'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:26 PM2023-12-28T22:26:23+5:302023-12-28T22:48:48+5:30
राहुल गांधींच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसने १३९व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागपुरात मोठी रॅली काढली. या रॅलीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. भाजपा देशाला पुन्हा गुलामीच्या दिशेने घेऊन जातोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की त्यांची (काँग्रेस) थीम 'है तय्यार हम' अशी आहे. पण आम्ही तयार नाही असं नागपूर-विदर्भातील लोकांनी सांगितले. काँग्रेसच्या या रॅलीसाठी तेलंगणातूनही लोकांना आणले होते. मात्र तरही खुर्च्या भरता आल्या नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली. मला असे वाटते की, लोक राहुल गांधींना गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत, मग आम्हीतरी का त्यांना गांभीर्याने घेऊ, अशी टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
#WATCH | Mumbai: Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis says, "I think their (Congress) theme was 'Hain Taiyyar Hum' but I think people are not ready to take Rahul Gandhi seriously ..." pic.twitter.com/uxpB2wNVSu
— ANI (@ANI) December 28, 2023
दरम्यान, आज देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. भाजपाची विचारधारा राजेशाही आहे. त्यांच्याकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. पण काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमचा विश्वास आहे की, सत्तेची लगाम देशातील नागरिकांच्या हातात असावी. पण, आज सर्वच संस्थेवर भाजपचा ताबा आहे. सर्व कुलगुरू एकाच संस्थेचे आहेत. कुलगुरू गुणवत्तेच्या आधारावर बनवले जात नाहीत. मोदी सरकारमध्ये गेल्या 10 वर्षात किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या. गेल्या 40 वर्षांतील बेरोजगारी आज सर्वाधिक आहे. भारतातील करोडो तरुणांची शक्ती वाया जात आहे. देशाची संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हातात आहे, असा निशाणा राहुल गांधींनी साधला.
...तर स्वतःला ओबीसी कसे म्हणता?- राहुल गांधी
'देशाचे पंतप्रधान मोदी भाषण करताना आपण ओबीसी असल्याचे सांगतात, पण ओबीसी नेत्यांना मात्र भाजपमध्ये मोठे पद नाही.मी लोकसभेत म्हटले होते की, देश 90 आयएएस अधिकारी चालवतात. यातील किती ओबीसी किंवा आदिवासी आहेत? असे विचारल्यावर भाजपवाले गप्प झाले. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 ओबीसी आहेत, प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता?' अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.