मराठी जोक : मुलगा म्हणाला कारनं कॉलेजला जायचंय, वडिलांनी दिला भन्नाट रिप्लाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:27 PM2024-02-05T16:27:45+5:302024-02-05T16:27:55+5:30
हसा पोट धरुन...
गणू: पप्पा जरा कारची चावी द्या ना... कॉलेज ला जायचंय..
पप्पा: कॉलेजला जायला कारची काय गरज?
गणू: काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..
पप्पा: हे घे २० रुपये, ५० लाखाच्या बसमधून जा,
म्हणजे वादळ येईल वादळ.