मराठी जोक : बायकोनं नवऱ्याला केली सूचना, पण झालं भलतंच काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:22 PM2024-01-31T16:22:15+5:302024-01-31T16:22:28+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- बाजारातून येताना दूधाची एक पिशवी आणा..
आणि हो, जर अंडी दिसली, तर सहा आणा..
पती बाजारातून दूधाच्या सहा पिशव्या घेऊन आला.
पत्नी- दूधाच्या सहा पिशव्या का आणल्या?
पती- कारण बाजारात मला अंडी दिसली..
आता सांगा, पतीचं काय चुकलं?