‘’चीनचं राहू द्या, आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा’’ भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 04:17 PM2020-10-07T16:17:49+5:302020-10-07T16:24:02+5:30
Nilesh Rane News : चीनचं राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला निलेश राणेंनी राहुल गांधींना दिला आहे.
मुंबई - आमचं सरकार असतं तर लडाखमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला पंधरा मिनिटांत बाहेर फेकलं असतं, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते. या विधानावरून भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. चीनचं राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला निलेश राणेंनी राहुल गांधींना दिला आहे.
राहुल गांधींनी केलेल्या विधानावर ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात की आमची सत्ता असती तर १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते. चीनचं राहू द्या, तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा.
राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
दरम्यान, १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला. राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण "आमची चर्चा सुरू आहे", असं उत्तर एके अँटनींनी हसत दिलं, पण चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??
राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, "आमच्या चर्चा सुरू आहे". चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?? https://t.co/e3MXz2pZZp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
काल शेती बचाव यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी ट्रॅक्टरने हरयाणाच्या सीमेवर पोहोचले. त्यानंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. देशातील विविध मुद्द्यांवर बोलताना, लडाख सीमारेषेवरील चीनच्या घुसखोरीवरुनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते. मोदी सरकार हे शेतकरी, कामगार व गरिबविरोधी सरकार असून अदानी आणि अंबानींचं हित जोपसणारे असल्याची टीका राहुल गांधींनी केली. हाथरस बलात्कार प्रकरण, कृषी कायदे, लॉकडाऊनमधील समस्या, कोरोनातील अपयश यांसह लडाख सीमारेषेवरील भारत-चीन वादावरही राहुल यांनी भाष्य केले. यावेळी, बोलताना चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केला असून, मोदी सरकार गप्प असल्याचे ते म्हणाले. तसेच, देशात आज यूपीएचं सरकार असतं, तर आम्ही चीनला बाहेर फेकून दिलं असतं, त्यासाठी 15 मिनिटांचाही वेळ आम्हाला लागला नसता, असेही राहुल यांनी म्हणाले होते.