कोण हे कोस्टा?
By Admin | Published: November 28, 2015 06:40 PM2015-11-28T18:40:07+5:302015-11-28T18:40:07+5:30
ज्या पोर्गातुलने गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले त्या पोर्गातुलच्या पंतप्रधानपदाची दावेदारी आज गोवन वंशाचा एक धोरणी माणूस सांगतोय! राजकारणाचे फासे नीट पडले तर येत्या काही दिवसात गोव्याशी नातं सांगणारे अॅँटोनिया कोस्टा देशाची धुरा सांभाळताना दिसतील.
>- ओंकार करंबेळकर
ज्या वसाहतीवर राज्य केले त्या वसाहतीच्या वंशाच्या नागरिकानेच साम्राज्यवादी देशावर राज्य करण्याची घटना निश्चितच ऐतिहासिक म्हटली पाहिजे. गोवन वंशाचे अँटोनियो कोस्टा आता लवकरच पोतरुगालचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. बाबुश म्हणजे लहान मुलगा अशा अर्थाने अँटोनियो यांना हाक मारली जायची. मात्र याच बाबुशने आता मोठी ङोप घेतली आहे. ज्या पोतरुगालने गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले त्या पोतरुगालचे पंतप्रधान अँटोनियो होतील असे दिसते.
2015 हे वर्ष पोतरुगालसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष होते. 4 ऑक्टोबर रोजी पोतरुगीज संसदेच्या सर्व 230 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकीत माजी व सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान पेद्रो पॅसॉस कोएलो यांच्या पोतरुगाल अहेड या पक्षाला 10क्7 जागा मिळाल्या, तर प्रमुख विरोधी पक्ष आणि अँटोनियो कोस्टा यांच्या पार्टिदो सोशालिस्टा (पीएस) म्हणजेच सोशॅलिस्ट पक्षाला 86 जागा मिळाल्या. पोतरुगाल अहेड पक्ष याआधी सत्तेमध्ये होताच; मात्र त्यांच्या जागा यावेळेस 25 ने घसरल्या आणि केवळ 36.86 टक्के मते त्यांना मिळाली. पण याचवेळेस पीएस पक्षाने जबरदस्त कामगिरी करत 74 वरून 86 वर उडी मारली. पण संसदेत साध्या बहुमताचा 116 हा आकडा कोणालाच मिळविता येणार नाही हे स्पष्ट झाले. अशा गोंधळाच्या स्थितीत राष्ट्रपती अॅनिबल कोव्ॉको यांनी पुन्हा पेद्रो कोएलो यांना पंतप्रधानपदासाठी आमंत्रित केले. राष्ट्रपतींच्या या निर्णयावर उलटसुलट चर्चाही झाली. पण अखेर पेद्रो यांनी शपथ घेऊन संसदेसमोर जाण्याचा निर्णय घेतला. इकडे अँटोनियो कोस्टा यांनी कोणत्याही स्थितीमध्ये अल्पमतातील पेद्रोंचे सरकार स्वीकारले जाणार नाही असे जाहीर करून विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली. पोतरुगालच्या राजकारणात आणि युरोपच्या राजकारणात प्रदीर्घ काळ राहिलेल्या कोस्टा यांनी अल्पावधीत डाव्या पक्षांना आपल्या सोबत घेतले आणि समाजवादी, कम्युनिस्टांची युती तयार केली. 1क् नोव्हेंबर रोजी सरकारविरोधात प्रस्तावावर मतदान घेण्यात आले 1क्7 विरोधात 123 मते मिळवत कोस्टा यांनी आपल्या युतीचा पहिला विजय मिळविला. दोन आठवडय़ांच्या आतच अल्पमतातील पेद्रो यांचे सरकार कोसळले. त्यामुळे पंतप्रधानपदी कोण बसणार याची उत्सुकता पोतरुगीजांना लागून राहिली आहे. यापुढील निर्णय घेण्याची जबाबदारी आता राष्ट्रपती अॅनिबल कोव्ॉको यांच्यावरच आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी ते भेटी घेत आहेत. आपल्याला समाजवाद्यांनी बाहेरून पाठिंबा द्यावा अशी पेद्रो यांची इच्छा आहे, मात्र कोस्टा यांना ते कदापिही मान्य नाही. तर डावे आपल्याला सरकार स्थापनेस आणि स्थिर सरकार देण्यास पुढेही मदत करतील अशी कोस्टा यांची धारणा आहे. त्याच्याच बळावर ते आपली बाजू पुढे करत आहेत. अशा दोलायमान स्थितीमध्ये राष्ट्रपती अखेरचा निर्णय घेतील. यामधून कोणताही तोडगा निघाला नाही तर काळजीवाहू सरकारला काम पाहावे लागेल आणि नंतर नव्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल.
पोतरुगाल संसदेतील तिढा कसाही सुटला तरी यानिमित्ताने गोवन वंशाच्या एका व्यक्तीस पंतप्रधानपदी बसण्याची संधी मात्र खुली झाली हे निश्चित म्हणता येईल. अँटोनियो यांचे वडील ओरलँडो अँटोनियो फर्नादेस दा कोस्टा हे ख्यातनाम लेखक होते. मोझांबिक या पोतरुगालच्या आफ्रिकेतील वसाहतीत जन्मलेल्या ओरलँडो यांचे वडील लुईस अफोन्सो गोवन, तर आई पोतरुगीज होती. त्यांची अनेक पुस्तके पोतरुगालमध्ये प्रसिद्ध आहेत. 18 व्या वर्षार्पयत गोव्यात राहिल्यानंतर ते लिस्बनला निघून गेले. मारिया या लेखिकेशी त्यांनी विवाह केला आणि अँटोनियो कोस्टा यांचा 1961 मध्ये लिस्बनमध्ये जन्म झाला, तर दुस:या विवाहापासून झालेला रिकाडरे कोस्टा हा त्यांचा मुलगा नावाजलेला पत्रकार आहे. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या अँटोनियो यांनी हळूहळू पोतरुगीज राजकारणामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाजमंत्री, न्याय, गृह अशा अनेक मंत्रिपदांवर त्यांनी काम केले. युरोपियन पार्लमेंटच्या उपाध्यक्षपदीही त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर लिस्बन या राजधानीच्या शहराचे मानाचे आणि अनेक मोठे अधिकार असलेले महापौरपद त्यांना मिळाले. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. 2क्14 साली अँटोनियो यांच्याकडे आपल्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याची संधी आली. अँटोनियो जोस सेगुरो यांचा त्यांनी 69 टक्के मतांनी पराभव केला व ते पक्षातर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले आणि ते पक्षाचे सरचिटणीसही झाले. अँटोनियो सध्या पोतरुगालच्या संसदेत विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत आहेत. राष्ट्रपतींच्या निर्णयानंतर ते पंतप्रधान होऊ शकतील. ते पंतप्रधानपदी बसावेत यासाठी गोव्यात राहणा:या त्यांच्या नातलगांनी प्रार्थना केली असून, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजही मडगावमध्ये त्यांच्या घराण्याचे जुने घर आहे. आपल्या गोयंचा बाबुश इतक्या मोठय़ा पदावर बसणार याचा त्यांना आणि समस्त गोयंकरांना निश्चितच अभिमान वाटत असणार!
गोव्याचे मोझांबिक - अंगोलाशी नाते
मोझांबिक आणि अंगोला या पोतरुगीजांच्या आफ्रिकेतील महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या वसाहती होत्या. त्यामुळे मोझांबिक आणि अंगोलाशी गोवन लोकांचा संबंध येई. गोव्यातील लोक मोठय़ा संख्येने आफ्रिकेत स्थलांतरितही झाले. अँटोनियो यांचे आजोबा लुईस अफोन्सो मोझांबिकमध्ये होते. 451 वर्षाच्या पोतरुगाल-गोवा संबंधांमुळे हजारो गोवन नागरिक पोतरुगालमध्येही स्थायिक झाले. त्यापैकी पोतरुगालच्या संसदेत जाण्याचा मान काहींनी मिळविला.
पोतरुगालच्या राजकारणात आणखी एका गोवन वंशाच्या नागरिकाचे नाव घेतले जाते ते म्हणजे नाराना कौसारो (नारायण कायसेरे) यांचे. 1932 साली गोव्यात जन्मलेल्या नाराना यांनी 1976 पासून 2क्क्5 र्पयत संसदेचे सदस्य राहण्याची कामगिरी केली. आता राजकारणातून निवृत्त झाले असले तरी नाराना यांचे नाव पोतरुगालच्या राजकारणात आदराने घेतले जाते.
एकेकाळचे अंकित,
आजचे राज्यकर्ते
एकेकाळी भारतावर पोतरुगीज, इंग्रज, फ्रेंचांनी वसाहती तयार करत व्यापारापाठोपाठ राजकीय संबंध प्रस्थापित केले. वसाहतींच्या निमित्ताने भूभाग बळकावून राज्यही केले. पण या वसाहतवादी देशांमुळे भारतीयांचा इतर खंडांशीही संबंध आला. ऊस, रबर, चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी किंवा खाणकामासाठी भारतीय मजुरांना समुद्र ओलांडून जावे लागले. श्रीलंका, वेस्ट इंडिज, फिजी, आग्नेय आशियातील देश, दक्षिण आफ्रिका, केनया, नायजेरिया अशा अनेक देशांमध्ये भारतीय पोहोचले. या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या बदलांमुळे भारतीय वंशाच्या लोकांनीही भराभर प्रगती करायला सुरुवात केली. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रमध्ये त्यांनी जसे भक्कम पाय रोवले तसे स्थानिक राजकारणातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. यापैकी अनेक देशांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी राजकारणात विविध पदे भूषविली आणि नेतृत्वही केले.
मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लहानसा अपवाद वगळता शिवसागर रामगुलाम, नवीन रामगुलाम आणि अनिरुद्ध जगन्नाथ यांनी पंतप्रधानपद भूषविले, तर फिजीच्या पंतप्रधानपदी महेंद्र चौधरीही काही काळ होते. श्रीलंकेच्या संसदेत तमिळ वंशाचे आर. संपथन सध्या विरोधी पक्षनेते आहेत. कॅनडाचे नवनिर्वाचित संरक्षणमंत्रीही भारतीय वंशाचे आहेत. स्वातंत्र्यानंतर स्थलांतरित झालेले काही लोक सध्या अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडाच्या राजकारणात नाव कमावत आहेत. पण राज्यकत्र्या देशात वसाहतीमधील माणसाने पंतप्रधानपदी बसण्याची संधी अँटोनियो कोस्टा यांच्या रूपाने आता मिळणार आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
onkar2@gmail.com