मराठी जोक : बायकोनं विचारलं खिचडी करू, पुलाव की बीर्याणी; नवऱ्यानं दिला भन्नाट रिप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:13 PM2024-02-12T16:13:48+5:302024-02-12T16:14:00+5:30
हसा पोट धरुन...
एक नवरा बायकोच्या स्वयंपाकाला वैतागला होता..
ती करायला जायची एक आणि व्हायचं भलतंच...
तरी पण बायकोचा आत्मविश्वास तगडा होता.. अशाच आत्मविश्वासानं ती स्वयंपाकघरातून बाहेर आली..
बायको- ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- आज जेवायला काय करू..? खिचडी, पुलाव की बिर्याणी..?
नवरा- तू आधी कर.. नामकरण सोहळा आपण नंतर करू..