पोलिसांच्या ‘फटकेबाजी’वरून फिरणारे पाच भन्नाट मेसेज; पोट धरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:51 AM2020-03-27T09:51:37+5:302020-03-27T10:04:49+5:30
निगेटिव्ह बातम्यांच्या काळात एकच गोष्ट लढण्याचं बळ देऊ शकते आणि ती म्हणजे हसणं. त्यासाठीच थोडीशी गंमत...
पोलीस दंडुके मारतानाचे विडीयो कृपा करून पोस्ट करू नका!
बायको मुद्दाम सामान आणायला बाहेर पाठवते!
**********
पोलिसांनी फटके दिल्याची पावती पण दिली पाहिजे
नाहीतर पुढच्या चौकात
.
.
.
परत एकदा 'दे दना दन'
**********
मला सुद्धा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अशीच देशसेवा करावीशी वाटतीये.
"फक्त माझ्या डोक्यात असलेली ती चार-पाच लोकं घराबाहेर पडली पाहिजेत."
**********
महाराष्ट्र पोलिसांना माझी विनंती की,
माझे मित्र दिसले की 4 दांडके जास्त मारा...
.
.
.
.
मला त्यांची काळजी आहे होsss
**********
पोलिसांना एक खास विनंती!
बाहेर निघालेल्या लोकांना दांडे मारण्यापेक्षा
.
जुलाबच्या 3 गोळ्या तिथेच पाजा
.
मग बघा,
.
.
घरी पण राहतील आणि हात पण धुतील!