मराठी जोक : स्टेशन जवळ असूनही २० रुपये कसले?; तरुणीला रिक्षावाल्याचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:36 PM2024-01-29T16:36:23+5:302024-01-29T16:37:36+5:30
हसा पोट धरुन..
तरुणी- स्टेशनपर्यंत जायचे किती रुपये होतील?
रिक्षावाला- वीस रुपये होतील मॅडम..
तरुणी (थोडीशी हैराण होऊन)- स्टेशनचे २० रुपये..?
रिक्षावाला- हो मॅडम, स्टेशन दोन किलोमीटर दूर आहे इथून..
तरुणी (हातानं इशारा करत)- इकडेच तर आहे.. कुठे दूर आहे..?
रिक्षावाला- मॅडम, हात मागे घ्या.. नाही तर चुकून एखाद्या रेल्वेला लागायचा..