मुलानेच केली आईची हत्या

By admin | Published: May 28, 2017 12:17 AM2017-05-28T00:17:22+5:302017-05-28T00:18:16+5:30

सुरगाणा : आई करणी करते या संशयातून संतापालेल्या मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास आईची हत्या केली. सदर घटना साबरदरा येथे घडली.

The boy had murdered his mother | मुलानेच केली आईची हत्या

मुलानेच केली आईची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : आई करणी करते या संशयातून संतापालेल्या मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास आईची हत्या केली. सदर घटना साबरदरा येथे घडली.याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार विठ्ठल महाले यांचा मोठा मुलगा नंदू व त्याची पत्नी त्यांच्या घरासमोरील घरात वेगळे राहतात तर विठ्ठल महाले पत्नी सोमीबाई तसेच दोन नंबरचा मुलगा प्रकाश व त्याची पत्नी असे एकत्र रहातत. मोठा मुलगा नंदू कायम आजारी रहात असल्याने त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. नंदूला बाहेरची बाधा झाली असेल यासाठी पत्नी व प्रकाश भगताकडेही गेले होते. ते सायंकाळी परत आले. त्यारात्री विठ्ठल महाले नंदूकडेच झोपले.  पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रकाश याने विठ्ठल महाले यांना उठविले व घरी जाण्यास सांगितले. घरी गेले असता पत्नी सोमीबाई हिची हत्या झाल्याचे आढळून आले. यावेळी प्रकाशने आई तुमच्यावर जादूटोणा करते म्हणून तिला मारून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकाश यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मुलाविरुद्धच तक्रार
हत्या झालेल्या महिलेचे नाव सोमीबाई विठ्ठल महाले असे असून, याप्रकरणी मयत सोमीबाईचे पती विठ्ठल गोविंदा महाले यांनी पोलिसांकडे दोन नंबरचा मुलगा प्रकाश याचे विरोधात पत्नीची हत्या केल्याची फिर्याद दिली आहे.

Web Title: The boy had murdered his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.