“राहुल गांधीवरील कारवाई ही भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:56 PM2022-06-15T17:56:00+5:302022-06-15T17:57:00+5:30

राहुल गांधी जीवाची पर्वा न करता जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडी कारवाई सुरु असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

congress nana patole and other leaders criticized bjp and pm modi govt over ed action on rahul gandhi | “राहुल गांधीवरील कारवाई ही भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक”; काँग्रेसचा घणाघात

“राहुल गांधीवरील कारवाई ही भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक”; काँग्रेसचा घणाघात

Next

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे पंरतु काँग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

राहुल गांधी जीवाची पर्वा न करता जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारतायत 

राहुल गांधी आपल्या जीवाची पर्वा न करता केंद्रातील सरकारविरोधात जनतेचे प्रश्न घेऊन सातत्याने जाब विचारत आहेत. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार व भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी ही कारवाई करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस गुरुवार, १६ जून रोजी राजभवनसमोर आंदोलन करणार आहे. तर १७ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून भाजपा सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध करेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या

राजभवनवर केल्या जाणाऱ्या आंदोलनातून लोकांची जनभावना राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळावी यासाठी केले जात आहे. देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते व पत्रकारांना मारहाण केली, कलम १४४ लावले आहे. कोणत्याही कार्यालयात कलम १४४ कसे काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. 

केंद्रातील मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले

केंद्रातील मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्था, कोरोना, बेरोजगारी, केंद्राच्या लोकविरोधी धोरणांवर सातत्याने टीका करून प्रश्न विचारले, त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांना देता आले नाही त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि देशातील जनता राहुल गांधीजींच्या सोबत आहे. आम्ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि भाजपच्या हुकुमशाहीला नमवू, असा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: congress nana patole and other leaders criticized bjp and pm modi govt over ed action on rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.