Marathi Jokes: संशयी बायकोचे सतत फोन; नवऱ्यानं शोधला भन्नाट उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 04:17 PM2020-11-01T16:17:39+5:302020-11-01T16:19:20+5:30
Marathi Jokes: बायकोच्या सततच्या फोनवर नवऱ्यानं शोधून काढला जालीम उपाय
नवऱ्यावर सतत संशय घेणारी बायको माहेरी गेली. तिथूनही ती वारंवार नवऱ्याला फोन करायची..
पहिला दिवस-
बायको- कुठे आहात.. ?
नवरा- घरीच..
बायको- अच्छा.. मग मिक्सर सुरू करून मला आवाज ऐकवा..
नवरा- बरं.. लगेच करतो... घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...
बायको- ओके.. बाय..
दुसरा दिवस-
बायको- कुठे आहात..?
नवरा- घरीच..
बायको- अच्छा.. मग मिक्सर सुरू करून आवाज ऐकवा..
नवरा- बरं.. घे ऐक आवाज... घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र...
बायको- ओके.. बाय..
पुढचे काही दिवस हाच प्रकार सुरू होता.. त्यानंतर नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी बायको घरी आली.. मुलगा एकटाच घरी होता...
बायको- काय रे बाबा कुठे आहेत..?
मुलगा- काय माहीत.. गेला आठवडाभर मिक्सर घेऊन फिरताहेत..