राजकारणातील अ ब क ड इ; मतदारांच्या 'दिमाग का दही'!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:14 PM2019-10-05T12:14:05+5:302019-10-05T12:15:02+5:30
तर झालंय असं की....
Next
तर झालंय असं की....
आमच्या मतदारसंघात 'अ' पक्षाचा माणूस गेल्यावेळी निवडून आला.
तो नुकताच 'ब' पक्षात गेला.
'ब' च्या नेत्याकडे पाहून मी 'अ' मधून 'ब' मध्ये गेलेल्या माणसाला मत देणार होतो.
पण 'ब' चा माझा आवडता नेता 'क' पक्षात गेला.
'ड' पक्षातील मला आवडणारा नेता 'अ' पक्षात आला.
पण 'अ' ने जो उमेदवार दिला आहे तो मुळात 'इ' पक्षातील आहे. 'इ' पक्ष मला मुळीच आवडत नाही. 'इ' पक्षातील एक माणूस भला आहे.
तो आता 'अ' मध्ये आलाय, पण त्याला 'अ' ने एबी फॉर्म दिलेला नाही. त्यातच 'अ' मधील एक बरा माणूस बंडखोरी करतोय. त्या बंडखोराला 'ब' मधील आणि 'ड' मधील काही बंडखोरांचा पाठिंबा आहे...
काय करावं बरं...
🤔🤔🤔