पसरून आपल्या तेजाने तिच्यावर मस्तकाभिषेक करतात.. मंदिरातील गडद अंधारात या तेजाने केवळ अंबाबाईच्या मूर्तीची सुवर्णकांतीच झळाळत असते.. 
आणि ‘याची देही, याची डोळा’ हा अलौकिक सोहळा पाहताना भान हरपलेले भाविक खिळून उभे असतात.
भारतातील काही मोजक्याच मंदिरांमध्ये ‘किरणोत्सव’ सोहळा होतो. मंदिर वास्तुशास्त्रतील असाच एक अजोड नमुना म्हणजे साडेतीन शक्तिपीठांतील देवता करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर. हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराची रचनाच अशी आहे की, दरवर्षी नोव्हेंबर 9, 1क्, 11 आणि जानेवारी 31, फेब्रुवारी 1 व 2 या तारखांना न चुकता मंदिरात ‘उत्तरायण’ आणि ‘दक्षिणायन’तला  हा किरणोत्सवाचा सोहळा होतो. 
 मावळतीला आलेली सूर्यकिरणो पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुस:या दिवशी ती कमरेर्पयत येतात आणि तिस:या दिवशी ती चरणांपासून ते मूर्तीच्या मुखावर पडून पूर्ण मूर्ती आपल्या तेजाने उजळवून टाकतात. अवघ्या सात ते दहा मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांच्या प्रवासाचा हा अद्भुत चमत्कार घडतो. 
कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव येथून सूर्यकिरणांच्या या थेट प्रवासाला सुरुवात होते. मंदिराची महाद्वार कमान, गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरठा, गाभा:यातील पहिली, दुसरी, तिसरी  पायरी, चांदीचा उंबरठा हे सगळे टप्पे पार करीत ही किरणो देवीच्या चरणांर्पयत पोहोचतात आणि ख:या अर्थाने किरणोत्सवाचा सोहळा सुरू होतो. 
या कालावधीत मंदिरातील सर्व दिवे मालविले जातात. या गडद अंधारात अंबाबाईची मूर्ती केवळ सूर्यकिरणांच्या तेजोमय प्रकाशाने झळाळत असते. अवघ्या एक-दोन मिनिटांचा हा सोहळा अनुभवताना मूर्तीवरून नजर हटत नाही. तिचे हे दिव्य रूप न्याहाळताना आपल्याही नकळत आपले हात जोडले जातात. घंटानाद आणि आरतीनंतर हा सोहळा पूर्ण होतो.. जो अनुभवण्यासाठी देशभरातील भाविक या कालावधीत मंदिरात येतात. 
सन 2क्क्8 साली पूर्ण क्षमतेने असा हा किरणोत्सव झाला होता. 
कोल्हापुरातील अंबाबाई ही शाक्तसंप्रदायातील आदिशक्ती जगत्जननीचे रूप मानले जाते; जिने विश्वाची- ब्रrा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीची व सरस्वती, लक्ष्मी, महाकाली या देवतांची निर्मिती केली. त्यामुळे ती कोणत्याही पुरुष दैवताची पत्नी नाही. 
अंबाबाई ही विष्णुपत्नी लक्ष्मीची आई असल्याने, भृगू ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारल्याने अपमानित झालेली लक्ष्मी आपल्या आईकडे कोल्हापुरात वास्तव्याला आली. काही काळ ती कपिलमुनींच्या आश्रमात राहिली. आपली पत्नी करवीरात असल्याचे विष्णूंना समजल्यानंतर तेही कोल्हापुरात आले व त्यांना येथे अंबाबाईची मूर्ती दिसली. त्यांनी पत्नीच्या पुनप्र्राप्तीसाठी अंबाबाईची 1क् वर्षे आराधना केली. या आराधनेने प्रसन्न होऊन अंबाबाईने विष्णूंना ‘तिरुमला येथील सुवर्णमुखरी नदीकाठी जाऊन तपश्चर्या कर; तिथेच तुला तुङया पत्नीची प्राप्ती होईल,’ असे सांगितले. 
त्यानुसार पुन्हा विष्णूंनी 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर विष्णू-लक्ष्मी यांचे पुनर्मिलन झाले; मात्र लक्ष्मी वैकुंठाला न जाता पुन्हा करवीरातच वास्तव्याला आली. 
पुढे विष्णू आणि पद्मावतीचा विवाह सोहळा ठरला. या विवाहास लक्ष्मीने उपस्थित राहावे म्हणून विष्णूने सूर्याकरवी तिला तिच्या आईकडे म्हणजे अंबाबाईकडे निमंत्रण पाठविले. 
- हे निमंत्रण म्हणजेच ‘किरणोत्सव’ अशी आख्यायिका आहे.
 
 
किरण-मार्गातले
अडथळे
 
गेल्यावर्षी सूर्यकिरणो मूर्तीच्या कंबरेर्पयतच पोहोचली. 
त्यांच्या मार्गात अडथळा 
नक्की कसला आहे? 
प्रदूषणाचा की अनास्थेचा?
 
डॉ. आर. व्ही. भोसले
1989 मध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी(इस्ने)मधून वरिष्ठ प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात  मानद प्राध्यापक  म्हणून रूजू झालो. 2क्क्4 मध्ये  किरणोत्सवाच्या मार्गातले अडथळे शोधून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने विद्यापीठाला विनंती केली होती. त्यावेळी आम्ही किरणमार्गातील बरेच अडथळे मंदिरातून सूर्याच्या दिशेने लेसर किरणो पाठवून शोधून काढले. ते दूर केल्यावर किरणोत्सव ब:यापैकी होऊ लागला.  ही झाली सन 2क्क्4 सालची गोष्ट.
 गेल्यावर्षी सूर्यकिरणो अंबाबाई मूर्तीच्या कमरेर्पयतच पोहोचली. मुखार्पयत पोहोचलीच नाहीत. गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरूनच असे दिसते की, सूर्यकिरणो मूर्तीच्या पायाकडे वळताहेत. किरणमार्गातील इमारती, छप:या जशाच्या तशाच आहेत. त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. आता हा प्रश्न भौतिक अडथळ्यांचा राहिलेला नाही. वातावरणातील प्रदूषणदेखील काही प्रमाणात अपूर्ण किरणोत्सवास जबाबदार आहे, असे आमच्या ‘मित्र’ संस्थेच्या निदर्शनास आले. 
 
किरणोत्सव नीट का होत नाही?
 सूर्य मावळतीच्या दिशेजवळ असताना सूर्यप्रकाश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रदूषित वातावरणातून प्रवास करतो.
 वातावरणाला वक्रीभवनाचा निर्देशांक असल्याने प्रकाशकिरणांची दिशा जमिनीच्या दिशेने वळते. कारण वातावरणाची घनता जमिनीजवळ जास्त असते. जसे जमिनीपासून वर जावे तसे वातावरणाची घनता कमी होते म्हणजेच वातावरण प्रीझमसदृश (लोलक) किरणांच्या मार्गावर परिणाम करते. परिणामी किरणो जमिनीच्या (मूर्तीच्या पायाकडे) वळतात. 
 वक्रीभवनाचा परिणाम अत्यंत सूक्ष्म असू शकतो. जर मूर्तीची उंची 1 मीटर समजली आणि क्षितिज; जिथे सूर्य मावळतो ते अंतर 1क् किलोमीटर गृहीत धरले तर मूर्तीच्या पायापासून ते मुखार्पयतचा क्षितिजापासून दिसणारा कोन फक्त मूर्तीच्या पायाकडे वळतो. एवढे 1क् आर्क सेकंदाचे किरणांचे वक्रीभवन वातावरणातील प्रदूषणामुळे सहज शक्य आहे.
 वातावरणाच्या वक्रीभवनाचा निर्देशांक वातावरणाचा दाब, तपमान, वाफ, प्रदूषित वायू यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. प्रदूषणात कार्बन ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, हायड्रो कार्बन, स्मोक, एअरसोल्स वगैरेचा समावेश असतो. 
 याचा अर्थ पूर्णपणो किरणोत्सव बघायचा असेल तर प्रदूषण आटोक्यात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याची नोंद संबंधित शासकीय व महानगरपालिकेच्या अधिका:यांनी घेणो क्रमप्राप्त आहे. प्रदूषणाचे प्रमाण असेच वर्षानुवर्षे वाढत राहिले तर काही वर्षानी सूर्यकिरणो मूर्तीच्या पायाजवळदेखील पोहोचतील की नाही याची कल्पना देता येणार नाही.
 
..पुढे काय?
सूर्यास्ताआधीच काही मिनिटे किरणो अडथळ्यांमागे जात असल्याने किरणो मूर्तीच्या चेह:यावर पडत नाहीत.इमारती, पाण्याच्या टाक्या, डिजिटल फ्लेक्स, पत्र्यांचे शेड्स. हे अडथळे दूर केल्याशिवाय किरणोत्सव कसा होणार?
 
प्रा. किशोर हिरासकर
बाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळे शोधण्याचा प्रयत्न केआयटी महाविद्यालयाने केला, तो   विद्याथ्र्यासाठीच्या हा शिक्षणाचाच एक भाग म्हणून!
 डिसेंबर 2क्क्3मध्ये आम्ही सर्वात आधी परिसराच्या अभ्यासाला सुरुवात केली. सूर्यास्ताच्या किरणांचा विशिष्ट अँगल कळावा यासाठी किरणोत्सवाची तारीख धरून रोज किरणांचा प्रवास कसा बदलत जातो याची मांडणी करत गेलो. 
 रंकाळा तलावापासून ते अंबाबाईच्या मूर्तीर्पयतच्या परिसरातील सूर्यकिरणांच्या कोनांची (अल्टिटय़ूट) तपासणी सुरू केली. देवीच्या मूर्तीच्या डावीकडे आणि उजवीकडे येणा:या अडथळ्य़ांचा कोनानुसार पाहणी केली. त्यावेळी आमच्या निदर्शनास आले की सूर्यास्ताची वेळ आणि अडथळ्यांमागे किरणो जाण्याची 
वेळ यामध्ये साधारण तीन मिनिटांचे अंतर 
पडत आहे. किरणोत्सवाचा कालावधी 1क् ते 12 मिनिटांचा असतो म्हणजे सूर्यास्ताआधीच काही 
मिनिटे किरणो अडथळ्यांमागे जात असल्याने 
किरणो मूर्तीच्या चेह:यावर पडत नाहीत हे आमच्या लक्षात आले. 
 महाद्वारच्या समोर असलेल्या काही इमारती, पाण्याच्या टाक्या, डिजिटल फ्लेक्स, पत्र्यांचे शेड्स, तिस:या मजल्यावरील इमारतींच्या भिंती हे अडथळे किरणोत्सवात येत असल्याचे लक्षात आले. किरणांच्या प्रवासात या इमारतींची कितपत उंची अडथळ्यांच्या रुपात आहे त्याचा अगदी इंचा-इंचांनी अभ्यास करून आम्ही तो अहवाल देवस्थान समिती आणि महापालिकेपुढे मांडला होता.  शक्य तेवढे कमीत कमी अडथळे  काढल्याने फेब्रुवारी 2क्क्4 मध्ये किरणो देवीच्या मूर्तीच्या खांद्यार्पयत पोहोचली पण चेह:यावर आली नाहीत. त्यामुळे आम्ही मार्किग केल्याप्रमाणो अडथळे निघणो क्रमप्राप्त होते. 
 2007 मध्ये  महापालिका व देवस्थानने मिळकतधारकांना नुकसान भरपाई देऊन अडथळे काढण्याचा ‘शब्द’ दिला. इमारतधारकांनीही सकारात्मक तयारी दाखविली होती. 
  मात्र, त्याचवेळी अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांनी अडथळे न काढता किरणोत्सव करून दाखविण्याचा दावा केला. फारसे अडथळे न काढता 2क्क्8 मध्ये किरणो मूर्तीच्या चेह:यावर पडून पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झालादेखील पण पुढच्याचवेळी किरणो अडथळ्यांमागे जाऊ लागली. 2क्12 मध्ये एकदा पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला होता. त्यानंतर आजतागायत किरणो देवीच्या मूर्तीच्या चेह:यार्पयत पोहोचलेली नाहीत. त्यामुळे या परिसरातील इमारतींचे अडथळे काढण्याला पर्याय नाही.
 
.तर किरणोत्सव संपलाच!
 
पूर्वी प्रदूषणाची व्याप्ती कमी होती. आता किरणोत्सव न होण्यामागे धुलीकण किंवा वातावरणीय प्रदूषण हेदेखील एक कारण असले तरी किरणो मूर्तीर्पयत पोहोचण्यासाठी खूप कमी जागा आहे. त्यामुळे इमारतींचे अडथळे काढले जाणो गरजेचेच आहे.  अंबाबाई मंदिर ते रंकाळा परिसरात उंच इमारतींना परवानगीच देऊ नये, असे आमचा अभ्यास सांगतो. भिंतीची उंची वाढत गेली तर किरणोत्सवाचे हे वास्तुशास्त्रीय नवल आपण कायमचे गमावून बसू!
 
(लेखक कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत)
 
स्थापत्याची जादू
 
प्रतिवर्षी उत्तरायण आणि दक्षिणायन काळात मावळतीच्या सूर्यकिरणांचा 
थेट देवीच्या मूर्तीला उजळून टाकणारा किरणोत्सव प्राचीन मंदिराच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत 
आविष्कारच आहे.
 
प्रतिवर्षी उत्तरायण आणि दक्षिणायन काळात मावळतीच्या सूर्यकिरणांचा 
थेट देवीच्या मूर्तीला उजळून टाकणारा किरणोत्सव प्राचीन मंदिराच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत 
आविष्कारच आहे.
 
पत्याची अनेक वैशिष्टय़े सामावलेले कोल्हापूरचे श्री अंबाबाई मंदिर म्हणजे कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाचा वैभवशाली वारसाच आहे. स्वतंत्र प्रदक्षिणामार्ग असणारी तीन गर्भगृहे, मध्यवर्ती मंदिराची दुमजली रचना, मंदिररचनेच्या काळातसुद्धा उत्कृष्ट तांत्रिक संयोजनाद्वारे वायूविजनाची व्यवस्था, थेट महाद्वार रस्त्यावरून देवीचे मुखदर्शन घेता येईल, अशी अलौकिक रचना. अंबाबाई मंदिरात स्थापत्यकलेची ही सर्व वैशिष्टय़े आहेत. प्रतिवर्षी उत्तरायण आणि दक्षिणायन काळात मावळतीच्या सूर्यकिरणांचा थेट देवीच्या मूर्तीला उजळून टाकणारा किरणोत्सव हासुद्धा या प्राचीन मंदिराच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत आविष्कारच आहे.
      अंबाबाई मंदिराच्या किरणोत्सवाचे वेगळेपण हे त्याच्या अवाढव्य आकारात, अचूक बांधकाम शैलीत आणि विज्ञानाच्या काटेकोर नियमावलींचा अभ्यास करून केलेल्या रचनेत आहे. देवीसमोर गर्भकुडीची लाकडी कमान, गाभा:याची पाषाणी कमान, अंतराळ मध्य मंडप, गणोश मंडप, गरुड मंडप, महाद्वार या सर्व कमानी सूर्यकिरणांना विशिष्ट दिवशी मुक्तपणो देवीर्पयत पोहोचण्याच्या दृष्टीने अचूकपणो साकारलेल्या आहेत. त्रिदल पानाप्रमाणो दिसणारा या मंदिराचा आराखडा पाहिल्यास या विधानातील सत्यता लक्षात येते. सूर्यास्त होऊन सूर्य मावळण्याच्या केवळ काही क्षण आधी होणारा हा सोहळा त्या संधिकाळात सूर्यकिरणांना प्राप्त झालेली हिरण्यवर्णी सोनकळा आणि या सुवर्णझळाळीत उजळून निघणा:या जगदंबेच्या मूर्तीचे दर्शन े केवळ अविस्मरणीय असतो.
देवदूतांचा समूहच जणू वेगाने मार्गक्रमण करत देवीच्या मूर्तीमध्ये विलीन होतो, असा आभास करणारे हे दृश्य ज्या भाग्यवंतांना पाहायला मिळाले त्यांच्या स्मृतीत चिरंतन कोरलेले राहते.
देवासूर संग्रामात देवी आपल्या असंख्य सख्यांसह युद्धास सज्ज झाली तेव्हा महिषासुराने तिच्या पराक्रमाबद्दल व्यंगोक्ती करून  ‘इतक्या रणरागिणी देवतांच्या मदतीची गरज तुला लागते तेव्हा तुङया पराक्रमाबद्दल सांगू नको’, असे सुनावले तेव्हा देवीने या सा:या देवता माङोच अंशरूप आहेत, असे सांगून क्षणार्धात त्या सर्व नवकोट देवता आपल्या देहात सामावून दाखविल्या होत्या. करवीर महात्म्यातील या रोमहर्षक युद्धप्रसंगाचे साक्षात पुन:दर्शन घडविणारा हा कोटय़वधी सूर्यकिरणांचा देवी मूर्तीर्पयतचा प्रवाससुद्धा प्रत्यक्ष किरणोत्सवाइतकाच रोमांचकारी व चिरस्मरणीय असतो.
1948च्या सुमारास या किरणोत्सव सोहळ्याचा अभ्यास आणि मागोवा घेण्याचा प्रयत्न झाला होता. पी. डब्ल्यू. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, कोल्हापूर म्युनिसिपल ब्युरोकडून पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावेळी 14-11-1947 ते 4-12-1947 व 29-1-1948 ते 2-2-1948 र्पयत सूर्यकिरणांच्या प्रवासाची अगदी तपशीलवार नोंदणी करून हा अहवाल तयार करण्यात आला होता.
1948च्या नोंदीपूर्वी ‘किरणोत्सव होतो व त्याचा निश्चित कालखंड’ माहीत असल्याचे दर्शवणारा लिखित उल्लेख म्हणजे 178क्च्या कालखंडातील जोतिबा डोंगरावर राहणारे श्री हरी गोपाळ अंगापूरकर देशमुख यांचा श्री लक्ष्मीविजय ग्रंथ. चैत्र शुद्ध पौर्णिमा शके 17क्7 (सन 1785) या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात या लेखकाने हा ग्रंथ पूर्ण करून जगदंबेच्या चरणी अर्पण केला. अठरा अध्याय असलेल्या या ग्रंथातील 15व्या अध्यायात किरणोत्सवाचे वर्णन करणा:या ओळी पाहायला मिळतात. यावरून 225 वर्षापूर्वीसुद्धा अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होण्यामागे दक्षिणायन व उत्तरायण हे भौगोलिक व खगोलशास्त्रीय कारण असल्याचे ज्ञात होते हे समजते. अर्थात त्यावेळी आसपासच्या परिसरात इमारतींचे जंगल नव्हते तर शेकडो छोटे-मोठे जलाशय व वनराई होती. 1867 सालच्या कोल्हापूरच्या नकाशावरून पाहिले तर किरणोत्सवाच्यावेळी प्रकाशकिरणो थेट संध्यामठावरून मंदिरात प्रवेश करत असत. खंबाले तलावापासून (सध्याच्या लक्ष्मी-सरस्वती टॉकीज) रंकाळ्यार्पयतचा परिसर त्याकाळी मोकळाच होता. 15-2क् वर्षापूर्वी पाच दिवस हा किरणोत्सव सोहळा चालत असे. वास्तविक या सोहळ्याचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्यासाठी मार्गातील अडथळे दूर करणो, परिसरातील पर्यावरणाची काळजी घेणो यासारखे उपाय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अमलात आणावे लागतील. 
 
(लेखक मंदिर व मूर्तीशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक आहेत)
 

Web Title: When the sun rises in the meeting of the Goddess stops, then ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.