चीनला एवढी खुमखुमी का? - सुधीर देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:00 AM2020-09-13T06:00:00+5:302020-09-13T06:00:01+5:30

मुळात प्रश्न असा की,  कोरोनाकाळात जगभर नाचक्की सहन करणारा चीन  युद्धखोर भूमिका का घेतो आहे? 

Why China wants war? Special conversation with former Foreign Secretary of India Sudhir Deore | चीनला एवढी खुमखुमी का? - सुधीर देवरे

चीनला एवढी खुमखुमी का? - सुधीर देवरे

Next
ठळक मुद्देभारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांच्याशी विशेष बातचित..

- सुधीर देवरे

भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची नुकतीच बैठक झाली. नियंत्रण रेषेवरचा तणाव कमी करण्यासाठी या बैठकीत पाच कलमी कार्यक्रमावर सहमती झाली. आता या बैठकीनंतर तरी भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्फोटक बनलेली परिस्थिती आटोक्यात येईल अशी चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांच्याशी केलेला हा संवाद :


 * कोरोनाकाळात सगळे जग हेलपाटलेले असताना चीनला युद्धाची एवढी खुमखुमी का? 
मुळात कोरोनामुळे जगभरातल्या इतर देशांइतका चीन होरपळला नाही. भारताइतका तर नाहीच. चीनची एकूण राजकीय व्यवस्था बघता त्यांनी कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवलं. दुर्दैवानं जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे कोरोना साथ दडपणं, लपवणं त्यांना जमलं, त्यासाठी मदतच मिळाली. 
दुसरीकडे चीनला जगाशी, भारताशी, अमेरिकेशी सगळ्यांशीच नवा डाव मांडायचा आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अधिपत्याखाली चीन खूप महत्त्वाकांक्षी बनला. 2010 आधीची आणि त्यानंतरच्या काळातली चीनची परिस्थिती यात फार फरक पडला आहे. गेल्या 8-10 वर्षांत चीनने लक्षणीय प्रगती केली. आर्थिक घडी उत्तम बसवली. जगभरातल्या देशांनी चीनमध्ये गुंतवणूक केली. भारतानेही केली. चीनमधून स्वस्तात वस्तू आयात करणं सार्‍या जगानं केलं, भारतानेही केलं. त्याचा चीनला अमाप फायदा झाला. आजच्या घडीला चीन दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 14 ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था, त्यापेक्षा मोठी फक्त अमेरिकेची 21 ते 22 ट्रिलिअन डॉलर्स. मात्र चीन झपाट्याने आर्थिकदृष्ट्या मोठा होतो आहे. अर्थसत्ता मोठी होत असल्याने चीनची महत्त्वाकांक्षा वाढली.
ज्यांनी चीनमध्ये आर्थिक क्रांती घडवून आणली ते राजकीय नेते डेंग शिवोपिंग. ते नेहमी उपदेश करत की नम्र राहा, प्रगती करा; पण जमिनीवर राहा, आपल्या वाढत्या ताकदीचा बडेजाव मिरवू नका, आपण जेव्हा खूप मोठे होऊ तेव्हा सार्मथ्य दाखवा, तोवर कष्ट करा. प्रगती करा.
मात्र तो उपदेश सध्या चीनने धुडकावून लावला आहे. आता चीनला वाटतं आहे की, आपण जगातली मुख्य सत्ता आहोत. आशियात तर आपणच क्रमांक एकचा देश आहोत. म्हणून आपलं सार्मथ्य त्यांनी आता दाखवायला सुरुवात केली आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनचा अन्य देशांशी संघर्ष सुरू आहे. 1982 साली झालेला ‘लॉ ऑफ सी’ आता त्यांना मान्य नाही. सगळे करार गुंडाळून ठेवत ते समुद्रातल्या छोट्या बेटांसह समुद्रावरच दावा सांगत आहे. व्हिएतनाम, जपानशी वाद आहेच, चीनची नौसेना अमेरिकेला शह देण्याइतपत तयारीची नसली तरी ते चकमकी करत असतात. तैवान, फिलिपिन्स या देशांशी मोठा संघर्ष आहे. आणि भारताशीही सीमावाद आहेच.
चीनने अनेक शेजारी देशांशी सीमाप्रश्नी चर्चा, तडजोड करून सीमानिश्चिती केली आहे. मात्र अजून भारत-चीन सीमावाद  सुरूच आहे, त्यात चीनला अजूनही 1962ची आठवण आहे, आणि त्या आठवणींचं भारतावरही दडपण आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर दावा करतोच आहे, भारतीय सेना पुरेशी प्रबळ नाही असं चीनला वाटतं, त्यात भारताला थेट मदत करील असा देशही नाही, त्यामुळेही चीन सतत भारतावर दबाव आणण्याचा प्रय} करत राहील. एकीकडे चिनी महत्त्वाकांक्षा, आर्थिक सार्मथ्य आणि सोबत शेजारी देशांवर दडपण म्हणून चीन अशा कुरापती करतो आहे.

* पण मग या कुरापती दीर्घकाळ चालतील, शांती-समझौते होतील की थेट युद्धाचाही कधीतरी भडका उडेल?
- भारताला युद्ध नको आहे. चीनला काय हवं ते आपल्याला माहिती नाही. मात्र तरीही चीनशी लष्करी, राजनैतिक बोलणी सुरूच राहतील. बोलण्यातूनच प्रश्न सुटायला हवेत. आणि भारत चीनइतका प्रबळ नसला तरी भारताची ताकद कमी नाही. भारत चीनशी तुल्यबळ लढा देऊ शकतो, याची चीनलाही जाणीव आहे.
त्यामुळे मोठय़ा प्रमाणात युद्ध होईल असं वाटत नाही. मात्र 3500 किलीमीटरची सीमा आहे. चीन कधीही आगळीक करू शकतो, त्यामुळे भारताची तयारी सगळीकडे असेल. भारतात देशांतर्गत लोकशाहीत पक्षीय मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न देशाच्या सुरक्षिततेचा आणि सार्वभौमत्वाचा असतो तेव्हा सगळे ‘एक’ होतात. त्यामुळे थेट युद्ध होईल का या प्रश्नापेक्षाही चीन आगळीक करत राहील, त्यासाठी भारताला सज्ज रहावे लागणार आहे.
* चीनसह अन्य शेजारी राष्ट्रांशीही भारताचे सध्याचे संबंध सलोख्याचे नाहीत, किंवा तणावपूर्ण आहेत, अशा परिस्थितीचा चीनला अधिक लाभ होईल, भारताला तोटा असं वाटतं का?
भारत शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रय} आपल्या बाजूने करत असतो. मात्र चीनची प्रगती, आर्थिक-लष्करी सार्मथ्य यांचा प्रभाव शेजारी देशांवरही पडतो. त्या देशांवरही चीन कुरघोडी करण्याचा प्रय} करतो. पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, नेपाळ, र्शीलंका या देशांना चीन मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत करतो. त्यांना भारताच्या विरोधात फूसही लावतो. या देशांनाही चीनच्या आर्थिक सत्तेचं आकर्षण आहेच. चीनशी सलगी त्यांच्या पथ्याची आहे. त्यामुळे भारताने शेजारी राष्ट्रांशी सलोखा राखत, त्यांच्यासोबतचे प्रकल्प अधिक जलद पूर्ण करत आपली मैत्रीपूर्ण धोरणं कायम राखली तर ते देशही भारतासोबत राहतील. लोकशाही ही भारताची ताकद आहे, त्या व्यवस्थेचं शेजारी देशांनाही आकर्षण आहे, त्यांच्याप्रति आपली संवेदनशीलता कमी होता कामा नये. 
मुलाखत
 - मेघना ढोके

Web Title: Why China wants war? Special conversation with former Foreign Secretary of India Sudhir Deore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.