Marathi Joke : ... आणि रिक्षावाल्यानं विचारलं कोणत्या क्लासनं जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:35 PM2024-08-05T16:35:39+5:302024-08-05T16:36:09+5:30
हसा पोट धरुन...
रिक्षावाला – बोला साहेब, कुठे जाणार?
चंगू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
चंगू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षात क्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
चंगू– आणि थर्ड क्लास म्हणजे ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!