तू फूल है, फौलाद भी..

By admin | Published: May 16, 2015 01:51 PM2015-05-16T13:51:49+5:302015-05-16T13:51:49+5:30

एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या काना-कोप:यातलं संगीत, कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी हा एक खास कोपरा.

You are a flower, even steal .. | तू फूल है, फौलाद भी..

तू फूल है, फौलाद भी..

Next
>आपण मनापासून शॉर्टफिल्म, डॉक्युमेण्ट्री आणि व्हिडीओ पाहतो, मात्र जाहिराती पाहण्याइतकी फुरसत कुठे असते?
पण कधीकधी एखादी जाहिरातही आपल्याला अस्वस्थ करते आणि डोक्यात दिवाही उजळवून जाते. तशीच ही एक जाहिरात. अर्थात ती जाहिरात आहे आणि तीही एका केसांना लावायच्या तेलाची हे आपल्याला शेवटर्पयत कळतही नाही, कारण अशी जाहिरात असूच शकत नाही कुठल्याही केसाला लावायच्या तेलाची!
पण ती आहे!
कॉर्पोरेट क्षेत्रतील एक उच्चपदस्थ महिला, पाचसहा वर्षाच्या मुलीची आई, साथ देणारा नवरा असं घर. पण डोक्यावर केस मात्र नाहीत, पूर्ण टक्कल पडलेलं!
आजारपणातून उठून पहिल्यांदाच ऑफिसला जायचं तर ती बिचकतेय, आपलं हे ‘रूप’ जगाला कसं दाखवायचं, लोक काय म्हणतील अशी भीती मनात.
पण नवरा साथ देतो, हिंमत वाढवतो आणि नव्या आत्मविश्वासानं ती कार्यालयात पाऊल टाकते. तिचे सहकारीही तिचं उत्तम स्वागत करतात.
आपल्याला एक आजार झाला, आपण त्याच्याशी लढलो.
आणि त्यातून सावरुन नॉर्मल आयुष्य जगायला लागलो. हा आत्मविश्वास देणारा हा एक सुंदर व्हिडीओ आहे.
जो म्हणतो, Some People don't need hair to look beautiful
.असं म्हणावं असं काय आहे या व्हिडीओत हे पाहण्यासाठी ही लिंक.
https://www.youtube.com/watch?v=QomoNyfkqvg
- मृण्मयी सावंत
 
जास्वंदी
- ‘‘तुला कोणतं फूल आवडतं?’’ म्हटल्यावर ‘जास्वंद’ हे उत्तर फक्त मी आणि गणपतीच  देऊ!! आता जर तुम्ही म्हणालात की, ‘‘मीसुद्धा हे उत्तर दिलं असतं’’. तर कॉपी करताय राव!! अशी मस्त टिचकी मारणा:या या ब्लॉगरने नावही ‘जास्वंदी’ हेच घेतले आहे. 
2008 पासून लेखन. शब्दाशब्दातून कवित्व पाझरत असले की वाचक सहजच आत्ममग्नतेकडे वळतो. प्रत्येक पोस्ट असा संवाद घडवते. ‘छान गोष्टींचा विचार केला म्हणजे उडता येतं’ असं म्हणून त्याची उदाहरणं पेश केली जातात. 
लोकलमध्ये पावसाळ्यात कोरडी जागा मिळणं, कुठेही जायची घाई नसणं वगैरे. लहान गोष्टीत आनंद शोधण्याची कुवत आपल्यात असणं हाही आनंदच. संथ प्रवाहात दिवे सोडावेत तसे प्रचितीचे बोल सोडत जाण्याची ब्लॉगरची किमया तर लाजवाबच. ‘पूल’ या विषयावरची पोस्ट अशीच आत्मरंग उजळवणारी. ‘कपडय़ांचं कपाट’ या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मला काय आवडतं हे मला किंमत आणि स्टेटस किंवा फॅशनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ! मला माझा एक मित्र दहा जणांमध्ये ‘‘फॅशनची औरंगजेब’’ म्हणाला होता, तेव्हापासून बरीच मॅगङिान्स चाळली, पेपरमधल्या पुरवण्या आणि फॅशन टिप्स वाचल्या, नेटवर अनेक साइट्स धुंडाळल्या.. पण नाही काही जमत स्वत:ला बदलायला.’ या प्रांजळ कबुलीतून डोकावणारा अॅटिटय़ूड हीच ब्लॉगरची ताकद. ‘पुराने बरामदे.’, ‘नयी धूप’ आणि इतरही अशाच पोस्ट वाचनीय. ‘जा.म.दि.’ हा वेगळा प्रयोग. ‘कुठेस?’ या प्रश्नावर खरं उत्तर ‘इथेच’ द्यावं, कारण ‘उगाच माज करून आपणच आपली नदी आणि आपणच आपले किनारे होऊन वाहत रहायचं रिसिव्ह करायला येणा:या सागराच्या ओढीने!’ इतकी समज असल्याशिवाय शब्दात प्रसन्नता उतरत नाही. 
http://jaswandi.blogspot.in/
 
- प्रा. अनंत येवलेकर

Web Title: You are a flower, even steal ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.