Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:34 PM2020-02-13T18:34:10+5:302020-02-13T18:43:36+5:30

प्रत्येक राशीच्या व्यक्तींचे काही स्वभावविशेष असतात. त्यावरून थोडीशी गंमत...

Valentine's Day special joke: How women of different rashi react to their husband | Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद'

Valentine's Day, नवऱ्याने आणलेला गुलाब अन् १२ राशीच्या बायकांचा 'प्रेमळ' सं'वाद'

Next

मेषः
हे काय,भाजी आणि फुलपुडी आणायला सांगितलं तर फक्त गुलाबाचा गुच्छ घेऊन आलात. आता काय गुलाबाची भाजी आणि गुलाबाची आमटी करू का?
बिचारा कर्केचा नवरा : अगं पण....अगं पण करत राहतो.😆😆🤣

वृषभः
अय्या, कित्ती क्यूट गुलाब आहेत!! माझ्यासाठी आणलेत?
वृश्चिकेचा नवरा : नाही, भांडीवाल्या शेवंताबाईसाठी आणलेत....त्यांना गुलकंद करायचाय ना?😂😂😁😆

मिथुनः 
गुलाब मस्त आहेत; पण काय हो, या दिवशी गुलाबच का देतात, चाफा का नाही?"
मेषेचा नवरा : त्याचं काय आहे, की ज्याने ही प्रथा सुरू केली,तो तुझ्याइतका हुशार नव्हता ना, म्हणून...."😂😂😁

कर्कः
अरे वा, छान ताजी फुलं आहेत पण यात थोडी झेंडुची फुलं आणि बेल तुळस वगैरे असतं तर देवाला वाहायला झाली असती.
वृषभेचा नवरा तिला कोपरापासून नमस्कार करून निघून जातो.😆😆😂

सिंहः
(दरडावणीच्या सुरात) वाट पाहून पाहून मीच हे गुलाब आणलेत आज व्हॅलेंटाईन डे साठी. परत म्हणू नका, माझं प्रेम नाही तुमच्यावर...
कर्केचा नवरा आँ वासून बघत राहतो.🤓😁🤣🤣

कन्याः
गुलाब मस्त आहेत पण गुच्छातली कडेची फुलं शिळी दिसतायत आणि सिग्नलला गुलाब विकणाऱ्यांकडून तर घेतले नाहीत ना? ते लोक म्हणे स्मशानभूमीतली थडग्यावरची फुलं आणून विकतात...." 😆🤣😂😂  

तूळः
बरं झालं बाई , गुलाबाचा मोठा गुच्छ आणलात. आता मला गुलकंद करून बघता येईल.🤣🤣😁😁

वृश्चिकः
लक्षात आहे म्हणायचा आजचा दिवस. प्रेमाने फुले आणलीत ती. काल रात्री तर म्हणत होतात की तुझ्यासारख्या कजाग बायकोबरोबर संसार करणं म्हणजे मूर्खपणा आहे.🤣🤣😁

धनुः
या एका दिवशी गुलाब द्यायचे आणि वर्षभर बायकोच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या....काय अर्थ आहे ? 😁😂😂

मकरः
या एका दिवशी होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाने माझं नशीब बदलणार आहे का? आता आणलीच आहेत फुलं तर राहु द्या."😆😆😆

कुंभः
(गंभीर चेहऱ्याने ) प्रेम ही सुंदर भावना मनात असावी लागते, अशी फुले-बिले देणं म्हणजे प्रेम नाही." 🤓🤓😂

मीनः 
अरे, तू खरंच गुलाब आणलेस की. मला वाटलं, झेंडूची फुलं आणशील. ख्याख्याख्याख्या....गंमत केली ,चिडू नकोस."🤣🤣

"पुढच्या वर्षी निवडुंगाचीच फुलं देतो," असं म्हणून वृश्चिकेचा नवरा रागारागाने निघून जातो.

(निखळ मनोरंजन करणं हाच या जोकमागचा उद्देश आहे. गंमत म्हणूनच त्याकडे पाहावं.)

सौजन्यः सोशल मीडिया

Web Title: Valentine's Day special joke: How women of different rashi react to their husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.