‘घराणो’ असो, की ‘अभ्यास’, तटबंदी कशाला?

By admin | Published: December 12, 2015 06:47 PM2015-12-12T18:47:59+5:302015-12-12T18:47:59+5:30

कला, परंपरा तर जपल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर नव्या गोष्टीही शिकल्याच पाहिजेत. रॉक म्युङिाक करणा:यांनीही तबला शिकावा. तालाची भाषा जगात सगळीकडे सारखीच आहे. अर्थात ती वैश्विक आहे. कलाकारांनी कुठल्याही चौकटी स्वत:भोवती आखायला नकोत. जे जे चांगले, ते ते सारे घ्यावे, संगीताचे ‘घराणो’ समृद्ध करावे.

Whether it is 'dharono' or 'practice', why the wall? | ‘घराणो’ असो, की ‘अभ्यास’, तटबंदी कशाला?

‘घराणो’ असो, की ‘अभ्यास’, तटबंदी कशाला?

Next
संगीताच्या क्षेत्रत आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त करूनही प्रसिद्धीपराड:मुख असलेले 
जगप्रसिद्ध तबलावादक पं. अनिन्दो चटर्जी  आणि त्यांचे शिष्य व पुत्र अनुव्रत चटर्जी 
यांची खास मुलाखत
 
‘अनिन्दो को सुनकर धडकने तेज हो जाती है’ असं उस्ताद झाकिर हुसेन म्हणतात, तर ‘तुमची संगत सतारवादनाची रंगत वाढवते, वातवरण भारून टाकते’ असे गौरवोद्गार पं. निखिल बॅनर्जी यांनी काढलेले आहेत. तुम्हाला स्वत:ला काय जास्त आवडते, साथसंगत की एकलवादन? 
 
अनिन्दोजी :  मला साथ आणि एकलवादन या दोन्हीत सारखाच आनंद वाटतो. माङो काका देवीप्रसाद हे उत्तम सतारवादक होते, धाकटी बहीण केका आकाशवाणीची अग्रणीची सतारवादक आहे. मी स्वत: गाणं, वादन एन्जॉय करतो कदाचित त्यामुळे गाण्याला, वाद्याला साथ करताना मैफलीत रंगत येते, असे म्हणत असावेत.
 
फरु खाबाद घराण्याचे तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ वादक आहात. या घराण्याची वैशिष्टय़े काय आहेत?
 
अनिन्दोजी : सुदैवाने मला पं. ज्ञानप्रकाश घोष यांच्यासारखे गुरू लाभले. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांच्याकडे शिकायला लागलो. त्या आधी मी घरात भांडी-डब्यावर वाजवताना आईबाबांनी ‘काय कटकट आहे’, म्हणून न रागवता माझी आवड ओळखून तबला शिकायला प्रोत्साहन दिले. गुरुजींचे बोट धरून या तालविश्वात आलो. अति द्रुतगतीतही बोल स्वच्छ, स्पष्ट आलेच पाहिजेत आणि शास्त्रशुद्धतेबरोबर रंजकता, गोडवाही जपला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे. फरु खाबाद घराण्याची सुरुवात अकराव्या दशकाच्या सुमारास झाली. राजपूत राजाच्या दरबारातील संगीतकार अकासा यांनी तबल्याचे तट-धीट -थुन-नान असे बोल प्रचलित केले, असे मानले जाते. मुस्लीम धर्म स्वीकारल्यावर ते ‘मीर अकासा’ या नावाने ओळखले जाऊ लागले, त्यांच्या 26 पिढय़ांनी त्यांचा तबलावादनाचा वारसा जपला, त्यानंतर हाजी विलायत अली खान यांनी त्यांच्या राहत्या गावावरून घराण्याचे नाव फरुखाबाद घराणो असे केले. त्या काळी लग्नात नव:यामुलाला वरदक्षिणा म्हणून संगीतरचना, तबल्याचे बोल- तोडे देण्याची पद्धत होती. असे म्हणतात की, विलायत अली हे त्यांचे काका बक्षु खान यांच्या वतीने तबलावादक सलालीखान यांच्याबरोबर तबला स्पर्धेत उतरले. तबला बोल-तुकडे, रचनांचे हे युद्ध 15 दिवस सुरू होते. अखेर 16व्या दिवशी विलायत अली यांच्या एका रचनेचा जोडा त्यांना उत्तरादाखल तयार करता आला नाही, विलायत अली विजयी ठरले! बक्षीस म्हणून त्यांना बक्षु खान साहेबांकडून लखनौ घराण्याच्या रचना मिळाल्या. फरुखाबाद घराणो ‘पूर्वी बाजाचे’ सर्वात जुन्या घराण्यांपैकी आहे. 
‘धिर- धीर, किटतक, तकीट धा’ असे वैशिष्टय़पूर्ण बोल घुमारदार दाया, नजाकतदार तरीही सुस्पष्ट बोल अशी या घराण्याची वैशिष्टय़े आहेत. या घराण्याची 35वी पिढी आता हा वारसा चालवते आहे. माङो गुरू ज्ञानप्रकाश घोष यांना फरुखाबाद घराण्याचे उस्ताद मसीत खान आणि पंजाब घराण्याचे फिरोज खान यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले होते. आता घराण्याच्या तटबंदी कुणी फारश्या पाळत नाहीत. जे चांगले आहे ते जरूर घ्यावे, आपले घराणो समृद्ध करावे हे योग्यच आहे. 
 
अनुव्रत, तुम्हाला जगप्रसिद्ध तबलावादक पिता गुरू म्हणूनही लाभले याचा फायदा झाला, की मनात दुसरे काही करायचे असूनही तबल्याकडे वळावे लागले?
अनुव्रत : खरंच या बाबत मी खूप भाग्यवान आहे. बाबांसारखे पिता आणि गुरू मला मिळाले. त्यांच्या मांडीवर बसून तबला ऐकायचे भाग्य अगदी तान्हा असल्यापासून लाभले. एक माणूस म्हणूनही ते श्रेष्ठ, अगदी लाखात एक आहेत. मी तबला शिकावा, अशी जबरदस्ती त्यांनी कधीच केली नाही. माझी आई अल्पना व्यावसायिक नसली तरी उत्तम गायिका आहे. बाबांचे तबल्याचे बोल आणि आईचे गाणो ऐकत मी मोठा झालो. संगीताशिवाय दुसरे काय करणार होतो? संगीतातील माझा पहिला गुरू आईच. बाबांकडे शिकलोच पण त्याचबरोबर त्यांचे गुरू पं. ज्ञानप्रकाश यांचा गंडाबंद शागीर्द  झालो हेही माङो सुदैव. वडीलच गुरू असण्याचा एक फायदा म्हणजे- घरी रियाज करताना काही चुकले तर ते लगेच दुरुस्त करत आणि करतात. इतरांना ती चूक पुढच्या क्लासमधेच कळते. बाकी शिकवण, वेळप्रसंगी रागावणं हे इतर शिष्यांसारखे मलाही होते. बाबा स्वभावानं खूप मिठास आहेत. चुकल्यावरही रागाच्या भरात लागेल असं बोलणं त्यांच्या स्वभावातच नाही. ते एव्हढंच सांगतात-   ‘रियाज मनसे करो, रियाज किया या नही, स्टेज पे दिखता ही है’ गायक, वादकाचा स्वभाव त्याच्या सादरीकरणात दिसतो असं म्हणतात. बाबांच्या तबलावादनात त्यांच्या स्वभावातला गोडवा जाणवतो.
 
पंडितजी, तुम्ही स्वत: शास्त्रीय वादन करता, पण अनुव्रत शास्त्रीय तसेच फ्यूजन, वर्ल्ड म्युङिाक असे प्रयोग करतो याबाबत तुमचे मत काय? 
अनिन्दोजी : अनुव्रतला फ्यूजनही आवडते, पण केवळ ग्ल्ॅामर, पैसा आहे म्हणून तो इकडे वळलेला नाही. यातही तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. गोंगाट न वाटता, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले फ्यूजन श्रवणीय असते. मला तर वाटतं - रॉक म्युङिाक करणा:यांनीही तबला शिकावा. तालाची भाषा सगळीकडे सारखीच, अर्थात ती वैश्विक आहे. 
 
अनुव्रत, तू फ्यूजनमध्ये नवे प्रयोग करत असतोस. त्याचा पहिला श्रोता कोण असतं आणि भविष्यात काय करण्याचं तुझं स्वप्न आहे?
अनुव्रत : फ्यूजनच्या प्रयोगाचे पहिले श्रोता शक्यतो बाबाच असतात. अर्थात मला स्वत:ला जे मनापासून आवडेल तेच मी त्यांना ऐकवतो. त्यांच्याकडून दाद मिळाली की हुरूप येतो. फ्यूजनसारखे काही वेगळे करण्यामुळे शास्त्रीय वादनावर परिणाम होतो असे नाही, मला वाटत. कला, परंपरा जपण्याबरोबरच नव्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत, असे बाबांचेही मत आहे. कलाकारांनी संगीताबरोबर शाळा-कॉलेजचं शिक्षण घेणंही आवश्यक आहे हे ते मानतात. या शिक्षणाचा फायदा कलाकारांना स्वत:ला आणि श्रोत्यांनाही होतो. व्यवहारज्ञान तर येतंच, त्याशिवाय संगीतातल्या परिभाषा, तंत्रज्ञान शिकणं सोपं जातं, श्रोत्यांशी संवाद साधता येतो. त्यांच्या या सांगण्यामुळे वेळप्रसंगी प्रदेशातील कार्यक्र म टाळून मी माझी पदवी परीक्षा दिली आहे. सर्व गुरूंच्या आशीर्वादानं श्रोत्याचं प्रेम मिळते आहे. अजून मी शिकतोय, खूप शिकायचं आहे. अपने अनुभवोंको संगीत का रूप दे सकूं यही प्रार्थना और इच्छा है।   
 
मुलाखत - 
राधिका गोडबोले

 

Web Title: Whether it is 'dharono' or 'practice', why the wall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.