झिका!
By Admin | Published: February 13, 2016 05:46 PM2016-02-13T17:46:07+5:302016-02-13T17:46:07+5:30
एडिस इजिप्ती नावाचा डास. एक क्षुद्र कीटक. पण त्यानं जगभरातल्या लोकांना अक्षरश: जेरीस आणलंय. लोकांमध्ये जणू त्याची दहशतच बसलीय. मात्र यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचं राजकारण नसेलच असं नाही. अगोदर खूप भीती घालायची, नंतर त्याची ‘लस’ बाजारात आणायची, त्यातून आपलं उखळ पांढरं करायचं! - या इशा:यांकडे दुर्लक्ष करू नये हे खरंच, पण उपचारापेक्षा रोग टाळणं केव्हाही चांगलं. ते आपल्या हातात आहेच की!
काळजी हवीच, पण घंटानाद कशाला?
- शैलेश माळोदे
2016 च्या ऑलिम्पिक तयारीमध्ये मग्न असलेल्या ब्राझीलवासीयांना एका क्षुद्र किटकानं जेरीस आणलंय.
डासासारख्या क्षुद्र किटकाला मारणं, नष्ट करणं सोपं असल्याचं जाहिरातींतून दिसत असलं, तरी त्याचा फटका खूपच भेदक असू शकतो याचा अनुभव ब्राझीलमधील नवजात बालकं, त्यांच्या माता आणि ‘माता’ होऊ घातलेल्या स्त्रियांना येतोय.
जागतिक आरोग्य संघटनेनं तर जगभराकरिता धोक्याचा इशारा घंटानादाच्या स्वरूपात देऊन एक प्रकारची जागरूकता आणि त्याचबरोबर ‘पॅनिक’ निर्माण करण्याचं काम केलंय. वर्षाअखेरीस ङिाका विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 40 लाखांर्पयत पोहचेल, असं संघटनेनं म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचलिका डॉ. मार्गरेट चॅन यांनी तर स्थिती खरोखर गंभीर असल्याचे म्हटलंय.
ङिाका विषाणू, डास आणि ब्राझीलमध्ये गेल्या काही वर्षापासून विशेषत: काही महिन्यांपासून नेहमीपेक्षा मेंदूचा आकार लहान असलेली बालकं यांचा परस्पर संबंध अजून पूर्णपणो अभ्यासला आणि तपासला गेलेला नाही. त्यामुळे मायक्रोसिफलीमुळे डोक्याची वाढ कमी होण्यासाठी ङिाका विषाणूंचं वहन करणारे डास कसे जबाबदार आहेत, याचं नेमकं चित्र जगभरातील तज्ज्ञांपुढे नाही. त्यामुळे अर्थातच या विषाणूंमुळे पसरणा:या रोगांच्या लक्षणांचा इलाज करून प्रतिबंध करणारी लसही नाही. त्यामुळे खरं तर जास्त ‘पॅनिक’ बटण दाबलं जाऊन याबाबत ‘अलार्म’ जास्त प्रमाणात दिसतो. यासाठी नेमकं वास्तव जाणून घेण्याची गरज आहे. भारतातही एकानं ङिाका व्हायरसवर लस तयार केल्याची बातमी नुकतीच माध्यमांत झळकली, मात्र या दाव्याचीही पडताळणी शास्त्रीय पद्धतीनं होण्याची गरज आहे.
ब्राझीलमध्ये मायक्रोसिफलीच्या केसेसचं प्रमाण मे 2015 मध्ये ङिाका विषाणूंची केस प्रथम दृष्टोपत्तीस आल्यापासून वाढत असल्याचं लक्षात आलं. अर्थात संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास ऑक्टोबर 2015 ते जानेवारी 2016 या काळात सुमारे 4000 अर्भकं मायक्रोसिफलीग्रस्त असल्याचं दिसून आलं. यापूर्वी हे प्रमाण दरवर्षामागे 150 होतं.
‘प्रेग्नन्सी’ टाळण्याचा सल्ला!
2014 मध्ये ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा भरली तेव्हा जगभरातून लोक आले होते. त्यानंतर त्याचवर्षी रिओ-द-ज्ॉनिरो येथे कनू (उंल्ल4ी) स्पर्धा झाली. त्यात पॅसिफिक बेटांवरील विविध खेळाडू सहभागी झाले होते. ईस्टर आयलंडवरून परतणा:या एका पर्यटकास ङिाका विषाणूच्या रोगाची लागण झाल्याचं चिली या ब्राझीलच्या शेजारी राष्ट्रात उघडकीस आलं होतं. त्यामुळे पर्यटक किंवा अन्य बाह्य माध्यमातून पसरून इडिस जातीच्या डासांमार्फत तो ब्राझीलमध्ये पसरला असावा असा कयास आहे. ज्या गर्भवती मातांना या डासाने चावा घेतला त्यांच्यामार्फत तो नवजात अर्भकांर्पयत जन्मानंतर पोहचला असावा असं तज्ज्ञ मानतात. त्यावर उपाय म्हणून एल साल्वाडोरसारख्या देशातील सरकारनं आपल्या स्त्री नागरिकांना 2क्18 र्पयत ‘प्रेग्नन्सी’ (गर्भावस्था) टाळण्याचा सल्ला देण्याचा हास्यास्पद प्रकार मात्र ‘ओव्हर रिअॅक्शन’ म्हणायला हवा. स्त्रियांच्या नैसर्गिक मानवी अधिकाराचं ते उल्लंघन म्हणायला हवं.
भारतात इशारा
ङिाका विषाणू आणि डेंग्यू व चिकुन गुन्या या इतर दोन विषाणू प्रकारात बरचसं साम्य आहे. हे तिन्ही विषाणू तसेच एबोलाचादेखील उगम पश्चिम आणि मध्य आफ्रिका तसेच आग्नेय आशियासारख्या भागातून आहे. इथे डासांचा फैलाव होण्यासाठी उपयुक्त स्थिती आणि वातावरण आहे. जंगलतोड करून कृषी आणि कमी उंचीची झाडं लावून मलमपट्टी करण्याचे प्रकार या ठिकाणी होत असल्याने मलेरियावाहक डासांना चालना मिळते. शिवाय भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या पण साधनं आणि स्वच्छतेचा
अभाव असलेल्या देशांतदेखील डासांना उपयुक्त स्थिती असते. म्हणूनच ङिाका विषाणूंसंदर्भात केंद्र सरकारनं सावधानतेचा इशारा दिलाय आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे काही नमुने अभ्यासासाठी पाठवले आहेत. ङिाका विषाणू अमेरिकन भागासाठी नवा असल्यामुळे व तिथल्या मोठय़ा होस्ट पॉप्युलेशनमुळे तो दिसून आला नाही; परंतु पुढे काही दिवस आता तो ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसेल अगदी चिकुन गुन्यासारखा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विषाणूंचं बाह्य स्रोताद्वारे संक्रमण. हे नेमकं शोधणं कठीण आहे, परंतु वाढत्या हवाई प्रवासामुळे डेंग्यूसारखे विषाणू सर्वत्र पोहचू लागल्याचं विविध अभ्यासातून दिसून आलंय. त्यामुळे विमान प्रवास टाळून संक्रमण वाढलेल्या क्षेत्रला भेट न दिल्यास ङिाकापासून प्रभावीत होण्याची स्थिती उद्भवणार नाही असं वाटतं. शिवाय 2014 मध्ये एबोला विषाणूचं आक्रमण गिनी, सिमरेलिऑन, लायबेरिया, नायजेरिया यासारख्या पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात होऊन 50 ते 90 टक्के माणसं साथीत दगावली. त्यावेळी अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थनं प्रायोगिक लस तयार केली होती. त्या विषयीची सुरक्षितता मात्र नीट तपासली गेली नव्हती. शिवाय असा आजार निर्माण झाल्यावर लसीसारखी वस्तू बाजारात आणण्याची आवई उठवली जाते. मग त्याची किंमत ज्या ठिकाणी असे आजार उद्भवतात त्यांना परवडणारी नसते. फक्त बहुराष्ट्रीय औषध कंपन्या, डोनर एजन्सीज् आणि भ्रष्ट शासक यांचे खिसे तेवढे भरले जातात. खरा प्रश्न सुटत नाही. स्वच्छता, मूलभूत आरोग्य सुविधा, शिक्षण आणि महिला सबलीकरणसारख्या विकासाच्या मूलभूत बाबींची पूर्तता झाल्यास लसीची गरजच उरत नाही. शेवटी ‘उपचारापेक्षा रोग टाळणं चांगलं’ हेच खरं आहे. त्यामुळे ङिाकाबाबतही तसं काही राजकारण आंतरराष्ट्रीय औषध आणि आरोग्य क्षेत्रत शिजतंय का? याचा शोध घेतला पाहिजे.
साठवलेल्या स्थिर पाण्यात एडिस इजिप्ती डासांचं प्रजनन होऊन ते फैलावतात. एल निनोसारख्या वातावरणीय परिणामांमुळे दुष्काळ, पूर, अतिवृष्टी आणि तपमानवाढीसारखे प्रकार या डासांना पोषक ठरतात. यासाठी एल निनोचे आरोग्यविषयक प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असून, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे ङिाका विषाणूंबाबत पुढाकार घेण्यात येत आहे. म्हणून तूर्त सावधानतेची गरज धोक्याच्या घंटानादापेक्षा जास्त आहे.
1947 ते 2016
‘ङिाका’चा विषाणू सर्वप्रथम आढळला तो 1947 मध्ये युगांडातल्या जंगलात माकडांमध्ये.
माणसांमध्ये ङिाकाचे विषाणू पहिल्यांदा आढळले ते 1952 ला युगांडा आणि टांझानियात.
मायक्रोनेशियातील याप बेटांवर 2007 मध्ये ङिाका विषाणूंमुळे साथ पसरली आणि 8क् टक्के लोकांना ङिाकाची लागण झाली.
फ्रेंच बेटसमूहातील ताहिती या सर्वात मोठय़ा बेटावर 2क्13 ला, न्यू कॅलेडोनिया येथे 2क्14 ला, मेक्सिको, ब्राझील आणि इस्टर बेटांवर 2क्15 ला ङिाका विषाणू मोठय़ा प्रमाणात आढळून आले.
‘ङिाका’चं संक्रमण
ङिाका विषाणू युगांडा देशात सर्वात प्रथम ओळखण्यात आला. माकडांमध्ये त्याचा प्रादुर्भाव असल्याचं प्रथम दिसून आलं. :हुसस माकडांपासून त्याचं संक्रमण एडिस अफ्रिकानस या डासांमार्फत मनुष्यार्पयत झालं. ब्राझीलमधील ङिाका विषाणू त्यांचाच नातेवाईक असलेल्या एडिस इजिप्ती या डासांमार्फत संक्रमित झाला.
2क्क्7 साली मायक्रोनेशिया या पॅसिफिक बेट समूहात सर्वप्रथम ङिाका विषाणूजन्य साथ नोंदवली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आता ब्राझीलसह लॅटिन अमेरिका आणि लगतच्या 2क् देशांमध्ये हा रोग संक्रमित झाला आहे. तसा ङिाका विषाणूमुळे पसरणारा रोग हा जीवघेणा किंवा प्रचंड मनुष्यहानी करणारा नसल्याचं सकृतदर्शनी तरी लक्षात येतं. शिवाय बालकांमध्ये खूपच कमी प्रमाणात आढळणारी मायक्रोसिफलीेद्वारे डोकं आकारानं लहान असण्याच्या आणि मेंदूच्या काही प्रमाणातील वाईट स्थितीच्या रोगांशी त्याचा काही संबंध आहे का, हे तूर्त सांगणं कठीण आहे. त्यावर अधिक अध्ययन गरजेचं आहे.
पॅसिफिकमधील बेटांतून तो ब्राझीलमध्ये ङिाका विषाणू कसा पोहोचला याबाबत तज्ज्ञांमध्ये कोणतंही एकमत नाही. संक्रमणशील असल्यामुळे हा विषाणू माणसांमुळेच (अगदी लैंगिक संबंधामुळेच) पसरला असावा असा एक सिद्धांत सर्वमान्य होताना दिसतो. पण नेमकी स्थिती अस्पष्ट आहे.
याप बेटांवर ङिाकाची साथ म्हणून प्रत्यय आला. मात्र 8क् टक्के लोकांना आपल्याला त्याची लागण झाल्याचं लक्षातच आलं नव्हतं. त्यांच्यात कोणतीही ‘वेगळी’ लक्षणं दिसून आली नाहीत. जे काही थोडेफार लोक आजारी झाले त्यांना ताप, त्वचेवर पुरळ येणं, सांधेदुखी, डोळे लाल होणं, मळमळणं, डोकेदुखी आणि स्नायू दुखणो असे प्रकार साधारण एक आठवडा सहन करावे लागले. पण एकही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे ही ‘एबोला’सारखी साथ आहे असं मानणं योग्य नाही. अर्थात पॉलिनेशियन बेटांच्या साथीनंतर लक्षात आलं की, ङिाकाचा संबंध ‘गुलिएन-बारे सिंड्रोम’
(¬4’’्रं्रल्ल-इं11ी र8ल्ल1िेी) या चेतापेशींना शक्तिहीन करणा:या स्थितीसारख्या जीवघेण्या रोगाशी आहे. मात्र याबाबत संशोधन होणं गरजेचं आहे. त्याचा मेंदूवर नेमका काय दुष्परिणाम होतो हे अज्ञात असलं तरी 197क् च्या संशोधनातून असं दिसून आलं की, हा विषाणू लहान तरुण मूषकांमध्ये वाढीस लागून चेतापेशीय नुकसान घडवतो. सध्याच्या जेनेटिक विश्लेषणातून असं दिसतं की ङिाका विषाणूंच्या काही प्रकारांमध्ये म्यूटेशन (फेरफार) घडून त्याचा प्रसार आणि डासांमध्ये संक्रमणाचा प्रकार नवीन स्वरूपात होत असावा. मात्र मायक्रोसिफालीसशी त्याचा संबंध इतका जोडता येणार नाही, असं मत अॅमी वाय. व्हिटोर या प्रख्यात संशोधिकेनंही व्यक्त केलंय.
प्रसार कसा होतो?
वाढतं नागरीकरण, दारिद्रय़ यामुळे डेंग्यूसारखे आजार पसरण्याबरोबरच डासांना प्रजननास अनुकूल स्थिती उत्पन्न होते. शिवाय हवामान बदलामुळे, वाढलेल्या तपमानामुळे आणि पर्यायानं वाढलेल्या दमटपणामुळे डासांना मोकाट रान उपलब्ध होतं. ते नवे प्रदेश ‘पादाक्रांत’ करतात. शिवाय इडिस इजिप्ती आणि इडिस अॅल्बोपिक्टस या डासांनी गेल्या काही दशकात आपल्या अखत्यारीतील भूभाग वाढवलाय. नागरीकरण, बदलतं हवामान, वाढता हवाई प्रवास आणि एकूणच वाढतं परिवहन याबरोबरच विविध राजकीय आणि आर्थिक कारणांवर अवलंबून असलेले प्रतिबंधक उपाय यामुळे नवी क्षेत्रं आणि पूर्वीची डास निमरूलित क्षेत्रं पुन्हा त्यांच्या तावडीत सापडताना दिसतात. 195क् आणि 6क् च्या दशकात पित्तज्वराविरुद्ध पॅन अमेरिकन इडिस इजिप्तीविरुद्ध राबवलेल्या यशस्वी मोहिमेनंतर डास नियंत्रण कार्यक्रम मागे पडला आणि 198क् पासून पुन्हा डासांनी ‘कमबॅक’ केलं.
(लेखक विज्ञान पत्रकार
आणि लेखक आहेत.)