... जेव्हा झाडं जीव धरतात!

By admin | Published: June 4, 2016 11:59 PM2016-06-04T23:59:37+5:302016-06-04T23:59:37+5:30

निसर्ग टिकावा, वाढावा अशी आस आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांच्या डोक्यावरही हिरवी सावली राहावी, याची जाणीव रुजते आहे. दरवर्षी त्याच खड्डय़ात नवं रोप

... when the trees are alive! | ... जेव्हा झाडं जीव धरतात!

... जेव्हा झाडं जीव धरतात!

Next
>आजच्या पर्यावरण दिनानिमित्त हिरव्या पर्यायांची चर्चा.
 
निसर्ग टिकावा, वाढावा अशी आस आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांच्या डोक्यावरही हिरवी सावली राहावी, याची जाणीव रुजते आहे. दरवर्षी त्याच खड्डय़ात नवं रोप लावण्याची नामुष्की येऊ नये, म्हणून उपाय शोधण्याची धडपड आहे.
 
बघा, आजच्या पर्यावरण दिनाला वृक्षारोपण करणा:यांची हीùù गर्दी दिसेल.
सर्वसामान्य वृक्षप्रेमींपासून तर विविध संस्था, वनविभाग, नगरपालिका, महानगरपालिका, विविध शासकीय कार्यालयं. या सा:यांमार्फत दरवर्षी हजारो रोपांचं नियमितपणो रोपण केलं जातं. ते याहीवर्षी होईल.
दरवर्षी त्याच खड्डय़ात नवं रोप लावण्याचे विनोद आणि आरंभशूरतेची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रं समाजमनातून पूर्ण पुसली गेली नसली, तरी पुसट झाली आहेत. 
आता लोकच पुढे येतात, स्वयंप्रेरणोने सहभागी होतात आणि लावलेल्या रोपांना जीव लावून वाढवतात, असं शुभवर्तमान कानी येऊ लागलं आहे.
झाडांबद्दलच्या या प्रेमाला व्यवस्थेची शिस्त लावली, तर त्यातून झाडं लावण्याबरोबर ती जगवण्याच्या प्रयत्नाला कसं बळ मिळतं हे नाशिकच्या ‘आपलं पर्यावरण ग्रुप’नं सिद्ध करून दाखवलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना मुळातच निसर्ग जपण्याची आणि जगवण्याची आंतरिक ओढ असते. त्यांच्या या भावनेलाच हात घातला, त्यांना प्रशिक्षण दिलं, सजग केलं तर खरोखरच मोठं काम होऊ शकतं, हा या प्रयोगाचा निष्कर्ष!
 सुटी सुटी, केवळ आपापल्या भागापुरती कामं न करता, सामान्य नागरिक, एनजीओ आणि शासन या सा:यांच्या एकत्रित आणि सातत्यपूर्ण सहभागाची किमया नाशिकचा फाशीचा डोंगर हिरवागार करून गेली आहे. पुण्याचे पर्यावरणप्रेमी नागरिक विनोद जैन यांचं म्हणणं आहे, कोणाला ‘फुकट’ काही करायला सांगू नका. नुसत्या तात्त्विक गप्पा झोडल्यानं काहीही होत नाही.
दरवर्षी वनविभाग, शासनाकडून लाखो रुपयांची रोपं खासगी नर्सरीतून महागडय़ा दरानं विकत घेतली जातात. त्याऐवजी ती लोकांकडूनच विकत घ्या. साठ रुपये, ऐंशी रुपयाला एक याप्रमाणो बाहेरून विकत घेतलेल्या रोपांऐवजी नागरिकांकडून पंचवीस-तीस रुपयांना ती विकत घ्या. घराघरांतली ज्येष्ठ मंडळी, विद्यार्थी, महिला आनंदानं हे काम करतील, अगदी ‘घरपोच’ आणूनही देतील. अशा खूप कल्पना पुढे येऊ लागल्या आहेत.
वृक्ष लावणा:या आणि जगवणा:या कुटुंबांना वृक्षकर माफ करता येईल. प्रत्येक नागरिकाला दरवर्षी सरासरी दोन-तीनशे रुपयांचा वृक्ष कर भरावाच लागतो. एखादं झाड समजा पाच वर्षे जगवलं आणि वाढवलं, पण त्यापासून पुढची पन्नास वर्षे जर कर माफ होणार असेल तर नागरिक का झाडं लावणार नाहीत?.
मनाई असली तरी राजकारणी लोक होर्डिग्ज लावतातच. त्याऐवजी ते जेवढी झाडं लावतील, जगवतील त्यानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि जागेत त्यांना होर्डिग लावायची परवानगी दिली तर आपल्या कार्यकत्र्याच्या मदतीनं राजकारणी लोक आनंदानं झाडं लावतील. झाडं लावणा:या आणि जगवणा:या विद्याथ्र्याना प्रमाणपत्र देणं, शाळाशाळांना वृक्षारोपणासाठी पडीक जागा वाटून देणं, विद्याथ्र्याचे शारीरिक शिक्षणाचे तास अशा ठिकाणी घेताना त्यांच्याकडून श्रमदान करवून घेणं. असे अनेक सोपे उपक्रम राबवणं सहज शक्य आहे. 
‘हरियाली’ या संस्थेचे पूनम सिंघवी म्हणतात, ं‘पर्यावरण दिन’ म्हणून ‘5 जून’ ही तारीखच मुळात आपल्यासाठी योग्य नाही. कारण या काळात मुळात आपल्याकडे पाऊस झालेलाच नसतो. दोन-तीन पाऊस पडून गेल्यानंतर जर रोपं लावली, तर ती जगण्याची शक्यता अधिक असते. पाच जूनऐवजी ‘वटपौर्णिमा’ हा सण पर्यावरणासाठी अधिक उपयुक्त आहे. कारण त्या सुमारास सगळीकडे ब:यापैकी पाऊस झालेला असतो. एकाच वेळी हजारो झाडं लावण्यापेक्षा मोजकी झाडं लावून त्यांची निरंतर जोपासना केली तर ते अधिक फायदेशीर आहे. 
काही वृक्ष आणि प्राणीप्रेमी नागरिकांनीही अफलातून कल्पना लढवल्या आहेत. पुण्याचे दिलीप डाखवे वेगवेगळ्या दुकानांत जाऊन थर्मोकोलचे खोके गोळा करतात. डोंगरावर छोटे खड्डे खोदून त्यात या थर्मोकोलचे छोटे ‘पाणवठे’ त्यांनी तयार केले आहेत. त्यातून पाणी ङिारपून जात नाही. त्यामुळे सात-आठ दिवस तरी पक्ष्यांना पाणी मिळतं. त्यात पुन्हा पाणी भरण्यासाठी, हे ‘पाणवठे’ तयार करण्यासाठी शाळकरी मुलांची फौज ते तिथे घेऊन जातात. पक्ष्यांना पाणी मिळाल्यामुळे आणि परिसरात त्यांनी विष्ठा टाकल्यामुळे वृक्ष आणि पक्षी. दोघांचंही संवर्धन साधलं जातं आहे.
 ‘स्मृतिवन’ आणि ‘स्मृतिउद्यान’ यांसारख्या कल्पनाही मूळ धरू लागल्या आहेत. काहीतरी रुजतं आहे, हा केवढा दिलासा!
त्यातल्याच एका वाटेची ओळख ...
 
आजच्या अंकात! 
 

Web Title: ... when the trees are alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.