..हे सारे कोठून येते?
By Admin | Published: January 2, 2016 01:50 PM2016-01-02T13:50:04+5:302016-01-02T13:50:04+5:30
स्वरांचे ते घुंगुरनाद, प्रत्येक श्वासाबरोबर जाणवणारा लयीचा नाद, दोन बोटांची टोके अलगदपणो जुळून आकाराला येणा:या लवलवत्या नृत्यमुद्रा आणि कधी न मिटणारी तहान..
देवदत्त पाडेकर या तरुण मराठी चित्रकाराची एक कलाकृती कठीण स्पर्धेतून पार होऊन ऑस्ट्रेलियन आर्ट पब्लिकेशनच्या ‘इंटरनॅशनल आर्टिस्ट’ या प्रतिष्ठित अंकात प्रसिद्ध झाली आहे.
त्यानिमित्त..
सोनाली नवांगुळ
गुलमोहराचं झाड उंच, त्यामुळं मी या चित्रचं कॉम्पोजिशन अशा विशिष्ट कोनातून केलंय की त्याचा अवकाश चित्रच्या अवकाशात योग्य वाटावा नि ती मुलगी आणि झाडामधल्या संवादाची शक्यता तयार व्हावी. लाल-शेंदरी रंगाच्या छटा मी संपूर्ण चित्रभर वापरल्या.. फुलांचा सडा असा की जणू तो गालिचा वाटावा.. या सगळ्यानंच चित्रला एक लाल लकाकी मिळाली. उन्हाळ्याच्या दिवसात इथेतिथे बहरून येणारा लालभडक गुलमोहर या चित्रमागची माझी प्रेरणा. पाकळ्या गळून जमिनीवर वेलांटय़ा होत पडल्या आहेत हे तसं जागोजागी दिसणारं दृश्य. अशा एखाद्या गच्च झाडाखाली उभं राहावं, हलक्याशा वा:यानं त्यांच्या पाकळ्या गळून आपल्या अंगाखांद्यावर अलगद पडाव्यात..’’
- देवदत्त पाडेकर या तरुण चित्रकाराशी गप्पा त्याच्या चित्रसारख्याच लयीच्या. महाराष्ट्रात रुजलेल्या त्याच्या मुळांवर झालेले युरोपातल्या निसर्गाचे, तिथल्या कला-विचारांचे आणि संस्कृतीचे संस्कार जसे त्याच्या कैनव्हासवर जाणवतात, तसे त्याच्या बोलण्यातही.
सध्या चर्चेचा विषय ठरलेलं देवदत्तचं हे सुंदर चित्र. गुलमोहोराखाली उभ्या असलेल्या लोभस मुलीचं. देवदत्त सांगतो, ‘‘निसर्गाशी ज्यांचं खरं हितगुज चालतं त्यांनाच या संपन्न संवादातलं सुख कळू शकतं. लहान मुलांच्या निरागसपणामुळं त्यांच्यावर पटकन जीव जडतो आणि मुलं तर निसर्गाच्याच कुशीत असतात. म्हणजे एकअर्थाने हे दोघे एकच.. म्हणूनच माङया गुलमोहोराखाली ती गोडुली मुलगी आहे.’’
- आंतरराष्ट्रीय सन्मान लाभलेलं हे चित्र देवदत्तच्या ‘फिलिंग्ज’ या चित्रमालिकेतलं आहे. आपल्या चित्रची माहिती वाचून मग रसिकाला त्यातलं मर्म कळावं हा प्रकार देवदत्तला खटकतो. चित्रंमधली रंगसंगती, रंगलेपनाची पद्धत, त्यातल्या घटकांचं एकमेकांशी असलेलं नातं यातून आपसूक पाहणा:याच्या भावना-विचारांत चित्र ङिारपायला हवं. आदिमानवांनी गुहांमध्ये काढलेली रोजच्या जगण्याची चित्रं ही केवळ हौस नव्हती, तर ती भाषा होती, संवाद होता. हा संवाद माङया चित्रतून होणं खूप महत्त्वाचं, असं देवदत्तचं म्हणणं. - अशी संवादी वाटतात देवदत्त पाडेकरची चित्रं. कलेबिलेतलं काही न कळणा:यालाही त्यातल्या रंगसंगतीनं तजेला येतो, चित्रंमधल्या माणसांचं, झाडांचं, वातावरणाचं एकमेकांशी असणा:या नात्यातलं काहीतरी गवसतं, जे शब्दात मांडता येतंच असं नाही. त्याच्या चित्रत झाडं, माणसं ही कॅरेक्टर्स जितकी महत्त्वाची तितकीच महत्त्वाची असते त्याची बॅकग्राऊंड. त्याच्या ब्रशची वळणं आणि रंगाची नरमाई यांच्या परिणामामुळं गाण्याचं चित्र झालंय की चित्रच गातंय हे कळेनासं होतं. चित्र दिसेल तसं काढायचं नसतं, तर मनात उमटेल तसं काढायचं असतं याची जाण अनेक प्रदर्शनं, जगभरचा प्रवास यातून देवदत्तला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर येत गेली.
देवदत्तच्या चित्रंमध्ये गुलमोहर जसा आहे तशी फुलपाखरं आहेत, गोल्डफिश आणि हरणांची बछडी आहेत. त्याच्या चित्रत जे आहे, तेच त्याच्या जगण्यातही. निसर्गातल्या सघन शांततेत काम करताना आपोआप मनाची मशागत होते, मेडिटेशन होतं, असं देवदत्त सांगतो. एरवी व्यवहाराच्या कोरडय़ा स्पर्धेत तुम्ही मनानं कितीही संवेदनशील असा, एक मुखवटा घालून धावण्याची सक्तीच असते. जे पटत नाही ते बोलण्याची मुभा नसते. त्यातूनच आपली सामूहिक समज अर्धकच्ची राहत असेल का?
देवदत्तला वाटतं, आपलं शिक्षण मुळात डिग्य्रांवरून नाही, तर जगण्याच्या संस्कृतीवरून तोललं जावं. परदेशात कामानिमित्त हिंडताना त्यानं पाहिलं की लोकांच्या बंगलींच्या कुंपणभिंतीबाहेर चेरी, सुंदर गुलाब, सफरचंद अशी झाडं आहेत. आईचं बोट धरून जाणा:या लहान मुलाला जर त्यातलं काही तोडावं वाटलं तर कुणी रोखणारं नाहीये. ती झाडं सार्वजनिकच आहेत, पण छोटं मुलही फुलंपानं तोडत नाही. देवदत्त याबद्दल सांगतो, ‘‘निसर्गाबद्दल ज्याला प्रेम आहे, आदर आहे तो कुणीही असाच वागेल. पण हे संस्कार लहानपणापासून रुजू घालावे लागतात. निसर्गाबद्दल आपुलकी बाळगणा:याला कलेबद्दल सहजच दृष्टी येत जाते. बालवयातल्या निरागसतेला, उत्सुकतेला आणि आकर्षणाला निसर्गाचा हात धरू दिला, तर रंगरेषांची जाणही आपोपापच रुजेल. अशी मुलंच कदाचित अधिक समंजस आणि समतोल अशी मोठी माणसं होतील.’’
sonali.navangul@gmail.com