युक्रांद आणि ‘आप’

By admin | Published: February 15, 2015 03:07 AM2015-02-15T03:07:51+5:302015-02-15T03:07:51+5:30

कार्यकत्र्यानी उद्धट होऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवालांनी केले आहे. उद्धटपणा इतकीच अतिनम्रताही घातक असते. - या अतिनम्रतेपायीच महाराष्ट्रातला ‘युक्रांद’चा प्रयोग फसला!

Yukand and 'Aap' | युक्रांद आणि ‘आप’

युक्रांद आणि ‘आप’

Next
>कार्यकत्र्यानी उद्धट होऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवालांनी केले आहे. उद्धटपणा इतकीच अतिनम्रताही घातक असते. - या अतिनम्रतेपायीच महाराष्ट्रातला ‘युक्रांद’चा प्रयोग फसला!
 
दिल्लीच्या  विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेले यश अभूतपूर्व आहे, हे नि:संशय. विचारवंत, विश्लेषक, पुढारी, दूरचित्रवाहिन्यांचे सव्र्हे अशा सर्वाना ओलांडून आपची लाट पुढे गेली.
- हे ज्यांनी साध्य केले त्या दिल्लीतल्या ‘आप’ कार्यकत्र्याचा तरुण जल्लोष पाहताना मला आठवत होते युक्रांदचे दिवस. युक्रांदचा संस्थापक व नेता या नात्याने माङो अनुभव आपच्या राजकीय प्रक्रियेशी जुळवून पाहताना- कालानुरुप काही फरक सोडल्यास- त्यात बरेच साधम्र्य असल्याचे मला जाणवते आहे. 
1967 साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांना मार्गदर्शक मानून युवक क्रांती दलाची (युक्रांद) स्थापना झाली. बिहारच्या दुष्काळात काम करताना आम्हा पंचवीशीतल्या तरुणांचा गट सामाजिक जाणिवांनी समृद्ध झाला होता. अन्य देशांत झालेल्या क्रांत्यांचा इतिहास हा आमच्या सामुदायिक चिंतनाचा विषय असे. वैचारिक बांधिलकी समाजवादाला, समतेला व लोकशाही प्रणालीला होती. त्यावेळी प्रचलित समाजवादी, साम्यवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष अस्तित्वात होते; परंतु त्यांच्या माध्यमातून भारतात समाजवाद येणार नाही, याबद्दल आमची खात्री झाली होती. म्हणून आमचा गट कोणत्याही डाव्या पक्षात गेला नाही.  आम्हाला वेगळ्या पायवाटेचा शोध घ्यायचा होता; मात्र काही कोडी उलगडत नव्हती म्हणून जयप्रकाशजी, आचार्य दादा धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, एस. एम. अण्णा, बाबा आमटे, गं. बा. सरदार, विनायकराव कुलकर्णी यांच्याकडे जाऊन आम्ही मार्गदर्शन घेऊ लागलो. सर्वात मोठा लाभ जयप्रकाशजींकडून मिळाला हे वेगळे सांगायला नको. त्यावेळी त्यांच्या नावाभोवती वलय नव्हते. त्यामुळे मुक्त चर्चा होई. 
 समाजात भेदाभेद अन् अंतर वाढले तर माणुसकीचा लोप होतो हे आमच्या लक्षात आले होते, त्यामुळे माणसा-माणसांमध्ये पडलेले अंतर नष्ट करणो असा आम्ही लावलेला क्रांतीचा अर्थ होता. अ¨हसेच्या मार्गाने व सामुदायिक पुरुषार्थानेच आपण ध्येयाकडे वाटचाल करू अशी आमची धारणा बनली. क्रांतीची सुपारी घेतलेले लोक म्हणून आपली प्रतिमा बनू नये याची काळजी घ्यावी असे वाटे. आपण केवळ क्रांतीचे वाहक आहोत, प्रस्थापित शक्तींना पराभूत करण्यासाठी आपले जीवन वापरण्याची ज्याची तयारी असते त्यालाच क्रांतीचा वाहक म्हणतात.  ज्या जातीत अपघाताने जन्म झाला तिचा अभिमान बाळगणो याला आम्ही व्यक्तिमत्त्वातील दरुगधी मानत असू. जातिविहीन व वर्गविहीन समाज निर्माण करण्याची आम्ही युक्रांदीय गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा घेत असू. प्रति™ोने सामुदायिक संकल्प बळकट होतो. 
 कालांतराने युक्रांद ही जातिमुक्त कार्यकत्र्याची प्रभावी संघटना निर्माण झाली. शोषित, वंचित समाजाची दु:खे जाहीरपणो मांडायची असे युक्रांदचे धोरण होते. इतक्या जोरदार आवाजात शोषित वर्गाची गा:हाणी मांडायची की जणू ती दु:खे आपण भोगत आहोत असे वाटले पाहिजे. सर्वत्र भ्रष्टाचार असल्याने आम्ही फक्त रस्त्याला पवित्र मानत होतो. म्हणून अन्यायाविरुध्द खच्चून, काळजापासून, बेंबीच्या देठापासून, रस्त्यावर येऊन बोंब मारा आणि तुरुंगात जायची तयारी ठेवा ही युक्रांदची त्रिसूत्री होती. सत्याग्रह करून तुरुंगात गेल्याशिवाय कच्ची गाडगी पक्की होत नाहीत, या भावनेने प्रत्येक भाषणातून आम्ही रस्त्याचे आणि तुरुंगाचे पावित्र्य पटवून देत असू. युक्रांदच्या ङोंडय़ाखाली झालेल्या अनेक सत्याग्रही जनआंदोलनात सुमारे  लाखभर तरुण तुरुंगात जाऊन आलेले आहेत. एका आंदोलनात तुरुंगात जाऊन आलेले लोक एकमेकांचे सख्खे नातेवाईक बनतात. 
क्रांतीची पालखी आयुष्यभर खांद्यावर घेण्यासाठी जीवनसाथी समविचारी असावा हे तत्त्व युक्रांदने अंगीकारले होते. युक्रांदमध्ये मोठय़ा प्रमाणावर आंतरजातीय विवाहही झाले. 
 एकेका आंदोलनानंतर अनुभव येऊ लागला की, सर्व पथ्ये पाळली तर अपयश येऊच शकत नाही. गांधीजींनी अ¨हसात्मक संघर्षाला सत्याग्रह हे नाव दिले. त्यांनी सत्याग्रहशास्त्रची मांडणी केली आहे. ती डोळ्यांसमोर ठेवून युक्रांदमध्ये प्रशिक्षण दिले जात असे. सत्याग्रहशास्त्रचे काटेकोर पालन केल्यामुळे युक्रांदचे एकही आंदोलन अयशस्वी झाले नाही. हा योगायोग नव्हता, तर ती एक शास्त्रची परिणती होती. 
गांधीजींनी लोकसंग्रहाला सर्वोच्च स्थान दिले होते.  गांधींजी म्हणत, ‘ रचनात्मक काम, विधायक काम आणि संसदीय क्षेत्रतील राजकारण, निवडणुका यात मूलत: भेद नाही.’ यासाठी फक्त एकच कसोटी आहे. तुमचा लोकसंग्रह वाढतो काय, नवीन लोकशक्ती उदयाला येते काय, एवढा एकच प्रश्न क्रांतिकारी कार्यकत्र्याने स्वत:ला विचारला पाहिजे. आमदार-मंत्री व्हावे की नाही? या प्रश्नांचा निर्णय घेताना स्वत:ला विचारले पाहिजे की, ज्या गोष्टीचा मी स्वीकार करीन त्यामुळे लौकिकात भर पडतो काय? आणि लोकसंग्रह वाढला तरच लौकिक प्राप्त होतो, हे वास्तव आहे.
जयप्रकाशजींशी एकांतात चर्चा होत. आम्ही त्यांना एकदा विचारले की, संसदीय क्षेत्र आणि सत्याग्रही जनआंदोलन यांचे नाते काय असावे? 
-या प्रश्नाला उत्तर देताना जेपी म्हणाले होते, ‘‘भारतीय लोकशाहीत सत्याग्रही जनआंदोलन व संसदीय क्षेत्र यांना समान दर्जाचे स्थान आहे. जनआंदोलनाला गुंजभर अधिक स्थान आहे. राज्य पातळीवरील जनआंदोलन असेल तर त्याचे नेतृत्व करणारा त्या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकेल अशा कुवतीचा असावा. कर्तबगार मुख्यमंत्री होण्यासाठी जे गुण लागतात, त्यापेक्षा गुंजभर अधिक गुण जनआंदोलनाच्या नेत्यांमध्ये असावे लागतात. जनमानसाच्या मंथन प्रक्रियेतून सिद्ध झालेला संघर्षाचा नेता असतो. मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली प्रशासन काम करते. जनआंदोलनाच्या नेत्याला मात्र प्रत्येक क्षणी परीक्षेला बसावे लागते. त्याचे नेतृत्व त्याच्या समकालीन मुख्यमंत्र्यापेक्षा चारित्र्यात व लोकप्रियतेत उजवे असावे लागते. राष्ट्रीय पातळीवर होणा:या जनआंदोलनाचा नेता हा देशाच्या पंतप्रधान होण्याच्या पात्रतेचा असावा.’’ 
पुढे जेपीे म्हणाले होते,  ‘जनआंदोलनाशिवाय नेतृत्व तयार होत नाही. एक दिवस असा येतो की सर्वसाधारण लोकप्रियतेचे रूपांतर सहजपणो मतदानात होते. भारतीय क्रांती बंदुकीच्या मार्गाने होऊ शकणार नाही. म्हणून जनआंदोलनातून उदयाला आलेल्या नेतृत्वाने संसदीय राजकारणात योग्यवेळी सहभागी झाले पाहिजे. अजरुनाला रणांगणात विश्वव्यापी ज्ञानाचा जसा साक्षात्कार झाला, तसेच दर्शन जनआंदोलनातील नेत्याला झालेले असते. त्यामुळे जनआंदोलनातील अजेंडा प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्याची त्याची क्षमता वाढते. संसदीय राजकारणापासून प्रारंभ करणा:याला अशा दर्शनाचा लाभ झालेला नसतो.’’ 
- हा संवाद 1974 सालापूर्वीचा आहे. मात्र, आजही त्याचे महत्त्व उणावलेले तर नाहीच, पण काल-विसंगतही झालेले नाही.
युक्रांद तसेच चालू राहिले असते तर कदाचित महाराष्ट्रात युक्रांदला कधी ना कधी सरकार स्थापन करता आले असते. हे विधान धाडसी नाही. पूर्ण विचार करून आज मी हे म्हणतो आहे. आम्ही वयाने तरुण असलो तरी आम्ही जेवढा विचार करीत होतो, तेवढा विचार त्याकाळी कोणत्याही पक्षात चालू नव्हता. युक्रांदमध्ये मोठय़ा प्रमाणावर तरुणांची भरती होती. 
1977 साली म्हणजे संघटनेच्या वयाच्या दहाव्या वर्षी संघटनेतील क ाही प्रवृत्तींनी नेतृत्वाबद्दल वाद सुरु केला. त्यातून ज्यांनी संघटनेचा ताबा घेतला, त्यांना युक्रांद पुढे नेता आले नाही. आमच्या मध्ये वैचारिक मतभेद नव्हते, तरी संघटना फुटली. त्याचे एकमेव कारण म्हणजे मत्सर ! समवयस्कांच्या गटातील निष्क्रीय लोकांमध्ये सक्रीय लोकांविषयी मत्सर असतोच. हा स्वाभाविक मानवी दुगरुण आहे. युक्रांदमधील जो मूठभर गट आमच्या विरोधात होता, त्याला बाजूला करुन मी तेव्हा पुढे जायला हवे होते. ते न करता उभी फूट टाळण्याच्या मोहातून मी बाजूला झालो. ही चूक होती असे आज मागे वळून पाहताना वाटते. ‘युक्रांदमध्ये फूट पडली’ ही बातमी मला मरणापेक्षा अधिक कटू वाटत होती. -काही गोष्टी कालांतराने उलगडतात. ज्यांनी युक्रांदचा ताबा घेतला ते नंतर विविध राजकीय पक्षांमध्ये गेले. संधिसाधू प्रवृत्तीचा त्यांनी परिचय दिला. फूट टाळण्यासाठी बाहेर पडलेला जो गट होता तो मात्र आयुष्यभर युक्रांदच्या तत्त्वज्ञानाला चिकटून आहे आणि क्रियाशील आहे. 
या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाची आजवरची प्रक्रिया व त्यांना मिळालेले अभूतपूर्व यश पाहता काही गोष्टी मनात येतात.  दिल्लीमध्ये झालेल्या जनआंदोलनाचे आम आदमी पक्षामध्ये रुपांतर झाले. त्यावेळी काही मंडळींनी राजकारण घाणोरडे असते, 
 
अराजकीय असणो हिच श्रेष्ठतम् नैतिकता आहे, अशी मांडणी केली. जे सार्वजनिक जीवनात आपण अराजकीय आहोत असा नैतिक टेंभा मिरवितात, ते ख:या अर्थाने उजवीकडे झुकलेले असतात. 
अर¨वद केजरीवालांचा गट नेटाने पक्ष चालवत राहिला. जनआंदोलनात जो अजेंडा होता, जी कार्यपध्दती त्यांनी अवलंबली होती, त्याचे पालन त्यांनी संसदीय राजकारणातही केले. 
 निवडणूक जिंकले म्हणून ‘आप’वाले नैतिकदृष्टया श्रेष्ठ आहेत असे शिक्कामोर्तब आज करता येणार नाही. तथापि शेकडो कार्यकत्र्याचे सैन्य निर्माण करण्यात आणि त्या सैन्याला तळागाळातील समाजाच्या एकरुपतेची दिशा देण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीत जनसंवाद साधण्याच्या शैलीचे युक्रांदशी खूप साधम्र्य असल्याचे जाणवते. आपचे नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षातून आलेले नाही. ते जनआंदोलनाच्या प्रक्रियेतून उजळून निघालेले स्वयंभू नेतृत्व आहे. नव्या पिढीचा हा पक्ष आहे. सारेच तरूण आहेत. परिवर्तनाला त्यांची बांधिलकी आहे. लोकांनी त्यांना स्वाभाविकपणो स्वीकारले आहे. 
समवयस्क मंडळीमधील मत्सराचा संसर्ग काही काळ त्यांनाही झाला होता. परंतु तळागाळातील लोकांशी एकरुप होण्याचा त्यांचा कार्यक्रम त्यांनी नेटाने पुढे चालविला. या परिश्रमाची ज्यांची तयारी नव्हती ते नेते चाळणीतून निघून गेले. अस्तित्वाच्या लढाईचा पहिला टप्पा  ‘आप’ने (अपयश सोसून) निभावला असला, तरी पुढची वाट अनेक अर्थानी सोपी नाही.
एवढा प्रचंड विजय  ‘भीतीदायक’ असल्याने कार्यकर्त्यांनी तो डोक्यात जाऊ देऊ नये, उध्दट होऊ नये, असे आवाहन केजरीवालांनी केले आहे. मला त्यांना सांगावेसे वाटते आहे, की उध्दटपणा इतकीच- कदाचित त्याहुनही जास्त- अतिनम्रता देखील घातक असते. - या अतिनम्रतेपायीच महाराष्ट्रातला  ‘युक्रांद’चा प्रयोग फसला. पहिल्या प्रेमातले जवळचे (मूठभर) सहकारी जेव्हा विरोधात उभे राहीले, तेव्हा उरलेल्या बहुसंख्यांना  न पटणारे त्यांचे मुद्दे कठोरपणो खोडून काढणो आणि वेळीच  त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणो गरजेचे होते. पण आपल्याच सहका:यांचा न्यायाधीश होण्याला मन धजावले नाही आणि सद्वर्तनी, विनाकारण नम्र नेतृत्वाची निष्क्रीयता ‘युक्रांद’ला नडली. जनआंदोलनातून उभे राहाणारे राजकीय अस्तित्व हा एक कठोर खेळ असतो, तो प्रसंगी निर्मम कठोरतेनेच खेळण्याची जरूरी असते.
आम्हाला उशीराने कळलेले हे शहाणपण ‘आप’ला वेळीच सुचले, तर बरे!
 
नवनिर्माणातली स्कूटर
आणि इन्स्टंट ‘उपदेश’
 
1974 साली जयप्रकाशजींनी राष्ट्रीय पातळीवर जनआंदोलन सुरू केले. त्यांच्या नवनिर्माण आंदोलनात युक्रांद सर्वशक्तिनिशी उतरले. 
बिहारमध्ये विधानसभेला वेढा घालण्याचा अखंड तीन दिवसांचा कार्यक्रम होता. जेपींनी मला एक महिना माझा दवाखाना बंद करायला लावून पाटणा येथे बोलावले. एक स्कूटर दिली होती. त्यांनी जे काम सांगितले ते गमतीशीर होते. पाटण्यातील महाविद्यालयीन तरुणांचे अड्डे हुडकून काढायचे, तिथे गप्पांचा अड्डा टाकायचा आणि हसत खेळत गप्पा मारायच्या.  नकळत सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान तरुणांमध्ये संक्रमित करायचे असा तो उपक्रम होता. त्या मागची भूमिका सांगताना जेपी म्हणाले, ‘‘माङो गांधीवादी सहकारी उपदेशाच्या कंटाळवाण्या शैलीत तरुणांशी बोलतात. तरुणांना असला उपदेश आवडत नाही, म्हणून तर तुला बोलावून घेतले. गांधीवाद्यांना तू दुप्पट आदर द्यायचास म्हणजे ते तुङयावर रागावणार नाहीत. 2क्-25 वर्षाचे तरुण समोर बसून ऐकायला तयार असतील, तरच परिवर्तनाच्या लढाईत त्यांची भरती करता येते. आपल्याकडे सत्याग्रहाचे प्रशिक्षण देण्याइतका वेळ नाही. म्हणून इन्स्टंट व उस्फूर्त पद्धतीने अ¨हसेचे महत्त्व पटवून देण्याचे काम तुङयाकडे दिले आहे. दहा-पंधरा लाख तरुण विधानसभेला वेढा देण्यासाठी पाटण्यात येतील. त्यांचे वय लक्षात घेता ¨हसाचाराच्या आकर्षणाचा धोका आहे. जनआंदोलनात ¨हसाचार घडला तर शासनाला दडपशाही करून आंदोलन चिरडून टाकण्यास निमित्त मिळते.’’
 
 
(लेखक ‘युक्रांद’चे संस्थापक आणि 
ज्येष्ठ समाजवादी नेते आहेत)

Web Title: Yukand and 'Aap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.