“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:35 PM2023-07-07T16:35:55+5:302023-07-07T16:36:46+5:30

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? अशी विचारणा करण्यात आली आहे.

congress nana patole reaction over rahul gandhi petition reject by gujarat high court regarding modi name defamation case | “राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

“राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सुप्रीम कोर्टात जाऊ”; काँग्रेसची घणाघाती टीका

googlenewsNext

Congress Nana Patole: राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले व हुकुमशाही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजप व मोदी सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आलेली असून त्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांची याचिका गुजरात हाय कोर्टाने फेटाळली आहे परंतु याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. ही लढाई मोठी आहे आणि देशातील हुकुमशाही विरोधात काँग्रेस लढत आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्ट निरव मोदी, ललित मोदी यांच्याविरोधात टीका केली होती. भ्रष्ट लोकांवर टीका केली तर ती एखाद्या जातीविरोधात कशी होऊ शकते, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली. 

त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत?

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, हे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोण लागतात, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? मोदी सरकार घाबरलेले असून सत्तेपासून दूर जात असल्याच्या भितीपोटी कारवाई केली आहे. भाजपाची ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी तसेच लोकशाहीला कलंक लावणारी आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

 

Web Title: congress nana patole reaction over rahul gandhi petition reject by gujarat high court regarding modi name defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.