Marathi Jokes: आयुष्यातल्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल?; गण्याचं शिक्षकांना भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:03 IST2024-10-30T16:03:20+5:302024-10-30T16:03:20+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Jokes: आयुष्यातल्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल?; गण्याचं शिक्षकांना भन्नाट उत्तर
वर्गात मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं..
आयुष्यात संकटं येतील.. अडथळे येतील.. त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?
पती, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रेयसी की मित्र..?
सगळा वर्ग शांत.. फक्त गण्यानं हात वर केला..
मास्तरांनी उत्तर विचारलं..
गण्या म्हणाला.. चप्पल...
मग मास्तरांनी त्याच चपलेनं गण्याला बदडलं..