अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:15 PM2024-02-15T16:15:28+5:302024-02-15T16:17:58+5:30

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली.

Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात येते. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या भाषणाला प्रत्युत्तर देताना बोचरी टीका केली. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या मेळाव्यात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनीही काका, का? या प्रश्नाला उत्तर देत, अजित पवारांना प्रतिप्रश्न केला. 

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना काका, का म्हणत दिलेल्या जॉर्ज फर्नांडीस यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला होता. त्यावर, अजित पवार आणि इतिहासाचा संबंधच नाही, अजित पवारांना इतिहासाची माहिती नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. त्यानंतर, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांच्या काका, का या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना भलीमोठी कविताच म्हणून दाखवली. काटेवाडी पासून ते कारगिलपर्यंत महाराष्ट्रासमोर दिल्लीला झुकवायला काकाच, हवा असतो, असे म्हटले. 

कुणीतरी म्हणालं काका का?
जनता म्हणाली अजूनही काकाच का?
पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं
तरी अजूनही काका, का काका?
बोलवताना धनी पुरेपूर जाणतो काका का, 
पण महाराष्ट्राल पक्क ठाऊक आहे, काकाच का?

कारण, काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो
५० वर्षे महाराष्ट्राच्या मातीतून, महाराष्ट्राच्या माणसांतून वाहणारा 
काका एक विचार असतो
सर्वसामान्य शेतकरी, महिला प्रत्येक वर्गाला 
मुजोर व्यवस्थेला का? हा प्रश्न विचारण्याची ताकद देतो

काटेवाडीच्या का पासून ते कारगिलच्या का पर्यंत
काळ्या मातीच्या का पासून ते कणखर कातळाच्या का पर्यंत
महाराष्ट्राची, दिल्लीतली ओळख काका, काकाच असतो

कांदा, कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत
प्रत्येक शेतकऱ्याचा आधारा काका असतो
शेताच्या बांधावर काका असतो, विचारवंतांच्या बैठकीत काका असतो
उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो, म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो

म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्रसमोर झुकवण्यासाठी काका हवा असतो
महाराष्ट्राला स्वाभीमानाने लढण्यासाठी काकाच हवा असतो
म्हणूनच, काका का आणि काकाच का हे स्वाभीमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो

दरम्यान, अशी कविताच खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात म्हणून दाखवली. कोल्हे यांनी एकप्रकारे या कवितेच्या माध्यमातून अजित पवारांना काका का याचे उत्तर दे काकाच का, हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 
 

Web Title: Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.