सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:51 AM2019-08-01T06:51:47+5:302019-08-01T06:53:59+5:30

६५% कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी दबाव; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६४% कार्यकर्त्यांना वाटते आघाडी हवी

Congress should contest the Assembly elections independently | सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

Next

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने सर्वच पक्षांनी त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती यांच्यातच लढत होणार, असे चित्र दिसत असले तरी काँग्रेसच्या ६५ टक्के कार्यकर्त्यांना ही निवडणूक पक्षाने स्वबळावरच लढावी, असे वाटत असल्याचे चित्र ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. याउलट राष्ट्रवादीच्या ६४ टक्के कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसशी आघाडी करूनच निवडणूक लढवावी, असे मत नोंदविले.

राष्ट्रवादी पक्ष विश्वासार्ह नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा दबाव कॉँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी पक्षावर आणला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी कॉँग्रेसला ४२, तर राष्टÑवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या. भाजप १२२ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनला होता. 

युवकांना घेऊन संघटन बांधणीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. राज्यघटना व व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास आहे, अशांनी एकत्र आले पाहिजे, हीच काँग्रेसची भूमिका आहे. लोकशाहीचे अधिष्ठान असणाऱ्यांचे आम्ही स्वागत करू.
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेऊन धोरण ठरवित आहोत. सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांची त्याबाबत मानसिकताही तयार केली आहे. आघाडी करून लढण्याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी

विधानसभेतील बलाबल २०१४

एकूण - २८८

शिवसेना - ६३
राष्ट्रवादी - ४१

भाजप - १२२
काँग्रेस - ४२

इतर - २०

Web Title: Congress should contest the Assembly elections independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.