वर्ल्ड विदाउट वर्क
By admin | Published: April 29, 2016 11:29 PM2016-04-29T23:29:17+5:302016-04-29T23:29:17+5:30
अमुक-तमुक सेवेत आपलं स्वागत आहे.. तमुक हवं असल्यास एक दाबा.. ढमुक हवं असल्यास दोन दाबा.. तुम्ही आमचे नवीन ग्राहक असल्यास शून्य दाबा..
Next
>
यापुढे गाडी चालवणं असो,
रोगाचं निदान असो, नाहीतर कारखान्यात असेम्ब्ली लाइनवर काम करणं; यातल्या कशालाच माणसं लागणार नाहीत. कारण, अशा असंख्य कामांचा
‘घास’ ‘टेक्नॉलॉजी’ गिळंकृत करील!
कालची बलाढय़ ‘कोडॅक’ आज दिवाळखोरीत गेली.
आजचं काय काय उद्या संपेल?
आणि पुढे..?
अमुक-तमुक सेवेत आपलं स्वागत आहे.. तमुक हवं असल्यास एक दाबा.. ढमुक हवं असल्यास दोन दाबा.. तुम्ही आमचे नवीन ग्राहक असल्यास शून्य दाबा.. नवीन सेवांसंबंधी जाणून घेण्यासाठी नऊ दाबा..
- कोणत्याही सेवेच्या तक्रारीसाठी अथवा माहिती घेण्यासाठी फोन केल्यानंतर आजकाल ही अशी ‘कॅसेट’ ऐकायला मिळते. त्यानंतर ऐकू येणा:या ‘इन्स्ट्रक्शन्स’नुसार फक्त बटणं दाबायची.. की कुणाही ‘व्यक्ती’शी न बोलताच आपलं काम होतं, हा अनुभव तुम्ही हल्ली घेत असाल.
- कधी तुमच्या मनात विचार येतो का, की कॉल सेंटरमधली ‘माणसं’ गेली कुठे?
अगदी काही वर्षापूर्वीर्पयत रस्तोरस्ती एसटीडी-पीसीओची पिवळी खोकी असत. त्या खोक्यांबरोबरच त्यातली माणसं.. ती कुठे गेली?
कॅमे:यासाठी रोल वापरले जात, ते डेव्हलप करावे लागत, हे तर विसरलोसुद्धा आपण! - ते काम करणारे लोक कुठे गेले?
बघता बघता आपल्या सवयीची, सरावाची अनेक कामं नष्ट होत चालली आहेत आणि ती कामं करणारे हात त्यातून रोजगार कमवत होते; हे तर लक्षातही उरलेलं नाही इतरांच्या!
कारण? - तंत्रज्ञान!
आपल्या जगण्या-वागण्या-राहण्या-खाण्याच्या रीती बदलणारं तंत्रज्ञान आता सगळे जुने नियम, रचना बदलायला निघालं आहे.
यापुढे गाडी चालवणं असो नाहीतर रोगाचं निदान असो, मुलांना शिकवणं असो नाहीतर कारखान्यात असेम्ब्ली लाइनवर काम करणं; यातल्या कशालाच माणसं लागणार नाहीत. कारण, ही सगळी कामं ’टेक्नॉलॉजी’ स्वत:च्याच खांद्यावर घेईल.
आणि आपण हळूहळू ‘वर्ल्ड विदाउट वर्क’ या नव्या वास्तवाच्या दिशेने जायला लागू!
सध्या ऐन भरात असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे परिणाम केवळ अर्थव्यवस्थांवरच नव्हे, तर जिवंत माणसांकडे असल्या-नसल्या कौशल्यांवर किती खोलवर होतील, याविषयी जगभरात अत्यंत गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे.
आज वैभवाच्या शिखरावर असलेल्या बडय़ा कंपन्यांना अल्पावधीत तळाशी ढकलण्याचं, त्यांच्या व्यवसायाचं कारणच पुसून टाकून त्यांना पार नष्ट करण्याचं अजस्त्र सामथ्र्य असलेल्या या कालखंडाला सतत उन्नत होत चाललेल्या तंत्रज्ञानाचे पंख आहेत.
वाफेच्या शक्तीमधून यांत्रिकीकरण शक्य करणारी पहिली औद्योगिक क्रांती अठराव्या शतकातली. एकोणिसाव्या शतकात विजेच्या शोधानंतर ‘मास प्रॉडक्शन’ सुरू झालं. तिस:या औद्योगिक क्रांतीला आकार दिला तो विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या संगणकाने.
या तिन्ही टप्प्यांमध्ये साधारणत: शंभर वर्षाचं अंतर होतं. आता सुरू झालेला चौथा टप्पा मात्र जेमतेम चाळीस वर्षात बेडूक उडी घेत (लीप फ्रॉगिंग) माणसांच्या हातून काम हिसकावून घेणा:या तंत्रज्ञान-संयोगातून जग बदलायला निघाला आहे.
हे प्रकरण समजून घेण्यासाठी सध्या जगभरात एक ठळक उदाहरण दिलं जातं : कोडॅक.
फोटो घेण्यासाठी, चलत छायाचित्रणासाठीचे रोल्स, हे फोटो छापण्यासाठी लागणारा कागद आणि त्यासाठीचं तंत्रज्ञान यासाठी नावाजलेल्या या कंपनीची जगभर मक्तेदारी होती. 1998 साली जवळपास पावणोदोन लाख कर्मचा:यांचा फौजफाटा असलेल्या या बडय़ा कंपनीच्या अस्तित्वाचं कारणच नव्या डिजिटल टेक्नॉलॉजीने हिरावून घेतलं आणि अवघ्या तीन वर्षात ही कंपनी थेट दिवाळखोरीतच निघाली.
कंपन्यांची ‘बिङिानेस मॉडेल्स’ नष्ट होणं/ बदलण्याचा हा वेग येत्या दशकात अधिकच वाढेल आणि त्यामुळे अनेकांच्या हातची कामं एकतर नष्टच होतील किंवा ऑटोमेशनमुळे त्या कामासाठी माणसांची गरजच उरणार नाही.
त्यामुळे रोजगाराच्या संधी झपाटय़ाने घटतील, हे तर उघडच आहे.
- पण या संकटात काही संधीही असतील का?
जुनी कामं गेली/संपली/बदलली तर मग नवीही तयार होतील का?
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रित (फ्यूजन टेक्नॉलॉजी) आणि सुसूत्र वापरामुळे रोजगार गिळायला निघालेली चौथी औद्योगिक क्रांती नेमके कोणते बदल घडवेल?
या बदलांशी लढणं अशक्य / खरंतर निर्थकच असलं, तरी त्या बदलांशी जुळवून घेण्याची तजवीज/तयारी करता येईल का?