वर्ल्डकपच्या घरी..

By admin | Published: February 15, 2015 03:10 AM2015-02-15T03:10:36+5:302015-02-15T03:10:36+5:30

ट्रेन-बसमधून विविध प्रकारचे पोषाख करून स्टेडियमकडे वाहत चाललेली गर्दी, क्रिकेट स्टेडियमजवळ राहणा:या लोकांनी उघडलेले बार्बेक्यू आणि त्यावर खमंग भाजले जाणारे सॉसेजेस,

World Cup home .. | वर्ल्डकपच्या घरी..

वर्ल्डकपच्या घरी..

Next
>फोटोंचा अखंड क्लिकक्लिकाट, ट्रेन-बसमधून विविध प्रकारचे पोषाख करून स्टेडियमकडे वाहत चाललेली गर्दी, क्रिकेट स्टेडियमजवळ राहणा:या लोकांनी उघडलेले बार्बेक्यू आणि त्यावर खमंग भाजले जाणारे सॉसेजेस, 
सन स्क्रीनचे मोफत वाटप, सामोसे, आइस्क्र ीम, वेफर्स, मफिन्स, मक्याच्या लाह्या 
यांचे भरपूर साठे करून प्रेक्षकांची आणि आपला जोरदार धंदा होण्याची 
वाट पाहणारी छोटी दुकाने.
.. इथे न्यूझीलंडमध्ये नुस्ती धमाल उडाली आहे!
 
णार येणार म्हणून कधीचे गाजत असलेल्या वर्ल्डकप क्रिकेटचे सामने अखेरीस काल सुरूही झाले, यावर खरे सांगायचे तर माङया शेजार-पाजा:यांचा अजून विश्वासही बसत नाहीये. 
माङया-दत्तक-देशातले म्हणजे न्यूझीलंडमधले वातावरण तर कधीचे तापले आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना काल ाइस्ट चर्चच्या हेगली पार्कला झाला आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे 28 मार्च 2क्15 रोजी होईल. 
- पण या सोहळ्याची पूर्वतयारी केव्हापासूनच चालू आहे. 2क्11 सालीच न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांना 2क्15 चे यजमानपद मिळणार हे नक्की झाले होते. फेब्रुवारी 2क्11 मध्ये झालेल्या भयानक भूकंपामुळे ाइस्ट चर्चमधील हेगली पार्क येथील क्रिकेटच्या स्टेडियमचा धुव्वा उडाला होता.  पण सर्वच शहराचे पुनर्निर्माण करताना या स्टेडियमकडे विशेष लक्ष देण्यात आले कारण 2क्15 चा पहिला सामना येथे खेळला जाण्याचे ठरले होते.  न्यूझीलंडचे सरकार, ाइस्ट चर्चचे सिटी काउिन्सल कंबर कसून कामाला लागले आणि आता 2क्,क्क्क् प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान सामन्यासाठी सिद्ध झालेले आहे. हेगली पार्क येथील या स्टेडियमला क्रिकेट खेळण्याचा जबरदस्त अनुभव आहे. पहिल्यांदा येथे झालेला क्रिकेटचा सामना 16 डिसेंबर 1851 रोजी झालेला होता! म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपेक्षाही जास्त काळापूर्वी !
सर्वसामान्य नागरिकांसाठी क्रिकेट वर्ल्डकपच्या या सामन्यांची जाहिरात सुरू झाली ती 2क्14 च्या दिवाळीत. दिवाळीच्या रांगोळी, चित्रकला, खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये क्रिकेटचे छोटेसे मैदान उभे करून बॉलिंग व बॅटिंग करायची संधी प्रेक्षकांना दिली जात होती. लहान मुलांपासून वयस्कर स्त्रियाही यात उत्साहाने सहभागी होत होत्या.
 मग स्थानिक पेपरांमधून प्रत्यक्ष सामन्यांच्या वेळी यंत्रणांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून भरती होण्याच्या जाहिराती येऊ लागल्या.  त्याला तुफान गर्दी लोटली. विविध देशातून येऊन न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन डिसेंबर 2क्14 च्या सुमारास निवड झालेल्या स्वयंसेवकांना ई-मेलने आनंदाची बातमी कळविण्यात आली.  
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात स्वयंसेवकांसाठी तीन तासांचे ट्रेनिंग घेण्यात आले. अर्थातच मीही त्या गर्दीत होते. ट्रेनिंगमध्ये प्रत्येक स्वयंसेवकाला एक व्हॉलंटियर हॅण्डबुक देण्यात आले.  त्यात वर्ल्डकप क्रिकेटचा इतिहास, कोणते सामने कोठे व केव्हा होणार याची यादी, या सामन्यांचे पार्टनर कोण इत्यादी सर्व माहिती थोडक्यात दिलेली आहे. मुख्यत: स्वयंसेवकांनी कसोशीने पाळण्याच्या नियमांची वारंवार वाच्यता करण्यात आली.
- म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तातडीने वरिष्ठांना गाठून योग्य ती माहिती मिळवून संबंधित प्रेक्षकांना देणो, विविध देशातील लोकांच्या विविध संस्कृतींचा  आदर करणो, कोणत्याही खेळाडू वा देशाविषयी हानिकारक-अपमानजन्य वक्तव्य न करणो या गोष्टींवर विशेष भर होता. शिवाय अगदीच न ऐकणा:या, अपेक्षित शिस्त न पाळणा:या काही कठीण प्रेक्षकांना कसे हाताळायचे, अपंग प्रेक्षकांना मदत कशी करायची, गर्दी व लांबच लांब रांगा असल्या तरी न डगमगता आणि  खिलाडूपणो ते प्रसंग कसे हाताळायचे याचे प्रशिक्षणही होते. 
स्वयंसेवकांची विभागणीही त्यांच्या कामाच्या पूर्वानुभावानुसार करण्यात आली होती - म्हणजे काहींना खास व्हीआयपी कक्षात, काहींना टीव्ही, न्यूज चेनेल व रेडिओ यांच्या कक्षात तर काहींना खास पाहुण्यांच्या कक्षात इत्यादी. 
स्वयंसेवकांचे काम अनेकांगी आहे. ते अर्थातच अगदी विमानतळापासून सुरू होते. आलेल्या पाहुण्यांना शहराची, हॉटेलची माहिती, स्टेडियमचे ठिकाण, बस-ट्रेनची माहिती इत्यादी देणो हा या कामाचा पहिला टप्पा आहे. प्रत्यक्ष स्टेडियमवर आल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या जागा शोधून देणो, खाण्याचे स्टॉल, मोफत वाय फाय कनेक्शन, सुरक्षा, गरज पडल्यास रुग्णवाहिका कुठे आहेत याची माहिती देणो.. असे कितीतरी अगदी यथासांग, भरपूर काम. प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणजे एरव्ही ज्या ठिकाणी सर्वसामान्य प्रेक्षकांना जायला मज्जाव असतो अशा सर्व स्थानांची टूर!
- खेळाडूंची कपडे बदलण्याची जागा, त्यांना जेवण मिळणार ती जागा, आंघोळीच्या सोयी (त्यात गरम पाण्यात डुंबण्यासाठी जाकुझीचाही समावेश आहे), क्रिकेट टीमच्या अंपायर्सचे कक्ष व शेवटी खेळाडू ज्या बोगद्यातून खेळायला बाहेर पडतात किंवा मैदानावरून परततात ती अगदी प्रचंड सुरक्षा असलेली जागा. 
या सामन्यांसाठीच्या स्वयंसेवकांच्या तीन तासांच्या ट्रेनिंगमध्ये प्रेक्षकांना सौजन्यपूर्ण वागणूक देणो, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणो याचबरोबर काही अयोग्य असे घडते आहे अशी शंका आली, तरी तातडीने वरिष्ठांना त्याची माहिती देणो, मैदानात बाहेरून कोणतेही मद्य अथवा ड्रग आणून देणो अशा सज्जड सूचना देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांबरोबरच अग्निशामक दलाचे कर्मचारी, पोलीस, रुग्णवाहिका व त्यांचे कर्मचारी यांचे ताफेही सिद्ध असतीलच. त्यांच्याबरोबर आपत्तीच्या प्रसंगी कसा समन्वय ठेवायचा हेही आम्ही शिकून घेतले आहे.  
- हे प्रशिक्षण संपल्यानंतर स्वयंसेवकांना खास या प्रसंगी वापरण्यासाठी युनिफॉर्म देण्यात आले.  6 नोव्हेंबर ते 27नोव्हेंबर 2क्14 या काळात क्रिकेटच्या ट्रॉफीचा देशभर दौरा होता. ठराविक ठिकाणी जाऊन ट्रॉफीशेजारी उभे राहून फोटो काढणो ही सर्व नागरिकांसाठी सोय होती - शिवाय फोटो मोफत! हजारो नागरिकांनी, आबाल-वृद्धांनी याचा फायदा घेतला. या वर्षी ािसमसच्या सुट्टीतसुद्धा ऑफीसमध्ये कामाला यायला अनेक लोक तयार होते कारण क्रिकेट सामन्यांसाठी न्यूझीलंडमधील शहरांमध्ये किंवा ऑस्ट्रेलियाला जायला विनातक्रार रजा मिळावी म्हणून. टीव्हीवर सामन्यांच्या जाहिराती सुरू झाल्या. ट्रॅव्हल एजंटांचा धंदा चांगलाच वाढला. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या देशांना भेट देण्यासाठी परदेशीचे लोक येऊ लागले. भारत तर क्रिकेटवेडा देश. शिवाय या दोन्ही देशात आता बरेच भारतीय स्थायिकही झालेले आहेत. त्यामुळे येथील स्थायिक भारतीयांनाही आपापल्या नातेवाइकांचे यजमानपद मिळत आहे. 
न्यूझीलंडमधील ज्या शहरांमध्ये सामने आहेत तिथे शहराच्या मध्यवर्ती भागात ‘फॅन झोन’ निर्माण केलेले आहेत.  म्हणजे तिथे खाणो-पिणो, करमणुकीचे कार्यक्र म व विशेषत: सामुहिकरित्या टीव्हीवर सामने पाहण्याची सोय सिटी काउन्सलतर्फे केलेली आहे. जमलेल्या प्रेक्षकांनी दिलेली दाद, ओरडा-आरडा व  उत्तम ङोललेल्या कॅचला मद्याचे घुटके घेत दिलेला प्रतिसाद ही उत्साहाच्या लाटांवर लाटा पसरविणारी गोष्ट असते. सिटी काउन्सलने फॅन झोन सारखेच फॅन ट्रेलदेखील त्या-त्या शहरात निर्माण केले आहेत. म्हणजे वाजत गाजत एखादी दिंडी यावी तसे प्रेक्षक शहरातील एका ठराविक ठिकाणी जमून शहरातील महत्त्वाची ठिकाणो पाहत पाहत, सामुदायिकरीत्या क्रिकेटच्या मैदानावर चालत पोहचतील.. अर्थातच या दिंडीसोबत नाचणारे, गाणारे, विदूषक यांची हजेरीही असणारच!
मित्रंच्या घरी जमून एकत्रितपणो टीव्हीवर सामने पाहणा:यांची निमंत्रणो केव्हाचीच पोचलेली आहेत.
फोटोंचे क्लिकिक्लकाट, ट्रेन-बसमधून विविध प्रकारचे पोषाख करून स्टेडियमकडे वाहत चाललेली गर्दी, जागोजागी स्टेडियमजवळ राहणा:या लोकांनी उघडलेले बार्बेक्यू व त्यावर खमंग भाजले जाणारे सॉसेजेस, सन स्क्रीनचे मोफत वाटप, छोटय़ा-मोठय़ा पिपाण्या-एकूण सगळी धमाल उडणार आहे.
 स्टेडियमच्या आसपासचे रस्ते बसेस, कार्स यांना सामन्यांच्या वेळी बंद असेल. याच्या पाटय़ाही आदल्या दिवसापासून जागोजागी लागतीलच. स्टेडियम जवळ असलेल्या डेअ:या (म्हणजे आपल्याकडे असतात, तशी जनरल स्टोअर्स) सामोसे, आइस्क्र ीम, वेफर्स, मफिन्स, मक्याच्या लाह्या यांचे भरपूर साठे करून प्रेक्षकांची आणि आपला जोरदार धंदा होण्याची वाट पाहत आहेत.
 प्रेक्षकांनी भरलेल्या बसेस जिथे येणार तिथेही स्वागतासाठी नटलेल्या मुली व माओरींचा ‘हाका’ डान्स होणार!  
चला तर. आता भेटू या काही सामने झाल्यानंतर!
 
(लेखिका न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरी वास्तव्याला असून क्रिकेट वर्ल्ड कपच्या संयोजनात स्थानिक स्वयंसेवक म्हणून सहभागी आहेत.)

Web Title: World Cup home ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.