मराठी जोक : नवऱ्याच्या मोबाइलवर पप्पू प्लंबरचा मेसेज आला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:06 PM2023-11-03T16:06:25+5:302023-11-03T16:06:42+5:30
हसा पोट धरुन...
नवऱ्याचा फोन नेहमी लॉक असायचा.. पासवर्ड पण काहीतरी अवघड ठेवला होता..
एक दिवशी फोन लॉक न करता नवरा वॉशरूमला गेला.. बायकोनं संधी साधली..
तिनं नवऱ्याचे मेसेज तपासायला सुरुवात केली...
थोड्या वेळानं नवरा तिथे आला.. बायको रागानं लालबुंद झाली होती..
नवरा- काय झालं..? सगळं ठीक ना..?
बायको (संतापून)- हा पप्पू प्लंबर तुम्हाला का विचारतोय, जानू जेवलास का म्हणून..?