संचित.. - माट्यास वोल्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 06:01 AM2020-06-28T06:01:00+5:302020-06-28T06:05:01+5:30
काळ गोठून राहिल्यावर दिसेल असे वातावरण. जागोजागी असंख्य वाद्यं, कागदपत्रे आणि पुस्तके, भिंतीजवळ साठीच्या दशकातील रेकॉर्डसची भली मोठी थप्पी आणि भिंतीवर पूर्वजांची काळ्या-पांढर्या रंगातील भली मोठी पोट्र्रेटस. अतिशय सौम्य दिसणारे आणि मार्दवाने बोलणारे समोर बसलेले गुरु! शिष्य म्हणून त्या दिवशी त्यांनी माझा स्वीकार केला! या दिवसापासून मला माझ्या आयुष्याचे मक्सद मिळाले. दोन्ही हातांनी भरभरुन घेत असतानाच ही भारतीय र्शिमंती जपून ठेवण्याचाही मी प्रय} करतो आहे.
- माट्यास वोल्टर
कोलकात्याच्या एका गजबजलेल्या रस्त्याला लागून असलेल्या एका चिंचोळ्या, जेमतेम उजेड असलेल्या अगदी बिन चेहेर्याच्या गल्लीमध्ये लखनौ-शहजहानपूर घराण्याचे अखेरचे खलीफा उस्ताद इरफान महमद खान यांचे घर शोधत फिरत होतो. कोणीतरी एका सामान्य, बैठ्या जुनाट दिसणार्या घराकडे बोट दाखवले आणि त्या घरावर थाप मारली. दर उघडताच जाणवले, काळ गोठून राहिला तर कसा दिसेल तसे वातावरण होते त्या घरात. जागोजागी दिसणारी असंख्य वाद्यं, कागदपत्रे आणि पुस्तके, भिंतीजवळ उभ्या केलेल्या एका रॅकमध्ये साठीच्या दशकात वाजवल्या जाणार्या रेकॉर्डसची भली मोठी थप्पी आणि भिंतीवर पूर्वजांची काळ्या-पांढर्या रंगातील भली मोठी पोट्र्रेटस. अतिशय सौम्य दिसणारे आणि मार्दवाने बोलणारे गुरु समोर बसले होते. शिष्य म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा स्वीकार केला तो दिवस मी जेव्हा-जेव्हा आठवतो त्या प्रत्येक वेळी मला जाणवत राहते, या दिवसापासून मला माझ्या आयुष्याचे मक्सद मिळत गेले. तोपयर्ंतचे आयुष्य अर्थपूर्णच होते आणि कमालीचे आनंदीसुद्धा पण तरीही एका उद्दिष्टाची तहान सारखी जाणवत होती. अंधारलेली वाट हळूहळू उजळत जावी, तसा काहीसा होता हा अनुभव..! 2010 साली म्हणजे, अगदी दहा-बारा वषार्पूर्वी आलेला.
एव्हाना भारतात येऊन मला काही वर्ष उलटून गेली होती. पंडित सुब्रतो रॉय चौधरी यांच्यासारखा गुरु, त्यांच्याकडून मिळणारे शिक्षण आणि त्यांच्याच आग्रहाने होणार्या माझ्या खासगी छोट्या मैफली हे सगळे, आणखी बराच काळ नक्कीच चालणार आहे असे मला वाटत होते. भारतीय रागसंगीताचा अथांग आवाका आत्ताशी कुठे नजरेला दिसू लागला होता. आणि माझा इरादा त्यात पुष्कळ दूरवर जायचा होता. अर्थात, तरीही मनात खोलवर सतत वीणेचे खर्जातील गंभीर स्वर वाजत असायचे. गुरुजींकडे एक तपापासून सुरु असलेले शिक्षण एकाएकी बंद झाले नसते तर कदाचित हे वीणेचे स्वर मनातच वाजत राहिले असते, पण ऐन मैफल सुरु असतांना सतारीची तार तुटून सगळा माहोल बदसूर व्हावा तसा गुरुजींचा एकाएकी मृत्यू झाला आणि मी सैरभैर झालो. वाटले, वीणेचे शिक्षण देणार्या गुरूचा शोध घेण्यासाठी मिळालेला हा संकेत की काय? हा शोध घेत आज उस्ताद इरफान यांच्या समोर बसलो होतो. त्यांनी भोवतालच्या अनेक वाद्यांमधून माझ्या हातात सूरबहार नावाचे वाद्य ठेवले. कालबाह्य होत चाललेले आणखी एक वाद्य..!
अर्थात माझ्यासाठी ते कालबाह्य नव्हते आणि अनोळखी तर अजिबात नव्हते. सतारवादक मुश्ताकअली खान यांनी वाजवलेली सूरबहारची एक मैफल ही माझ्या नेहेमीच्या आवडीच्या मैफलीपैकी एक. भारतात येण्यापूर्वी कितीतरी आधी ही सगळी वाद्यं आणि वादक यांच्याशी माझे जीवाभावाचे मैत्र जुळले होते. माझ्या गावापासून, देशापासून कित्येक मैल दूर राहणारे हे कलाकार, जणू माझा शोध घेत आल्याप्रमाणे माझ्या दाराशी आले. रेकॉर्डच्या माध्यमातून. अजून आठवतात ते वेडे दिवस..
लहान वयात माझा आणि संगीताचा संबंध फक्त रेडीओपुरता जुजबी होता. मग पाश्चिमात्य देशातील इतर शेकडो तरुण, अडनिड्या वयातील मुले वाजवतात तसे मी गिटार वाजवू लागलो, गाणी लिहू लागलो. मीच माझा गुरु होतो. माझ्या गाण्याची गरज म्हणून मी आणखी वाद्यांचा शोध सुरु केला. ड्रम्स, पियानो, एकेक वाद्यपुस्तक वाचून शिकता-शिकता माझा स्वत:चा एक छोटा स्टुडीओ मी उभा केला. मला संगीत आवडते आहे असे वाटू लागले पण ते अगदी थोडा काळ. हात धरून नव्या वाटा शोधायला मदत करणारा गुरु नसलेल्या विद्यार्थ्याला जे साचलेपण येते तसे मला येऊ लागले होते आणि त्याच्याबरोबरीने कमालीचा कंटाळा.
हाताशी असलेल्या वाद्यांमधून नवीन असे काही मला सापडत नव्हते, पुढे काय? त्यावेळी कुठूनसे भारतीय संगीत, बहुदा पंडित रविशंकरजीच, कानावर आले. मग मी ते गिटारवर वाजवून नवे काही घडते ते अजमावू लागलो. त्याबरोबर जाणवू लागले, हे अर्मयाद आहे.! आणि त्यापाठोपाठ, अँथॉलॉजी ऑफ नॉर्थ इंडियन म्युझिक नावाचा एक अद्भुत खजिना माझ्या हाताशी आला. माझे आयुष्य घुसळून काढणारा!
त्यात हिंदुस्तानी संगीताचे जेवढे म्हणून वैविध्य आहे त्याचा तपशील, त्याचा इतिहास आणि वाटचाल, त्यातील प्रमुख कलाकार आणि त्यांनी गायलेले राग असे न संपणारे बरेच काही होते. तेव्हा झालेली एक प्रखर जाणीव म्हणजे, ह्या संगीतातून आपल्याला खूप उर्जा मिळू शकते पण त्याच वेळी हे संगीत आपली खूप उर्जा मागणारे सुद्धा आहे..!
रागाच्या एका छोट्या दिसणार्या बीजात विस्ताराच्या असलेल्या अशक्य शक्यता सतत आव्हान देणार्या आहेत. आणि जेव्हा या शक्यतांच्या वाटेने तुम्ही त्या रागात शिरत असता तेव्हा तो रागही त्या-त्या वेळी तुमच्यातील सृजनाच्या सगळ्या शक्ती जणू शोषून घेत असतो..! भारतीय संगीत नावची ही गुंतागुंतीची दुनिया त्यातील बारीक-सारीक तपशिलांच्या मदतीने तुमची वाट सोपी करीत जाते..!
हे सर्व जवळून अनुभवण्यासाठी मी भारतात जाण्यचा बेत आखला तेव्हा मात्र आई-वडील दचकले. तेव्हा मनात योजना होती ती सरोद शिकण्याची आणि त्यासाठी गुरु शोधण्याची. एकाही व्यक्तीची ओळख नसताना, लाखो माणसं आणि जंगलं-हत्ती असलेल्या, कमालीचे हॉट अन्न खाणार्या, स्वच्छता कशाशी खातात ह्याची ओळख नसलेल्या अशा देशात आपला कोवळा मुलगा निघालाय हे आई-वडिलांसाठी दु:स्वप्नच होते..!
.पण तरी मी दिल्लीत आलो आणि गंगा बघण्याच्या उत्सुकतेने ऋषिकेशला पोचता-पोचता हॉट अन्न खाऊन सपाटून आजारी पडलो! परतीची वाट धरता येऊ नये असे हे आजारपण होते. त्या वेळी मला ऋषिकेशच्या हॉटेलजवळ असलेल्या एका खोलीतून गाण्याचे स्वर ऐकू आले आणि रिकामपण घालवण्यासाठी माझे सतारीचे शिक्षण सुरु झाले. माझे आजारपण या सतारीने थोडे सुसह्य केले आणि हे संगीत शिकण्याचा निर्धार पक्का..
ज्या गुरुजींच्या, सुब्रतो रॉय चौधरी यांच्या तब्बल चौदा वर्षाच्या सहवासात मला दृष्टीत न मावणार्या भारतीय रागसंगीताच्या विश्वाची ओळख झाली त्या गुरुजींची माझी पहिली भेट माझ्या देशात, र्जमनीत, बर्लिनला झाली. कोलकत्त्यात मी त्यांच्याच घरात राहून शिकत होतो. त्यांनी मला निव्वळ भारतीय संगीताचीच नाही तर हे संगीत निव्वळ मौखिक परंपरेने शिकवणार्या गुरु नावाच्या एका संस्थेची ओळख करून दिली. मायेने खाऊ घालणार्या पण सराव झाला नाही हे समजल्यावर कडक शब्दात निर्भत्सना करणारा हा गुरु होता.
या वागण्याचे, लहरीपणाचे कोडे मला अनेकदा उलगडायचे नाही आणि मला त्या क्षणी घरी परत जाण्याची उबळ यायची! असे वैफल्य आले की आमच्या सहवासातील चांगल्या क्षणांची मी आठवण करायचो. भारतीय संगीत उत्स्फूर्त आहेच, पण एकच राग दरवेळी नव्या तर्हेने दिसतो, उलगडतो हे वेगळेपण म्हणजे तोच मित्र नव्याने भेटत राहण्यासारखेच की..!
सुब्रतो रॉय यांच्यानंतर ज्या गुरुजींचे बोट धरून मी शिक्षण सुरु केले त्यांच्या घरात शिक्षण घेता-घेता दिसत गेली ती या गुरूंच्या घराण्याची काळाने केलेली उपेक्षा! विशीच्या दशकात युरोपच्या रसिकांना आपल्या सरोद वादनाने घायाळ करणारे , बर्लिनच्या ऑलिम्पिकमध्ये आपले संगीत सादर करणारे आणि हिटलर-स्टालिनची भेट घेणारे सखावत हुसेन हे माझ्या गुरुचे आजोबा.
अनेक रागांच्या बंदिशी, विविध रचना, अनेक दुर्मिळ रेकॉडिर्ंग आणि दुर्मिळ वाद्ये, राग निर्मितीचे तपशील आणि प्रवास, असा संगीताच्या इतिहासाचा अफाट साठा या कुटुंबाकडे आहे. पण अगदी दुर्लक्षित. मैफली आणि प्रसिद्धी यांनी दूर लोटलेल्या या गुरूंची कोणाबद्दलच काही तक्रार नाही आणि अपेक्षा पण नाही. कोणताच कडवटपणा नसलेल्या या गुरूने मला सूरबहारची ओळख आणि मैत्री करून दिली. त्या सहवासात जाणवत गेली ती, त्यांच्याकडे असलेला अफाट इतिहास आणि ज्ञान. हे सर्व राखण्याची गरज. कमालीचे प्रगल्भ असे हे संचित मग माझ्या आयुष्याला उद्दिष्ट देत गेले. त्याचा सांभाळ करण्यासाठी मी ते सर्व डीजीटाईज करतो आहे.
सतार की सूरबहार असा प्रश्न कोणी मला विचारतो तेव्हा मी उत्तर देतो, भारतीय रागसंगीत..! त्याशिवाय दुसरे माझ्या आयुष्यात आता काहीही नाही..!
माट्यास वोल्टर
माट्यास वोल्टर हा र्जमन कलाकार सतार आणि सूरबहार ह्या दोन्ही वाद्यांच्या एकल मैफली करतो. भारतीय संगीत र्जमनीत लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी बर्लिन राग ट्राइब नावाचा एक उपक्रम राबवला होता. ज्यामध्ये ते भारतीय कलाकारांच्या छोट्या, घरगुती मैफली करीत. सध्या लखनौ-शहजहानपूर घराण्याच्या सर्व बंदिशी, रचना, आणि इतिहास डीजीटाईज करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. याखेरीज येना (जेना), पूर्व र्जमनी येथे ते भारतीय वाद्यसंगीत शिकवतात.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)