हसायलाच पाहिजे मंडळी; घरात बसलेल्या प्रत्येकाला रिफ्रेश करतील ‘हे’ सात जोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:47 PM2020-03-28T13:47:17+5:302020-03-28T13:49:04+5:30
कोरोनाबद्दल प्रत्येकाने गंभीर असणं गरजेचं आहेच, पण हास्याचा डोसही तितकाच आवश्यक आहे.
5 च्या स्पीड वरचा फॅन बंद केल्यानंतर 1 मिनिट 6 सेकंदानी पूर्ण फिरायचा थांबतो...
.
.
.
घरात बसण्याचा चौथा दिवस
.
अभ्यास चालू
.
मारी बिस्कीट मध्ये 22 छिद्र असतात....
.
.
1 kg गव्हामध्ये 8790 दाणे असतात
.
.
उद्या तांदळाचे सांगतो...!
**********
आता कसं वाटतंय??
रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखे वाटतंय.
.
.
.
.
फक्त टॉयलेटला जायचे आणि परत आपल्या जागेवर येऊन बसायचे!
**********
पूर्वी रामायण लागलं की रस्ते ओस पडायचे...
.
.
.
.
आता रस्ते ओस आहेत म्हणून रामायण लागणार आहे..
रिश्ता वही सोच नयीं।
**********
लॉकडाउन स्थितीमध्ये घरात आनंदी वातावरण कायम ठेवण्याकरीता अमृतवचन -
1. तू आज खूप छान दिसते आहेस - 10 वेळा
2. कित्ती काम पडतं ना तुला - 6 वेळा
3. खूप बारीक वाटू लागलीएस - 20 वेळा
4. खूप थकतेस ना? - 10 वेळा
5. स्वत:ची काळजी घे - 15 वेळा
6. तुझ्या घरचे किती चांगले आहेत - कमीत कमी 100 वेळा
ह्या अमृतवचनांचं पठन करा व बघा घरात किती सुख शांती नांदते व कुठलंही काम करावं लागणार नाही...
मस्त खा आणि स्वस्थ राहा....
**********
ज्या प्रकारे लोकं घरी बसून नुसते खात आहेत, ते पाहता....
.
.
21 दिवसांनी मोदी जी म्हणतील
.
.
.
"मेरे प्यारे हाथींयो"
**********
कोरोना
.
.
.
.
.
.
.
घराला घरपण देणारा व्हायरस!!!
**********
हे कोरोनाचे टेंशन एकदाचं संपलं ना की
.
.
.
७ दिवस सुट्टी घेऊन निवांत झोप काढणार आहे मी!