४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 06:19 PM2024-03-14T18:19:38+5:302024-03-14T18:24:48+5:30

सभेदरम्यान राहुल गांधींचा तिरंगी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यावेळी, अनेकांनी राहुल गांधींना विविध भेटवस्तू देत सन्मान केला

40 paise wale wrongly shared the video of rahul gandhi; Full video share from Nana Patole | ४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर

४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर

मुंबई - भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून विदर्भातील आपली यात्रा आटपून ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लवकरच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेत राहुल गांधींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे व शिवसेनेचे बडे नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी एका विदर्भातील सभेदरम्यान राहुल गांधींचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. त्यावेळी, राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती नाकारल्याचा प्रचार भाजपा समर्थकांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. आता, त्यास अप्रचार म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. 

धुळ्यातील सभेदरम्यान राहुल गांधींचा तिरंगी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यावेळी, अनेकांनी राहुल गांधींना विविध भेटवस्तू देत सन्मान केला. दरम्यान, एका व्यक्तीने त्यांन विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला असता, तेथील काहींनी संबंधित व्यक्तीस हटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, भाजपा समर्थकांनी अर्धवट व्हिडिओ शेअर करत राहुल गांधीबद्दल अपप्रचार केल्याचं नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. पटोले यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत, भाजपाच्या ४० पैसेवाल्या आयटीसेलवाल्यांकडून हा अपप्रचार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.   

धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ||
हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला 
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी 
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला 

आम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी... ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून-मोडून सादर करायचा, यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं ४० पैसे आयटी सेल धन्यता मानतं. राहुलजी यांनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मानसन्मान त्यांना मिळाला, तो सर्व स्वीकारला, असे म्हणत नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.  


तसेच, राहुल गांधींचा हा व्हिडिओ @BJP4Maharashtra च्या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देव बाटवला आहे. देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही. पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं, समाजात फुट पाडणं, हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपला, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.

दरम्यान, भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुनही राहुल गांधींचा तो व्हिडिओ शेअर करण्यात आला. 
विठु माऊलीचा करुनिया अपमान
थाटतोय हा मोहब्बतचं दुकान... अशी टीका करण्यात आली होती. त्यास काँग्रेसने उत्तर दिलं आहे.

Web Title: 40 paise wale wrongly shared the video of rahul gandhi; Full video share from Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.