यल्लूआई.
By Admin | Published: January 9, 2016 02:09 PM2016-01-09T14:09:48+5:302016-01-09T14:09:48+5:30
मार्गशीर्षातल्या पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवत असताना भंडा:याच्या पिवळ्या सौंदर्यात न्हाऊन निघालेली मुंबईच्या कामाठीपु:यातली ही उतरती संध्याकाळ
>- सुधारक ओलवे
मार्गशीर्षातल्या पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवत असताना भंडा:याच्या पिवळ्या सौंदर्यात न्हाऊन निघालेली मुंबईच्या कामाठीपु:यातली ही उतरती संध्याकाळ! यल्लूआईच्या नावाचा मळवट कपाळी ल्यालेले हे चेहरे बुट्टीत सजून बसलेल्या आईच्या मायेपासून, तिच्या दयेपासून खरेतर वंचित!
- पण दरवर्षीच्या मार्गशीर्षात या वस्तीत आईच्या नावाचा भंडारा भक्तिभावाने उधळला जातो.
या वस्तीतल्या चढत्या ¬तूंचे भोग भोगून मावळतीला निघालेल्या स्त्रियांबरोबर त्यांनी सोडलेली वाट धरणो नशिबी आलेल्यांची मोठी गर्दी असते.
एरवीही निखा:यावरून चालणो असतेच नशिबी, या संध्याकाळी पायाखाली खराखुरा विस्तव पेटतो एवढेच! चटक्यांचे काय, ते तर सवयीचेच!
- या मिरवणुकीबरोबरमी गेली दहा र्वष नेमाने चालत आलो आहे. ‘आई’ला हाका घालणारे, भर रस्त्यात अचानक देह सोडून तिच्या पायावर लोळण घेताना ओक्साबोक्शी रडणारे आणि हळद-कुंकवाच्या पिवळ्या-लाल मायेखाली भिजलेले हे चेहरे माङयाजवळच्या कॅमे:याला दरवेळी एक नवी कहाणी सांगत आले आहेत.
हजार शब्दांत जे मावत नाही, ते एका छायाचित्रत पकडता येते. अचानक गवसलेला ‘तो एक क्षण’ कायमचा कैद करून ठेवणारे छायाचित्र ही एक कालकुपीच असते. जो पाहील त्या प्रत्येकाने आपापल्या नजरेने ‘त्या’ तेव्हाच्या क्षणाचा अन्वय लावावा!
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांनी ‘त्या एका क्षणा’च्या शोधात 1988 पासून देशाच्या कानाकोप:यात प्रवास केला आहे. या प्रवासात टिपलेल्या काही क्षणांची सफर या आठवडय़ापासून..