मराठी जोक : अन् गण्या गाढवाला घेऊन शाळेत गेला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:33 PM2023-11-15T15:33:15+5:302023-11-15T15:33:27+5:30
हसा पोट धरुन...
गण्या गाढवाला घेऊन शाळेत गेला.
शिक्षिका- या गाढवाला इथे का आणलंय..?
गण्या- तुम्हीच काल म्हणत होता ना मी मोठ्या मोठ्या गाढवांना माणसात आणलंय.. त्यांना शिकवलंय..
शिक्षिका- मग...?
गण्या- म्हणूनच याला शाळेत घेऊन आलो.. तुमच्यामुळे याच्याही आयुष्याचं भलं व्हावं हा विचार करून याला आणलंय..