Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये हैराण झालेल्या एका नवऱ्याचा भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 09:20 AM2020-08-04T09:20:41+5:302020-08-04T09:41:33+5:30

Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये एक त्रस्त पण व्यस्त असलेला नवरा अन् बरंच काही...

Marathi Joke husband and wife corona lockdown jokes | Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये हैराण झालेल्या एका नवऱ्याचा भन्नाट किस्सा

Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये हैराण झालेल्या एका नवऱ्याचा भन्नाट किस्सा

googlenewsNext

किचनची जबाबदारी स्विकारल्यावर पहिल्याच दिवशी मोठ्या हौशीने "इडली सांबारचा' बेत आखला.

पण इडलीच्या मानाने सांबार जास्त प्रमाणात बनवले गेले. ते फुकट जाऊ नये म्हणून रात्री 'मेदूवड्याचा' घाट घातला.

त्यामुळे सांबार तर संपले, पण मेदूवड्याचे पीठ खूपच शिल्लक राहिले होते. मग पुढच्या जेवणाला त्याचे 'दहीवडे' करायचे ठरविले.

पुढच्या जेवणात वडे संपून गेले पण दही शिल्लक राहिले.
 
म्हणून रात्रीसाठी 'दही बटाटा पुरीचा' बेत आखला.

ह्या मेनूतल्या पु-या संपल्या, पण उकडलेले बटाटे खूपच जास्त होते आणि दहीही शिल्लक होते. त्याचा उपयोग व्हावा म्हणून पुढच्या जेवणात 'अलूपरोठा दही' असा बेत नक्की केला.

इथेही आलू परोठे संपले, पण पुन्हा दही शिल्लकच राहिले. ते संपवण्यासाठी 'दहीबुंदीशेव' करायची ठरवली.

त्या कार्यक्रमात एकदाचे ते दही संपले आणि शेव पण संपली, पण शिल्लक असलेल्या बुंदीचे काय करायचे असा प्रश्न पडला.

म्हणून पुढच्या जेवणाला 'टोमॅटो बुंदी कुरमुरा' करा अशी फर्माईश आली.

घरातल्या मंडळींना हे एकेक पदार्थ कुठून ऐकायला मिळतात काही कळत नाही.

ते केल्यानंतर टोमॅटो शिल्लक राहिले!

टोमेटो शिल्लक राहिल्यामुळे त्याचे सूप बनवून पुढच्या जेवणाला  'पुलाव सूप' हा प्रकार बनवण्याची ऑर्डर आली.

सूप सर्वांनी घटाघटा संपवलं, पण पुलाव काही संपवू शकले नाहीत.  म्हणून रात्री पुलावामध्ये घालण्यासाठी ग्रेव्ही बनवली आणि पुलावाची 'बिर्याणी' केली.

इथे ग्रेव्ही जरा जास्तच बनली. मग त्यापासून 'मिक्स वेजिटेबल' आणि सोबतीला पोळ्या असा बेत ठरवला.

पण त्यातल्या पोळ्या भरपूर शिल्लक राहिल्यामुळे दुस-या दिवशी त्या संपवण्यासाठी 'दाल फ्राय'चा बेत ठरवावा लागला.

आता इथे डाळीचे प्रमाण जास्तच झाले.

शिजलेली डाळ उरली तर त्याचे सांबार छान करता येते, असे ऐकवण्यात आल्यामुळे रात्रीच्या जेवणाला त्या सांबाराबरोबर इडल्या बनवून 'इडली सांबार' करण्याची कल्पना पुढे आली.
☝🏼☝🏼☝🏼☝🏼
पण ते न करता मी ते सांबार नुसतं पिऊन टाकलं. कारण ज्या मार्गावरून मी आलो होतो तो मार्ग 'इडली सांबार' पासूनच सुरू झाला होता.
तो मार्ग  रिपीट करायची माझी तयारी नव्हती.

-एक त्रस्त पण व्यस्त असलेला नवरा -

मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद
😛🤪😝

Web Title: Marathi Joke husband and wife corona lockdown jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.